Posts

Showing posts from March 13, 2022

जिल्ह्यातील हॉटेल्स, बेकरी, स्नॅक्स सेंटर, स्वीटमार्ट, वडापाव, भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी वृत्तपत्रात खाद्यपदार्थ न देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग , दि. 17 ( जिमाका):- जिल्ह्यातील हॉटेल्स , बेकरी , स्नॅक्स सेंटर , स्वीटमार्ट , वडापाव , भजी आणि भेळ विक्रेते व्यावसायिकांनी यापुढे ग्राहकांना अन्नपदार्थ वर्तमानपत्रामध्ये न देण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि. 05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित , सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबाजवणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते. वर्तमानपत्राच्या कागदामध्ये अन्नपदार्थ गुंडाळून/बांधून ग्राहकांना देण्याची प्रथा सर्रास दिसून येते. परंतू वर्तमानपत्र प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईत केमिकल / घातक रंग असल्याने गरम खाद्यपदार्थाच्या संपर्कात आल्यावर हे केमिकल विरघळते आणि ते आरोग्यास घातक असल्यामुळे अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण , नवी दिल्ली यांनी खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे वर्तमानपत्राच्या कागदाचा वापर गरम खाद्यपदार्थ पॅकिंग क

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

अलिबाग , दि.17 (जिमाका):- रायगड जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक दि.15 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील रस्ते अपघातांची कारणे शोधणे व ती कमी करणे , ब्लॅक स्पॉट ची यादी तयार करणे व ब्लॅक स्पॉट कमी करण्याबाबत कारवाई करणे, जिल्ह्यातील रस्ते अपघातांच्या संख्येत वर नियंत्रण ठेवणे इत्यादी सह विविध विभागांनी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने कामकाजाचा आढावा   जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी घेतला. होळी सणाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने कोकणवासीय कोकणात येतात ,   त्यांना प्रवासामध्ये त्रास होऊ नये , यासाठी विविध विभागांनी समन्वय ठेवून तातडीने रस्ता दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी , असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी रस्त्यावरील सर्व प्रकारचे फलक व रस्त्यावरील रेषा या   रस्त्यावरील अपघात कमी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, याची दुरुस्ती व देखभाल   करण्याबाबत संबंधित विभागांना

रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांचा प्रभाग रचना कार्यक्रम रद्द - जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

  अलिबाग , दि.17 (जिमाका):- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यातील मुदत संपलेल्या नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र , महाराष्ट्र अधिनियम 21 अन्वये महानगरपालिका , नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या क्षेत्रांची विभागणी करण्याची व हद्द विनिर्दिष्ट करण्याची प्रक्रिया नवीन तरतुदीनुसार राज्य शासनामार्फत होणार असल्याने रायगड जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांतील सदस्य पदांच्या निवडणुकीसाठीचा प्रभाग रचना कार्यक्रम 2022 ची प्रक्रिया रद्द करण्यात आली असल्या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि.15 मार्च 2022 रोजी जारी केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या दि.22 फेब्रुवारी 2022 च्या आदेशानुसार एप्रिल 2020 ते मार्च 2022 या कालावधीत राज्यातील मुदत समाप्त झालेल्या तसेच मुदत समाप्त होणाऱ्या व नवनिर्मित अशा राज्यातील एकूण 208 नगरपरिषदांच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम 2022 जाहीर झाला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खोपोली , अलिबाग , महाड , माथेरान , मुरुड जंजिरा , पेण , रोहा , श्रीवर्धन व उरण या

Eat Right India कार्यक्रमांतर्गत खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी Hygiene Rating व Eat Right Campus चे मानांकन प्राप्त करून घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग , दि. 17 ( जिमाका):- रायगड जिल्ह्यातील हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे कंपनी , दवाखाने व शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापना चालकांनी आपल्या व्यवसायानुसार Hygiene Rating / Eat Right Campus चे मानांकन प्राप्त करून घ्यावे. त्यानुषंगाने काही अडचण आल्यास अन्न व औषध प्रशासन , महाराष्ट्र राज्य , रायगड-पेण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा हा दि. 05 ऑगस्ट 2011 पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आलेला असून या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित , सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन देणे हा आहे. या कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याचे कामकाज अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागामार्फत केले जाते. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण , नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या Eat Right India या कार्यक्रमांतर्गत Hygiene Rating या उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यातील विविध हॉटेल/रेस्टॉरंट त्याचप्रमाणे कंपनी , दवाखाने व शैक्षणिक संस्थेतील कॅन्टीन या आस्थापनांनी मानांकन प्राप्त करून घेतले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे रायगड येथे टाऊन हॉल मीटिंग संपन्न

अलिबाग, दि.15 (जिमाका):- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), मुंबई प्रादेशिक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील MSME उद्योजकांसाठी सोमवार, दि.14 मार्च 2022 रोजी एक टाऊन हॉल मीटिंग आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्याने गणपती मूर्ती बनविणे आणि पापड बनविणे ही कामे करणारे उद्योजक सहभागी झाले होते. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील एमएसएमई उद्योजकांना बँकिंग वाहिनीच्या कक्षेत आणणे आणि गणपती मूर्ती तसेच पापड बनविणाऱ्या कारागिरांना आर्थिक जोड देण्याबाबत जागरुकता निर्माण करणे, हा टाऊनहॉल सभेचा मुख्य हेतू होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी FIDD, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालयाच्या महाव्यवस्थापक श्रीमती कल्पना मोरे या होत्या तर बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती शम्पा बिस्वास, बँक ऑफ बडोदाचे उप.झोनल मॅनेजर श्री.हेमंत कृ.लाल, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.जी.एस.हरळय्या, आरएसईटीआय चे संचालक श्री.आनंद राठोड आणि जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.विजय कृ.कुलकर्णी,उमेद अभियाचे जिल्हा व्यवस्थापक सिद्धेश राऊळ हे या बैठकीला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

अलिबाग, दि.15 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील कुशल / अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा दि.17 ते 19 मार्च 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment Job Seeker (Find a Job) Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी. तसेच ज्या उमेदवारांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी  https://www.rojgar.mahaswayam. gov.in  या वेब पोर्टलवर Employment Job

जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांना ऑनलाईन रोजगार मेळाव्याकरिता रिक्त पदे अधिसूचित करण्याचे आवाहन

अलिबाग, दि.15 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत दि.17 ते 19 मार्च 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत  “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ”  च्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यासाठी या कार्यालयाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आस्थापनांनी या विभागाचे वेबपोर्टल  https://rojgar.mahaswayam.gov. in  वर प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी. ही माहिती भरताना प्रथम उपरोक्त वेबपोर्टलवरील Employment-Employer (List a Job) Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावी. त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्हयाच्या नावावरील View Details Job Details Agree and Post Vacancy Add New Vacancy ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पा

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्यास मुदतवाढ

अलिबाग, दि.15 (जिमाका):-  भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच  “ माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य ”  या संकल्पेनवर मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली असून या स्पर्धेसाठी नागरिकांचा मिळालेला प्रचंड सहभाग पाहता भारत निवडणूक आयोगाने या स्पर्धेची प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत दि.31 मार्च 2022 केली आहे. पूर्वी ही मुदत दि.15 मार्च 2022 अशी होती. सर्जनशील माध्यमातून प्रत्येक मताचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने  “ माझे मत माझे भविष्य – एका मताचे सामर्थ्य ”  या मध्यवर्ती संकल्पनेवर पाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत ई-प्रमाणपत्रापासून रूपये 2 लाखापर्यंत आकर्षक अशी बक्षिसेही जाहीर केली आहेत. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी वयाचे बंधन नसल्याने भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी  https://ecisveep.nic.in/ contest/  या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यांच्या प्रवेशिका  voter-contest@eci.gov.in  या ई-मेलवर कराव्यात. ई-मेल करताना विषयात स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा आवर्जून उल्लेख करावा, असे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले आहे. राष्ट्रीय स

जी.डी.सी.ए आणि सी.एच.एम 2022 परीक्षा दि.27, 28 व 29 मे 2022 रोजी

अलिबाग , दि. 15 ( जिमाका):- जी.डी.सी.ए आणि सी.एच.एम 2022 परीक्षा दि.27, 28 व 29 मे 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील दि.10 फेब्रुवारी 2022 या पत्रानुसार कळविण्यात आलेले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:- शुक्रवार, दि.27 मे 2022 रोजी विषय- सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन (मॅनेजमेंट ऑफ को.ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी), गुण- 100 , वेळ - सकाळी 10 ते दुपारी 01.00, विषय- जमाखर्च (अकाउंट्स), गुण- 100, वेळ- दुपारी 02.00 ते 05.00, शनिवार, दि.28 मे 2022 रोजी विषय- लेखापरीक्षण (ऑडिटिंग), गुण- 100, वेळ - सकाळी 10.00 ते दुपारी 01.00, विषय- सहकाराचा इतिहास, तत्वे व व्यवस्थापन (हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ॲण्ड मॅनेजमेंट इन को.ऑपरेशन), गुण - 100, वेळ - दुपारी 02.00 ते सायंकाळी 05.00, रविवार दि.29 मे 2022 रोजी विषय- सहकारी कायदा व इतर कायदे (को.ऑपरेटिव्ह लॉज् ॲण्ड अदर लॉज) गुण- 100, वेळ- सकाळी 10.00 ते दुपारी 01.00, विषय- सहकारी बँक संस्था व इतर वित्तीय संस्था (को.ऑपरेटिव्ह बँकिंग ॲण्ड क्रेडिट सोसायटीज), गुण- 1

उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जारी केल्या सूचना

सूचना दिल्याप्रमाणे नागरिकांनी काळजी घेण्याचे   जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे आवाहन     अलिबाग , दि. 15 ( जिमाका):- प्रादेशिक हवामान विभाग , मुंबई यांनी दि. 14 मार्च 2022 रोजी दिलेल्या हवामान विषयक पूर्व सूचनेमध्ये जिल्ह्यात दि. 14 मार्च ते 16 मार्च 2022 या कालावधीत तापमानात वाढ होणार असून या तीन दिवसात जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.    उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत.   थकवा येणे , ताप येणे , त्वचा कोरडी पडणे , भूक न लागणे , चक्कर येणे , निरुत्साही होणे , डोके दुखणे रक्तदाब वाढणे , मानसिक बेचैन व अस्वस्थता , बेशुद्धावस्था इत्यादी उष्माघाताची लक्षणे आहेत.   ही लक्षणे आढळल्यास उपचार म्हणून रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे. कुलर ठेवावेत , वातानुकूलित खोलीत ठेवावे. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. आईसपॅड लावावेत.आवश्यकतेनुसार डॉक्टरा

दि.15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त जिल्ह्यात साजरे होणार विविध उपक्रम

Image
अलिबाग , दि. 14 ( जिमाका):- शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दि.15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्याबाबत कळविले आहे. शासनाने यावर्षी Fair Digital Finance ही संकल्पना निश्चित केली आहे. त्यानुसार या दिवशी जिल्हा, तालुका व गाव पातळीवर स्थानिक सणाच्या वेळी ग्रामीण चित्ररथाव्दारे जनजागृती करणे, ग्रामीण भागात साईनबोर्ड, भित्तीपत्रके, होर्डिंग्ज इत्यादी द्वारे स्थानिक भाषेमध्ये संदेश देणे, नुक्कड नाटक, पथनाट्य, पपेट शोज, रागिणी नौटंकी, पांडवानी इत्यादी द्वारे जनजागृती करणे, शाळेमध्ये प्रदर्शन व ग्राहक जनजागृती बाबत शिबिरे आयोजित करणे, हँडबिल्स /पॅम्प्लेटस तयार करुन ग्रामीण भागात तसेच शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाटप करणे, या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अलिबाग तालुक्यातील मुख्य समुद्रकिनाऱ्यावर सकाळी 11.00 वा चित्ररथाद्वारे ग्राहकांचे हक्काबाबत प्रबोधन करण्यात येणार असून हा चित्ररथ तालुक्यातील ग्रामीण भागात फिरविण्यात येणार आहे. तसेच अलिबाग समुद्र किनारी पथनाट्याद्वारे ग्राहकांचे हक्काविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच रायगड जिल्ह

जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे पथक भुवनेश्वर ओडिसा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी रवाना

अलिबाग , दि. 14 ( जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भूवनेश्वर (ओरीसा) येथे जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचे पथक रवाना करण्यात आले आहे. ओडिसा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (OSDMA) महापूर व चक्रीवादळाच्या अनुषंगाने पूर्वतयारी व धोका सौम्यीकरणाच्या उपाययोजना केलेल्या आहेत. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर दरवर्षी येणाऱ्या चक्रीवादळामध्ये आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्वतयारी करण्यास अनुभवी आहेत. रायगड जिल्ह्यास मागील सलग दोन वर्षी निसर्ग व तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला असल्याने प्रशिक्षणाच्या माध्यमातून येणाऱ्या महापूर व चक्रीवादळास सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज राहील, त्यामुळे ओरीसा राज्याने महापूर व चक्रीवादळाच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील 50 प्रशिक्षणार्थींना महापूर व चक्रीवादळाबाबतचे प्रशिक्षण मधूसूधन दास विभागीय वित्त व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (MDRAFM), चंद्रसेखरपूर, भुवनेश्वर, ओडिसा येथे दि.15 ते 17 मार्च 2022 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील पोली

राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून प्रवेश पात्रता परीक्षा 04 जून 2022 रोजी

अलिबाग , दि. 14 ( जिमाका):- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तराखंड) येथे फक्त्त इयत्ता 8 वी साठीची प्रवेश पात्रता परीक्षा आहे. ही परीक्षा शनिवार, दि.04 जून 2022 रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठीच होती परंतु आता ही परिक्षा मुलींनाही देता येणार आहे. गणित या विषयाची परीक्षा 200 गुणांची असून वेळ सकाळी 9.30 ते 11.00, सामान्य ज्ञान या विषयाची परीक्षा 75 गुणांची असून वेळ दुपारी 12.00 ते 01.00 आणि इंग्रजी या विषयाची परीक्षा 125 गुणांची असून वेळ दुपारी 2.30 ते 4.30 अशी असणार आहे. लेखी परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मौखिक परिक्षेबाबतचे वेळापत्रक यथावकाश कळविले जाईल. प्रवेश वयाची अट:- या परीक्षेसाठी विद्यार्थी/विद्यार्थीनीचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 11 वर्ष 06 महिने पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजेच विद्यार्थी-विद्यार्थीनीचा जन्म दिनांक 02 जानेवारी 2010 च्या आधीचा आणि दिनांक 01 जुलै 2011 च्या नंतरचा नसावा. शैक्षणिक पात्रता:- विद्यार्थी/ विद्यार्थीनी उमेदवार दि. 01 जानेवारी 2023

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण संपन्न

Image
  अलिबाग , दि. 14 ( जिमाका):- रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय स्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम खालापूर येथे आयोजित करण्यात आला होता. आपत्ती व्यवस्थापन व जनजागृती कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय आपत्ती प्रतिदास दल पुणे यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून प्रात्यक्षिक दाखवीत प्रशिक्षण दिले. तसेच तहसिलदार आयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, एनडीआरएफ सब इन्स्पेक्टर एस.पी.थोरात, एनडीआरएफ सब इन्स्पेक्टर रवींद्र, हवालदार योगेश साबळे, संतोष जाधव, जवान संतोश शिंदे, योगेश थोरात, गणेश महाजन, रावसाहेब डोईफोडे, अंकुश तिकांडे यांच्यासह या प्रशिक्षणासाठी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक उपस्थित होते. 00000

अलिबाग मुरुड-जंजिरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केले पथनाट्य कलाकारांचे कौतुक

" आपला महाराष्ट्र , आपले सरकार"..."दोन वर्षे जनसेवेची..महाविकास आघाडीची" च्या माध्यमातून  होत असलेल्या लोकजागरास दिल्या शुभेच्छा   अलिबाग , दि. 13( जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय , जिल्हा माहिती कार्यालय , रायगड अलिबाग तसेच स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था , रोहा , प्रिझम सामाजिक विकास संस्था , अलिबाग व अरुणोदय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्था , म्हसळा या कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची जनजागृती संपूर्ण रायगड जिल्ह्यात सुरू आहे. या पथनाट्य सादरीकरणातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना राज्य शासनाने राबविलेल्या योजना , त्याची फलश्रुती त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने घेतलेल्या विविध लोकोपयोगी निर्णयांची माहिती देण्यात येत आहे.     अशा प्रकारे विविध शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसाराचे उत्तम काम करणाऱ्या स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्थेच्या कलाकारांचे अलिबाग मुरुड जंजिरा विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुष्पगुच्छ देवून कौतुक केले व पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दि

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक निशांत रौतेला यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वयंसिद्धा संस्थेने पथनाट्याद्वारे केली शासनाच्या योजनांची जनजागृती

अलिबाग , दि. 13( जिमाका):- अलिबाग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व वायशेत बाजारपेठ येथे महाराष्ट्र शासन , माहिती व जनसंपर्क महासंचालनालय , जिल्हा माहिती कार्यालय , रायगड- अलिबाग व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक श्री. निशांत रौतेला यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लोककलेच्या माध्यमातून जागर करण्यात आला.   या लोकजागृती तथा लोकोपयोगी माहितीपर पथनाट्याची सुरुवात निशांत रौतेला यांच्या हस्ते ढोलकीवर थाप मारून करण्यात आली. यावेळी उपस्थित पर्यटकांना , स्थानिक नागरिकांना विविध शासकीय योजनांची , राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांची , जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण जनतेस शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील गड किल्ले संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा र

स्वयंसिद्धा संस्थेने पथनाट्यातून रोह्यात केली शासनाच्या योजनांची जनजागृती

Image
अलिबाग , दि. 13( जिमाका):- रोहा तालुक्यातील यशवंतखार , विद्या निकेतन हायस्कूल , सानेगाव , न्यू इंग्लिश स्कूल शेणवई , रोहा बस स्थानक येथे महाराष्ट्र शासन , माहिती व जनसंपर्क महासंचालनालय , जिल्हा माहिती कार्यालय , रायगड-अलिबाग व स्वयंसिद्धा विकास संस्था यांच्याद्वारे रोहा तहसिलदार कविता जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा नुकताच लोककलेच्या माध्यमातून जागर करण्यात आला.   यशवंतखार येथे झालेल्या या पथनाट्य कार्यक्रमाच्या वेळी पांडुरंग महादेव ठाकूर- उपसभापती बाजार समिती , अजय वसंत दिवकर- ग्रामपंचायत सदस्य , धर्मा जाणू ठाकूर- माजी ग्रामपंचायत सदस्य , जगन्नाथ मुकुंद ठाकूर काशिनाथ खोत , काशिनाथ दिवकर- रेशन दुकानदार , योगेश ठाकूर , यमुना ठाकूर , जगन मांडलेकर , हरी मांडलेकर , बळीबाई धुमाल , काशी म्हात्रे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची , राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांची , जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण जनतेस

जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत "आपला महाराष्ट्र, आपले सरकार" या पथनाट्यातून जनप्रबोधन

Image
    अलिबाग , दि. 13 ( जिमाका):- अलिबाग समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय , जिल्हा माहिती कार्यालय , रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्याद्वारे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच लोक कल्याणकारी योजनांचा जागर संपन्न झाला.   यावेळी उपस्थित पर्यटकांना , स्थानिक नागरिकांना विविध शासकीय योजनांची , राज्य शासनाने रायगड जिल्ह्यासाठी घेतलेल्या विविध विकासात्मक निर्णयांची , जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण जनतेस शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील गड किल्ले संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा रेवस ते जेट्टी सागरी महामार्ग चौपदरी व दुपदरी सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. विमुक्त जाती , भटक्या जमाती , विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभा