Posts

Showing posts from December 4, 2022

जिल्हा प्रशासनाकडून 300 आपदा मित्रांना देण्यात येणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

                 अलिबाग,दि.09(जिमाका):-     राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्याकडून राज्यातील 20 जिल्ह्यामध्ये आपदा मित्रांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातून 300 आपदा मित्रांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी आपदा मित्रांची निवड करावयाची आहे. जिल्हयातील माजी सैनिक, राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. विद्यार्थी, नेहरू युवा केंद्राचे युवक-युवती, होमगार्ड, पोलीस मित्र, जीवरक्षक, सागरी सुरक्षा दलातील स्वयंसेवक, नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक व आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कार्य करण्यास इच्छुक असणारे युवक-युवतीं इनाव नोंदणी करू शकतात. प्रशिक्षणासाठी इच्छुक स्वयंसेवकाचे वय 18 वर्षे ते 40 वर्षापर्यंत असावे. प्रशिक्षणार्थी 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण पूर्ण करण्यास तयार असावा. प्रशिक्षणानंतर प्रशासनास आपत्कालीन प्रसंगी सहकार्य करण्यास तयारी असावी. आपदा मित्रांनी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येवून त्यांचा रू.5 लाख रक्कमेचा अपघाती विमा उतरविण्यात येणार आहे. यासंबं

जिल्हा रुग्णालयात आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्य वाटप

Image
    अलिबाग,दि.09(जिमाका):-     सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग यांच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात आवश्यक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात दिव्यांगांना अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आ.महेंद्र दळवी यांच्या हस्ते जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, श्रवणयंत्र यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी व योग्य सुविधा देण्यासाठी पहिल्यांदाच स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या कार्यात आता अजून वेग येईल, असे आ. महेंद्र दळवी म्हणाले. अन्य दिव्यांग बांधवांनी आवश्यक साहित्य मिळण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात आधारकार्ड व UDID प्रमाणपत्र झेरॉक्स यांसह अर्ज करावा, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी यावेळी सांगितले.   याप्रसंगी आदिती दळवी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद गवई आदी मान्यवर उपस्थित होते.   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभा

सुप्रिया जेधे यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान होणार “सावित्रीची लेक” पुरस्कार

Image
    अलिबाग,दि.09(जिमाका):-  दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथे सौ.सुप्रिया जेधे यांना जनकल्याण सेवा संस्था यांच्याकडून "सावित्रीची लेक "पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दि. 3 जानेवारी 2023 रोजी दिला जाणार आहे.  श्रीमती जेधे यांना त्या सामाजिक कार्यात देत असलेल्या योगदानासाठी सन्मानित केले जाणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले समाजभूषण पुरस्कार ग्लोबल गोल्ड स्टार अवॉर्ड 2022 साठीही त्यांची निवड झाली आहे.   सौ.सुप्रिया जेधे यांनी जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने सुरभी स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून  संविधान जनजागृती, स्वच्छ भारत स्वस्थ भारत, राष्ट्रीय एकात्मता, फटाके विरोधी अभियान, समुद्रकिनारे स्वच्छता मोहीम, गणपती दान व इको फ्रेंडली गणपती, त्यासाठी  कृत्रिम तलावाची निर्मिती, वनराई बंधारे,  अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन, व्यसनमुक्ती व महिला सक्षमीकरण इत्यादी सामाजिक उपक्रम तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत केलेले कार्य, वृक्षारोपण व पाणलोट विकास या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 0000000

सुरभी संस्थेतर्फे दि.26 नोव्हेंबर 2022 ते दि.26 जानेवारी 2023 पर्यंत संविधान बांधिलकी महोत्सवांतर्गत नशा मुक्त भारत व विविध उपक्रमांचे आयोजन

    अलिबाग,दि.09(जिमाका):-  रायगड जिल्हा प्रशासन,  सुरभी स्वयंसेवी सामाजिक संस्था, अलिबाग तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्था तसेच अंधश्रध्दा निर्मूलन समिती व टाटा मेमोरियल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान बांधिलकी महोत्सव दि.26 नोव्हेंबर 2022 ते दि.26 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेण्यात येत असून यामध्ये संविधान बांधिलकी संविधान कार्यशाळा, नशामुक्त भारत इत्यादी उपक्रम राबविण्यात येत आहेत, अशी माहिती सुरभी सामाजिक स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष सुप्रिया जेधे यांनी दिली.  दि.02 डिसेंबर 2022 रोजी प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या राष्ट्रीय सेवा योजना (PNP-NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रमसंस्कार शिबिर सायरस पूनावाला सीबीएससी इंग्लिश मीडियम स्कूल, नागाव तसेच संपर्क बालग्राम अनाथ आश्रम येथे पेझारी बांधन,ता.अलिबाग येथे घेण्यात आले. तेथील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती व त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन व सादरीकरण करण्यात आले.  अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सुरभी स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्त

खालापूर येथील विश्वनिकेतन महाविद्यालयात नव मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न

  अलिबाग,दि.09(जिमाका):-  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती स्नेहा उबाळे,  उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 189 कर्जत विधानसभा मतदार संघ  अजित नैराळे यांच्या सूचनेप्रमाणे तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी खालापूर आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर येथील विश्वनिकेतन महाविद्यालय कुंभिवली व तहसिल कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  दि.8 डिसेंबर2022 रोजी मतदार नोंदणी  शिबिर संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालय खालापूर येथील नायब तहसिलदार निवडणूक श्री.दशरथ भोईर, विश्वनिकेतन महाविद्यालयचे प्राचार्य श्री.पाटील, प्राध्यापक श्री.एच आर.मावकर, श्री निखिल कासार तसेच तलाठी श्री.सरगर हे उपस्थित होते. नायब तहसिलदार श्री.दशरथ भोईर यांनी मतदार नोंदणी कशी करावी, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मतदानाचे महत्व, NVSP Portal व व्होटर हेल्पलाईन ॲपबाबत मागदर्शन करुन पात्र नवमतदारांची मतदार नोंदणी करण्य

जिल्ह्यात गोवर परिस्थिती नियंत्रणात मात्र नागरिकांनी लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे --जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

    अलिबाग, दि.09 (जिमाका) :- राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेताना गोवर उद्रेक प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात टास्क फोर्स सभा घेण्याची सूचना व्ही.सी. व्दारे दिली होती. त्यानुसार दि.02 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र रोकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती ज्योत्सना शिंदे तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (आय.एम.ए) चे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील उपस्थित होते. या बैठकीमध्ये गोवर उद्रेक व उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.   यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आरोग्य विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सार्वजनिक विभागाव्यतिरिक्त सर्व शासकीय विभागांकडून मदत घेण्यात यावी, महि

एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न पारितोषिक वितरण कार्यक्रम दि.09 डिसेंबर 2022 रोजी

  अलिबाग, दि.09 (जिमाका) :- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम दि.07 डिसेंबर 2022 रोजी शासकीय आश्रमशाळा सानेगाव ता.रोहा येथे संपन्न झाला.   गुरुवार, दि.8 डिसेंबर 2022 रोजी झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, खो-खो, धावणे, भालाफेक, गोळा फेक,थाळी फेक, लांब उडी, उंच उडी या पारंपारिक खेळाचा तसेच हॉलीबॉल, हँडबॉल, रीले या खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या.   या स्पर्धेमध्ये विजेत्या झालेल्या संघांची माहिती पुढीलप्रमाणे:- खेळाचा प्रकार- 14 वयोगटामध्ये कबड्डी मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळा नेरळ, उपविजेता संघ-शासकीय आश्रमशाळा भालीवडी.   17 वयोगटामध्ये कबड्डी मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रम शाळा रानपाखर, उपविजेता संघ-शासकीय आश्रमशाळा सानेगाव. 14 वयोगटामध्ये हॉलीबॉल मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळा माणगाववाडी उपविजेता संघ-शासकीय आश्रमशाळा साई.   17 वयोगटामध्ये हॉलीबॉल मुलींचा संघ, विजेता संघ-शासकीय आश्रमशाळ पिंगळस, उपविजेता संघ- शासकीय आश्रमशाळा कोळघर.   19 वयोगटामध्ये हँडबॉल मुलांचा सं

संजय पाटील यांनी स्वीकारला मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त पदाचा कार्यभार

  अलिबाग, दि.09 (जिमाका) :- सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग या पदाचा कार्यभार संजय वा.पाटील यांनी दि.20 ऑक्टोबर 2022 रोजी स्वीकारला असून सर्व शासकीय, निमशासकीय, अर्धशासकीय व गोपनीय पत्रव्यवहार करण्यासाठी   सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय (तांत्रिक)रायगड-अलिबाग यांचे कार्यालय, सिध्दी अपार्टमेंट, 3 रा मजला, डॉ.जगदाळे हॉस्पिटलच्या शेजारी, ता.अलिबाग, जि.रायगड-402201 दूरध्वनी क्रमांक 02141-295221, ई-मेल आयडी acfalibag@gmail.com , येथे संपर्क साधावा, असे सहाय्यक आयुक्त संजय वा.पाटील यांनी कळविले आहे. ००००००००

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करुन समता पर्वाचा समारोप कार्यक्रम संपन्न

      अलिबाग, दि.09(जिमाका):- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद रायगड येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली   व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी श्री.सुनील जाधव आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.नितिन मंडलिक यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करुन समारोप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्वप्रथम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारास अनुसरून शब्दसुमनांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी गीते व पोवाडे सादर करण्यात आली. तसेच कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या 7 शासकीय वसतिगृहे व 1 निवासी शाळा तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड कार्यालयांतर्गत अलिबाग, महाड, तळा, पनवेल, पाली-सुधागड वस्ती

जे.एस.एम.च्या राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबिरात आरोग्य तपासणी संपन्न

            अलिबाग, दि.09(जिमाका):- अलिबाग तालुक्यातील मौजे मानीभुते येथे जे.एस.एम.महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या श्रमसंस्कार शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची एच.आय.व्ही.एड्स व सिकलसेल तपासणी व किशोरवयीन मुलांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी मनिभुते ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.अस्मिता म्हात्रे, एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम व्यवस्थापक श्री. संजय माने, समुपदेशिका सौ.अपर्णा करंदीकर, समुपदेशक श्री सचिन जाधव, सिकलसेल समुपदेशक श्री प्रतिम सुतार, टेक्निशियन सौ.सुजाता तुळपुळे, रुपेश म्हात्रे, श्री अतिश नाईक, सौ.रुचिता म्हात्रे, सौ.मीनाली साळवकर रेश्मा म्हात्रे, दीपा म्हात्रे, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.प्रविण गायकवाड, डॉ.सुनील आनंद, डॉ. प्रीती फाटे, प्रा. संतोष हाके तसेच एच. आय. व्ही.   व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री.संजय माने यांनी एच.आय.व्ही.एड्स विषयी मागदर्शन व समुपदेशन करताना विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येकाने लग्नापूर्वी ब्रह्मचार्य वृत्त पाळावे व लग

धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.15 डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

  अलिबाग, दि.8 (जिमाका) :- खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करिता दि.7 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नाही.   त्यामुळे पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.15 डिसेंबर 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी, याकरिता यापूर्वी सूचित केल्यानुसार आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता नोंदणी सुरू झाली आहे, असे पणन विभागाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांनी कळविले आहे 0000000

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मतदार साक्षरता आणि निवडणुकीत सहभाग मोहिमेंतर्गत जिल्हास्तरीय विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

    अलिबाग,दि.08 (जिमाका):     मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 01 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दि.09 नोव्हेंबर 2022 ते दि.08 डिसेंबर 2023 या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविला जाणार आहे. एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी करणे -बुधवार, दि.09 नोव्हेंबर 2022 रोजी,   दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी –बुधवार, दि.09 नोव्हेंबर 2022 ते गुरुवार, दि.08 डिसेंबर 2023,   संक्षिप्त पुनरिक्षण काळात विद्यार्थी, दिव्यांगमहिला, देह व्यावसाय करणाऱ्या महिला, घर नसलेले भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्ती, तृतीयपंथी या लिक्षित घटकांसाठीची विशेष शिबिरे- शनिवार, दि. 12 नोव्हेंबर   2022, व रविवार, दि.13 नोव्हेंबर, 2022, शनिवार, दि.26 नोव्हेंबर 2022 व रविवार, दि.27 नोव्हेंबर 2022,   मतदार नोंदणीसाठीची 4 विशेष शिबिरे - दि.19 व 20 नोव्हेंबर 2022 आणि दि.03 व 04 डिसेंबर 2022,   दावे व हरकती निकालात काढणे-   दि.26 डिसेंबर 2022 (सोमवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे- गुरुवार, दि.05 जानेवारी, 2023.   जिल

रायगड कृषी विभागामार्फत आत्मनिर्भर अभियानांतर्गत कृतीसंगम कार्यशाळा संपन्न

    अलिबाग,दि.08 (जिमाका) :- कृषी पायाभूत सुविधा निधी(AIF) योजनेच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अलिबाग येथे (दि.07 डिसेंबर 2022) रोजी निवासी जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळा  संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचे राज्य समन्वयक श्री एम.एम कांबळे यांनी सांगितले की, ही योजना सन 2021- 22 ते 2032 - 33 या कालावधीसाठी आयोजित करण्यात आली आहे. तसेच या योजनेंतर्गत 8 हजार 460 कोटी रुपये अनुदान महाराष्ट्र स्तरावर उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील आतापर्यंत या योजनेंतर्गत 7 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.  या योजनेंतर्गत 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात असून यामध्ये लाभार्थ्यांना 3 टक्के व्याजदरामध्ये सवलत दिली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या योजनेंतर्गत लाभार्थी अर्ज प्रक्रिया ते अनुदान मिळणे पर्यंतच्या पूर्ण प्रक्रिया संगणकीय सादरीकरणाद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेमध्ये दाखविण्यात आली. या कार्यशाळेमध्ये उपजिल्हाधिकारी डॉ.पद्श्री बैनाडे य

रोहा येथील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उपायुक्त प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न

    अलिबाग,दि.08 (जिमाका) :- प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धां चे रोहा तालुक्यातील सानेगाव शासकीय आश्रमशाळा येथे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे   दि.07 डिसेंबर 2022 रोजी आदिवासी विकास ठाणे उपायुक्त श्री . प्रदीप पोळ यांच्या हस्ते उद्धाटन संपन्न झाले. यावेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव, माजी जिल्हा परिषद सदस्य , रोहा श्री.नंदकुमार म्हात्रे, सानेगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती स्वप्नाली भोईर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक, क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री.मोतीराम लेंडी, पेण वैद्यकीय अधिकारी डॉ.आशुतोष मोकल, वैद्यकीय पथक आदी मान्यवर उपस्थित होते. पेण प्रकल्प कार्यालयांतर्गत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण 14 शासकीय आश्रमशाळा व 10 अनुदानित आश्रम शाळा अशा एकूण 24   आश्रमशाळांतील   1 हजार 347    विद्यार्थ्यांनी प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे.   दि. 7 डिसेंबर ते दि. 9 डिसेंबर 2022 या कालावधीत शासकीय आश्रमशाळा सानेगाव ता. रोहा येथे 14,17 व

के.एम.सी.महाविद्यालय खोपोली येथे नवमतदार नोंदणीसाठी विशेष शिबीर संपन्न

    अलिबाग,दि.08 (जिमाका) :- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशान्वये व उपजिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग श्रीमती स्नेहा उबाळे,  उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी 189 कर्जत विधानसभा मतदार संघ  अजित नैराळे यांच्या सूचनेप्रमाणे तसेच तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी खालापूर आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय खालापूर व के.एम.सी.महाविद्यालय खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  दि.7 डिसेंबर2022 रोजी मतदार नोंदणी  शिबिर संपन्न झाले. या शिबिर कार्यक्रमासाठी तहसिल कार्यालय खालापूर येथील नायब तहसिलदार निवडणूक श्री.दशरथ भोईर, मंडळ अधिकारी खोपोली श्री.सचिन वाघ, गटशिक्षणाधिकारी, खालापूर श्रीम.शिल्पा दास तसेच प्राचार्य श्री.प्रताप पाटील, प्राध्यापक, श्री.संजय दायरे, प्राध्यापिका श्रीमती मिनाक्षी ओसवाल व के.एम.सी. महाविद्यालय खोपोलीचे अन्य प्राध्यापक वर्ग तसेच तलाठी श्री.रणजीत कवडे, श्रीम दिप्ती चोणकर हे उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार श्री.दशरथ भोईर यांनी मतदार

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात संपन्न

                    अलिबाग,दि.08 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत   सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.                   कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.   श्रीमती रेशमा पाटील यांच्या   “ ये मेरे वतन के लोगो… ” या गाण्याच्या सादरीकरणातून शहीद जवानांना व वीर जवान प्रतिमेस श्रद्धांजली वाहण्यात आली. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, ब्रिगेडिअर (निवृत्त) सुरेश सालोखे, मेजर (निवृत्त) डॉ.आश्लेषा तावडे-केळकर यांच्या व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.                यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री.गु.श. हरळय्या, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव, सहाय्यक जिल्

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेतील पात्र लाभार्थीचा डाटा पी.एम.किसान पोर्टलवर अद्ययावत करावा

    अलिबाग,दि.08 (जिमाका):- केंद्र शासनाने माहे डिसेंबर-मार्च 2022 कालावधीतील 13 व्या हप्त्याच्या वितरणाचे नियोजन करण्यासाठी दि.02 डिसेंबर 2022 रोजी दूरचित्रवाणी परिषद आयोजित केली होती. या दूरचित्रवाणी परिषदेमध्ये राज्यातील पात्र लाभार्थीचा डाटा दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत भूमि अभिलेख प्रमाणे अद्यावत करून पोर्टलवर अपलोड करण्याचे तसेच अपात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मार्क करण्याचे निर्देश दिले आहेत. सद्य:स्थितीत राज्यातील एकूण 100.57 लाख पात्र लाभार्थ्यांपैकी 7.99 लाख पात्र लाभार्थीच डाटा (Eligible Punding for Land Details Seeding) राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्ययावत करून अद्यापही अपलोड करण्यात आलेला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी 12 हप्ता वितरणावेळी योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. केंद्र शासन स्तरावर शासनाने माहे डिसेंबर-मार्च 2022 कालावधीतील 13 व्या हप्त्याच्या वितरणाची कार्यवाही सुरू असून दि. 15 डिसेंबर 2022 पर्यंत या लाभार्थीचा डाटा भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे अद्यावत झाल्यासच त्यांना पुढील लाभ देय राहील, असे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने राज्याच्या

मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत मुंबई, पनवेल येथून अंदाजित रु.8 लाख 57 हजार 860 किंमतीचा मुद्देमाल जप्त

    अलिबाग,दि.08(जिमाका):- राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी,   राज्य उत्पादन शुल्क संचालक श्री.सुनिल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे विभागीय उपायुक्त श्री.प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर अधीक्षक श्री. प्रविण कुमार तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क, एच विभाग, मुंबई शहर निरीक्षक यांना रुम नं.205, दुसरा मजला, शितला देवी दर्शन, 11 वी गल्ली कामाठीपुरा मुंबई सेंट्रल, मुंबई या ठिकाणी बनावट विदेशी मद्य तयार केले जाते, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दि.05 डिसेंबर 2022 रोजी छापा मारुन बनावट विदेशी मद्याच्या सिलबंद व रिकाम्या बाटल्या, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या, मोबाईल व बनावट मद्य वाहतूक करुन विक्री करण्याकरिता वापरत असलेले दुचाकी वाहन असा एकूण अंदाजित किंमत रु. 1 लाख 64 हजार 660 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात आरोपी राज अशोक वाघेला, वय 20 वर्षे यास ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. या आरोपीची अधिक चौकशी केली असता त्याने तपासादरम्यान दिलेल्या माहिती वरुन

कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावते--प्रकल्प अधिकारी श्रीम.शशिकला अहिरराव

  अलिबाग,दि.06(जिमाका) :-  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दांपत्याकरिता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व नामांकित स्वयंसेवी संस्थाकडून कन्यादान योजनेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या दाम्पत्याने योग्य त्या कागदपत्रासह 07 डिसेंबर 2022 पासून विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना रु.10 हजार इतके अनुदान देय आहे.  तसेच लग्न सोहळा आयोजित करण्यासाठी सेवाभावी संस्था तयार असल्यास कार्यक्रम आयोजन करण्यासाठी रु.10 हजार इतके अनुदान देय आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांनी -विहित नमुन्यातील कन्यादान योजनेचा अर्ज, दोन पासपोर्ट साईज फोटो, रहिवाशी दाखला, जातीचे दाखले, वयाबाबतचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला,  विवाह न झाल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र रु. 100 च्या स्टॅम्पवर नमूद करावे.  लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण जि.रायगड या कार्यालयातील कन्यादान योज

महाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चिंभावें येथे महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न शिबिरामध्ये जवळपास 150 ते 200 महिलांच्या आरोग्याची तपासणी

Image
    अलिबाग,दि.06(जिमाका) :-  महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रायगड अंतर्गत तसेच नवतेजस्विनी  महाराष्ट्र राज्य ग्रामीण उद्यम विकास कार्यक्रमांतर्गत  सावित्रीबाई फुले लोक संचलित साधन केंद्र महाड येथील रावढळ या गावात दि.5 डिसेंबर 2022 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंभावें यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जवळपास 150 ते 200 महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. महिलांमध्ये वाढते अनेमियाचे प्रमाण रक्तातील ऑक्सिजनची कमतरता यामुळे आरोग्याची होणारी हानी यापासून प्रत्येक महिलेने सुरक्षित रहावे, वेळोवेळी आरोग्याची तपासणी करावी, आपल्या स्वतः च्या आरोग्याची काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले.  तसेच चांगल्या आरोग्यासाठी महिलांनी आपला आहार कसा असावा याची जाणीव करून देण्यासाठी तिरंगा थाळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये ज्या महिलांची थाळी पोषक द्रव्ये व कर्बोदके यांनी परिपूर्ण असेल त्या  पहिल्या तिघींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.  याचा उद्देश काय तर महिलांनी आपल्या आहाराबाबाबत जागरूक होऊन सुदृढ पि

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन VSTF च्या मार्गदर्शनपर मुरूड येथील चोरढे शाळेला भेट स्वरूपात दिला लॅपटॉप

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- महाराष्ट्र  ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन VSTF आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 अंतर्गत निवडलेली मुरूड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चोरढे या शाळेला गावातील पालकवर्ग व शिक्षकगण यांच्याकडून रुपये 37500/- किंमतीचा एक लॅपटॉप भेट म्हणून प्रदान करण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालकवर्ग व शिक्षकगण यांना अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  याप्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती गुरव  यांनीही  शाळेला भेट दिली. तसेच मार्गदर्शनपर लोकसहभाग, श्रमदान व पालकांची जबाबदारी समजवून सांगण्यात आली की, जेव्हा VSTF तर्फे रु.3 लाख शाळेला दिले जातात तर पालकांचेही शाळेप्रति काही कर्तव्य बनतात, शाळेकडे लक्ष देणे, यातूनच चक्रीवादळात शाळेचे झालेले नुकसान त्यामुळे शाळेला आवश्यक असलेली बाब होती म्हणजेच लॅपटॉप. आदर्श शाळा विकास कार्यक्रम टप्पा-2 अंतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनकडून शाळेला देण्यात आलेला लॅपटॉप हे अभियानाचे यशच म्हणता येईल, असे मत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन चे जिल्हा समन्वयक श्री.रत्नशेखर गजभिये

सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रमाचे दि.7 डिसेंबर रोजी राजस्व सभागृहात आयोजन

  अलिबाग,जि.रायगड,दि.05 (जिमाका) :-  जिल्ह्यातील सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मान्यतेने बुधवार दि.07डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता  राजस्व सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी  तथा अध्यक्ष, सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समिती  डॉ. महेंद्र  कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील युध्द विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता यांना सन्मानित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे  सशस्त्र सेना ध्वजदिन 2021 निधी संकलनाचे उत्कृष्ट कार्य केलेली कार्यालये,  संस्था, व्यक्तींचाही प्रोत्साहनपर  सन्मान करण्यात येणार आहे. तरी माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय, नागरिक, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी केल

जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर.संघटना पथकाकडून दि.5 ते दि.31 डिसेंबर पर्यंत करण्यात येणार प्रथम टप्प्यातील सर्वेक्षण

अलिबाग,दि.5(जिमाका):-  रायगड जिल्ह्याचे सबनॅशनल प्रमाणपत्रासाठी नामांकन जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर.यांच्याकडून जिल्ह्यात क्षयरोगाचे प्रमाण किती किती टक्के आहे, जिल्ह्यातील क्षयरोगाचे रुग्ण संख्या सातत्याने कमी होते आहे, जिल्ह्याची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे का, याची पाहणी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व आय.सी.एम.आर. संघटना यांच्या पथकाकडून प्रथम टप्प्यातील सर्वेक्षण दि.5 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या सन-2015 पासूनच्या ड्रग सेल डाटा मागविण्यात आलेला असून, त्यानुसार त्याचा अभ्यास करून जिल्ह्याचे नामांकन सबनॅशनल प्रमाणपत्रासाठी करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील दहा तालुक्यातील दहा गावांची निवड करण्यात आली आहे. या दहा गावांतून पहिल्या टप्प्यात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी एका गावातून दोन स्वयंसेवकाची निवड करण्यात आली असून वीस स्वयंसेवक निवडण्यात आले आहेत. निवड झालेले स्वयंसेवक  सर्वेक्षण कशा प्रकारे करतील, याची सविस्तर माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वंदनकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व जिल्हा परिषदेचे