जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण संपन्न

 


अलिबाग,दि.14 (जिमाका):- रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय स्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम खालापूर येथे आयोजित करण्यात आला होता.

आपत्ती व्यवस्थापन व जनजागृती कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय आपत्ती प्रतिदास दल पुणे यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून प्रात्यक्षिक दाखवीत प्रशिक्षण दिले. तसेच तहसिलदार आयुब तांबोळी, पोलीस निरीक्षक अनिल विभूते, एनडीआरएफ सब इन्स्पेक्टर एस.पी.थोरात, एनडीआरएफ सब इन्स्पेक्टर रवींद्र, हवालदार योगेश साबळे, संतोष जाधव, जवान संतोश शिंदे, योगेश थोरात, गणेश महाजन, रावसाहेब डोईफोडे, अंकुश तिकांडे यांच्यासह या प्रशिक्षणासाठी सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे स्वयंसेवक उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक