Posts

Showing posts from November 13, 2016

मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी -राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया

Image
दिनांक :- 17 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 730 मतदार जागृती व आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी                                                    -राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया                 अलिबाग दि. 17 : (जिमाका) नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी व्यापक प्रमाणात मतदार जनजागृती मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया यांनी आज येथे दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकां संदर्भातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या चार जिल्ह्यांच्या विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते.             या बैठकीला आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, अपर पोलीस महासंचालक एस.पी.यादव, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, रायगडच्या जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी प्रदीप पी,  सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी

राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रम संपन्न

Image
दिनांक  :- 15 नोव्हेंबर  2016                                                  वृत्त क्र. 723 राष्ट्रीय लोकअदालत कार्यक्रम संपन्न अलिबाग,दि.15 (जिमाका) सदस्य सचिव,राष्ट्रीय विधिक सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली  यांच्या पत्रानुसार प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे मार्गदर्शनानुसार 12 नोव्हेंबर 2016 रोजी जिल्हा न्यायालयात  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.             या कार्यक्रमाचेवेळी दिवाणी न्यायाधीश व.स्तर अलिबाग तथा सदस्य सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड अलिबाग एल.डि.हुली,  मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड अलिबाग मु.गो.सेवलीकर आणि अन्य न्यायिक अधिकारी प्रविण एम.ठाकूर, अध्यक्ष वकिल संघटना अलिबाग व अन्य वकिल वर्ग उपस्थित होते. राष्ट्रीय  लोकअदालतीमध्ये दिवाणी प्रकरणे, फौजदारी प्रकरणे, एन.आय.ॲक्‍ट,  मोटार अपघात प्रकरणे, कामगार न्यायालय अशी एकूण 1426 प्रकरणे आणि वादपूर्ण प्रकरणात एकूण 24934 प्रकरणे अशी एकूण 26360 प्रकरणे तडजोडीने सोडविण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.  यामध्ये दिवाणी प्रकरणातील 271 प्रकरणांपैकी 39 निकाली, फौज

आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला व व्यवस्थापन योजना सहभाग घेण्याचे आवाहन

दिनांक :- 16 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 726 आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला  व व्यवस्थापन योजना सहभाग घेण्याचे आवाहन अलिबाग,दि.16 (जिमाका) कृषि विभागामार्फत कोकण विभागात राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत आंबा फळपिकावरील किडरोग सर्व्हेक्षण,सल्ला व व्यवस्थापन ही योजना 15 नोव्हेंबर 2016 ते 31 मे 2017 या कालावधी मध्ये सुरु करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गत आंबा उत्पादक शेतकऱ्यांना वेळोवळी कृषि विद्यापीठातील शास्त्राज्ञांमार्फत विविध किड व रोगांवर मार्गदर्शन मिळणार आहे.  उपविभागीय कृषि अधिकारी खोपोली यांचे अंतर्गत सदर योजनेसाठी कर्जत, खालापूर,पनवेल व उरण या तालुक्यांचा समावेश  करण्यात आलेला आहे.  या चारही तालुक्यात किड सर्व्हेक्षक व मॉनिटर यांच्यामार्फत आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या फळबागांचे सर्व्हेक्षण करुन त्यामध्ये आंब्यावरील तुडतुडा, फुलकिडे,फळमाशी, भुरी व करपा इत्यादी किड व रोगाबाबत निरीक्षण घेऊन त्यांना वेळीच सल्ला देऊन संभाव्य नुकसान टाळणे शक्य होणार आहे.  किड व रोग प्रादुर्भावीत क्षेत्रासाठी आपत्कालीन परिस्थितीत शासना

जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका-2017 निर्वाचक गणाची प्रभाग रचना व आरक्षण सोडत सुधारित कार्यक्रम

दिनांक :- 16 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 725 जिल्हा परिषद  व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका-2017 निर्वाचक गणाची प्रभाग रचना व आरक्षण सोडत सुधारित कार्यक्रम अलिबाग,दि.16 (जिमाका) रायगड जिल्ह्यात 24 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हा परिषद निवडणुक विभागांच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात व पंचायत समिती निर्वाचक गणांच्याबाबतीत संबंधित तहसिल कार्यालयानी सूचित केलेल्या ठिकाणी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.   परंतु राज्य निवडणूक आयोगाने  रायगड जिल्हा परिषद  व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका-2017 चा निवडणुक विभाग,निर्वाचक गणाची प्रभाग रचना व आरक्षण सोडत काढण्यासाठीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे.  सुधारित कार्यक्रमांमध्ये दिलेल्या प्रपत्र-2 मधील पंचायत समिती क्षेत्रनिहाय तपशील तसेच पंचायत समित्यांना अनुज्ञेय ठरत असलेल्या जागांच्या तपशीलामध्ये सुधागड, मुरुड,रोहा,तळा,माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन व पोलादपूर या आठ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये जागांच्या आरक्षणामध्ये बदल होत नसल्याने  या आठ तालुक्यांत 24 ऑक्टोबर 20