पनवेल,उरण, कर्जत, खालापूर तालुक्यांसाठी 25 सप्टेंबरला विशेष पल्स पोलिओ मोहिम----जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले

दिनांक :- 21 सप्टेंबर  2016                                                                                                  वृत्त क्र. 613
पनवेल,उरण, कर्जत, खालापूर तालुक्यांसाठी
25  सप्टेंबरला विशेष पल्स पोलिओ मोहिम
                                                          ----जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले


   अलिबाग दि.21 :-  (जिमाका) पनवेल,उरण, कर्जत, खालापूर या 4 तालुक्यांसाठी 25  सप्टेंबरला विशेष पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येणार असून नागरिकांनी  सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले आज येथे केले.  या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या
 यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाहूबली नागावकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक आर.टी.विशे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.निलेश म.कोकरे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.राजू पाटोदकर आदि उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या की, उपरोक्त 4 तालुक्यांमध्ये अत्यंत काटेकोरपणे ही मोहिम राबवावी.  लसीकरण बुथ, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ याची तरतूद आधीच करुन घ्यावी. कोणत्याही परिस्थतीमध्ये या चार तालुक्यांमध्ये ही मोहिम सक्षमतेने राबवावी. 
जिल्हा शल्य चिकित्सक
मुंबई लगतचे तालुके तसेच येथे होत असलेले नागरिकांचे स्थलांतर आदिंचे बाबी विचारात घेऊन 25 सप्टेंबर  रोजी पनवेल,उरण,कर्जत, खालापूर या 4 तालुक्यात विशेष पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे.    या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा जादा डोस देण्यात येणार येईल.    ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी 1 लाख 63 हजार 742 असून त्याकरिता ग्रामीण भागात 1 हजार 138 आणि शहरी भागात 167 असे  एकूण 1 हजार 305 बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.ग्रामीण भागातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याचप्रमाणे शहरी भागात विविध ठिकाणी विशेष केंद्र  उभारण्यात येणार असून तेथे सकाळी  8.00 ते सायंकाळी 5.00 या वेळात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.          या व्यतरिक्त रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी सुध्दा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.  या कार्यक्रमासाठी 3 हजार 178 आरोग्य कर्मचारी यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील यामध्ये सहभाग करुन घेण्यात आलेला आहे.
लस आवश्यक
 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता शासकीय यंत्रणा सज्ज झाली असून 5 वर्षाखालील सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून या कार्यक्रमात सहभागी व्हावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
या बैठकीला  जिल्हा क्षयरोग अधिकारी वर्ग-1 डॉ.सुरेश देवकर, आरोग्य सहाय्यक जिल्हा क्षयरोग केंद्र  डॉ.एस.एच.खामगांवकर, आरोग्य सहाय्यक, तालुका आरोग्य अधिकारी खालापूर आर.बी.चव्हाण, आरोग्य सहाय्यक तालुका आरोग्य अधिकारी कर्जत पी.एम.म्हात्रे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक