धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.15 डिसेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ

 


अलिबाग, दि.8 (जिमाका) :- खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करिता दि.7 डिसेंबर 2022 अखेर पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोंदणी पुरेशी झाली नाही.

 त्यामुळे पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता दि.15 डिसेंबर 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी, याकरिता यापूर्वी सूचित केल्यानुसार आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता नोंदणी सुरू झाली आहे, असे पणन विभागाचे कक्ष अधिकारी विजय मोरे यांनी कळविले आहे

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक