Posts

Showing posts from December 1, 2019

छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम

अलिबाग दि.07, भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भात आयोगाने खालील प्रमाणे सविस्तर सूचना दिल्या आहेत. पुन:रिक्षण कार्यक्रमाचे टप्पे :- 1) पूर्व-पुनरिक्षण कार्यक्रम मतदार पडताळणी कार्यक्रम (EVP) कॅम्पेन मोडमध्ये SVEEP च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण सारख्या पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे कालावधी दि.11 नोव्हेंबर, 2019 (सोमवार) ते 20 डिसेंबर, 2019 (शुक्रवार). पुनरिक्षण कार्यक्रम :- 2) इंटीग्रेड प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी- सोमवार दि.30 डिसेंबर 2019 3) दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी- सोमवार दि.30 डिसेंबर 2019 ते गुरुवार दि.30 जानेवारी 2020 पर्यंत पुन:रिक्षण कार्यक्रमाचे टप्पे :- 4) विशेष मोहिमांचा कालावधी :- शनिवार दि.4 जानेवारी 2019 व रविवार   दि. 5 जानेवारी 2020 शनिवार दि. 11 जानेवारी 2019 व रविवार दि. 12 जानेवारी 2020 5) दावे व हरकती निकालात काढणे :- सोमवार दि. 10 फेब्रुवारी 2020 पूर्वी

पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण

अलिबाग दि.07, रायगड जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतींची पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत पध्दतीने आरक्षित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथील राजस्व सभागृत येथे दि.10 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 11 वाजता सभा आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य स्तरावरील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रत्येकी एक प्रतिनिधीस पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षणाच्या सभेस उपस्थित राहता येईल असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. 0000

ध्वज दिन निधी संकलन करणाऱ्यांचा सत्कार सैनिकांसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे देशकार्य - जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी

Image
                                                                    अलिबाग 7 :   आपल्या देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने यामध्ये आपला अधिकाधिक सहभाग द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात सशस्त्र सेना ध्वजदिन   2019   निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सशस्त्र सेना ध्वज दिन संकलनात महत्वपूर्ण सहभाग देणाऱ्यांचा जिल्हाधिकारी महोदय आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांना सशस्त्र सेना दिवसाचे बॅचेस लावण्यात आले आणि ध्वजदिन निधीत सहभाग देणाऱ्यांकडून   निधी संकलित करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यावेळी म्हणाले ,   आपण सर्वांनी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी निधी संकलन करणे हे समाजातील मोठे योगदान आहे. आज याच सैनिकांमुळे आपण सुरक्षित असून सैनिकांच्या कुटुंबांची काळजी

सातव्या आर्थिकगणनेच्या कामास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आवाहन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.02 (जिमाका) -   भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयामार्फ़त राष्ट्रव्यापी सातवी आर्थिक गणना घेतली जात आहे. ही गणना सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय व सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने केली जाणार असून सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित सातवी आर्थिक गणना-2019 संदर्भात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.     रायगड जिल्ह्यासाठी एकूण 1599 प्रगणक व 806 पर्यवेक्षक   काम करणार आहेत. या माहितीचा वापर केंद्र तसेच राज्य सरकार,विविध संघटना,भारतीय रिझर्व बँक, निती आयोग इत्यादींकडून योजना आखताना करण्यात येतो.   त्यामुळे गणनेतील माहिती अचून असणे आवश्यक आहे.   या क्षेत्रकामाची पडताळणी राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाचे अधिकारी तसेच पर्यवेक्षण जिल्हा सांख्यिकी अधिकारी व त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी करणार आहेत. या गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर

जागतिक एड्स दिन व पंधरवडानिमित्त रॅलीचे उद्घाटन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.02 (जिमाका) -   जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडानिमित्त आयोजित रॅलीचे   उदघाटन   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संदीप वीरभद्र स्वामी, अध्यक्ष लायन्स   क्लब श्रीबाग   अंकित   बंगेरा व   चित्रलेखा   पाटील,   निहा   राऊत   लायन्स   क्लब श्रीबाग,   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स   नियंत्रण व प्रतिबंध विभाग संजय माने यांच्या शुभहस्ते   हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले.   रॅलीच्या सुरुवातीला   जिल्हा एड्स   नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत आयोजित सेल्फी   पॉईन्टचे उदघाटन   वरील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले रॅलीची सुरुवात   जिल्हा सामान्य रुग्णालयतील   प्रांगणामध्ये होऊन सदरची   रॅली   एस.टी. स्टॅन्ड, शिवाजी पुतळा, बालाजी   नाका या मार्गे   पुन्हा   जिल्हा सामान्य रुग्णालय   पर्यंत   घेण्यात आली.     रॅलीमध्ये उपस्थित युवक युवतींना एचआयव्ही/एड्स विषयी शपथ देण्यात आली.     या   रॅलीमध्ये नर्सिंग   स्कुल,   जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, जे.एस.एम. कॉलेज