जिल्हा परिषद व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका-2017 निर्वाचक गणाची प्रभाग रचना व आरक्षण सोडत सुधारित कार्यक्रम

दिनांक :- 16 नोव्हेंबर  2016                                                 वृत्त क्र. 725
जिल्हा परिषद  व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका-2017
निर्वाचक गणाची प्रभाग रचना व आरक्षण सोडत सुधारित कार्यक्रम

अलिबाग,दि.16 (जिमाका) रायगड जिल्ह्यात 24 ऑक्टोबर 2016 रोजी जिल्हा परिषद निवडणुक विभागांच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात व पंचायत समिती निर्वाचक गणांच्याबाबतीत संबंधित तहसिल कार्यालयानी सूचित केलेल्या ठिकाणी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.   परंतु राज्य निवडणूक आयोगाने  रायगड जिल्हा परिषद  व पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका-2017 चा निवडणुक विभाग,निर्वाचक गणाची प्रभाग रचना व आरक्षण सोडत काढण्यासाठीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला असून तो पुढीलप्रमाणे आहे. 
सुधारित कार्यक्रमांमध्ये दिलेल्या प्रपत्र-2 मधील पंचायत समिती क्षेत्रनिहाय तपशील तसेच पंचायत समित्यांना अनुज्ञेय ठरत असलेल्या जागांच्या तपशीलामध्ये सुधागड, मुरुड,रोहा,तळा,माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन व पोलादपूर या आठ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये जागांच्या आरक्षणामध्ये बदल होत नसल्याने  या आठ तालुक्यांत 24 ऑक्टोबर 2016 रोजी पंचायत समित्यांमध्ये सोडतीने काढलेल्या आरक्षणात पुन्हा आरक्षण काढण्यात येणार नाही.
आरक्षण सोडत सुधारित कार्यक्रम
उर्वरित पनवेल,कर्जत,खालापूर,पेण,उरण,अलिबाग,महाड या सात तालुक्यांतील पंचायत समित्यांमध्ये जागांच्या व आरक्षामध्ये बदल होत असल्याने या सात पंचायत समित्यांबाबत 18 नोव्हेंबर 2016 रोजी सोडतीने आरक्षण काढण्यात येणार आहे.  यासाठी जिल्हा परिषद निवडणुक विभागांच्या बाबतीत सोडतीने आरक्षण काढण्याची सभा 18 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 11.00 वा. राजस्व सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय रायगड-अलिबाग येथे होणार आहे असे जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.
000000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक