Posts

Showing posts from April 16, 2023

दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्रीवर्धन न्यायालयाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचा भूमीपूजन समारंभ येत्या रविवारी

    अलिबाग,दि.21(जिमाका) :-  दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर श्रीवर्धन या न्यायालयाच्या प्रस्तावित नूतन इमारतीचा भूमीपूजन समारंभ उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती,जि.रायगड श्री.मिलिंद म.साठ्ये यांच्या शुभहस्ते व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड - अलिबाग श्रीमती शैलजा श.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि.23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होणार आहे.        सध्या श्रीवर्धन येथील दिवाणी न्यायालय हे भाडे तत्त्वावर घेतलेल्या जागी सुरू आहे.  गेल्या सुमारे 30 ते 35 वर्षे श्रीवर्धन न्यायालयाची स्वतंत्र वास्तू उभारण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू होते. दि.26 जुलै 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार  शासनाच्या विधी व न्याय विभागाकडून श्रीवर्धन येथे न्यायालयाची इमारत व न्यायाधीशांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार तळमजला अधिक दोन मजले अशी 3511.80 चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळाची न्यायालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. ०००००००००

राष्ट्रीय लोक अदालतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा--प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस.सांवत

    अलिबाग,दि.20(जिमाका) :-   महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दि.30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती न्यायाधीश तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड-अलिबाग श्री.अमोल अ. शिंदे यांनी दिली आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच ग्रामपंचायत यांच्या घरपट्टी, पाणीपट्टी बिलाच्या देयकाबाबतची वादपूर्व प्रकरणे, भारत दूर संचार निगम लिमिटेड, वीज वितरण, राष्ट्रीयकृत बँका आणि पतसंस्था व इतर यांच्याकडील थकबाकीबाबतची वादपूर्व प्रकरणे तसेच इत्यादी वादपूर्व प्रकरणे या लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तरी दि.30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी सहकार्य करावे आणि या लोक अदालतीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड-अलिबाग श्रीमती एस. एस. सांवत यांनी केले आहे. ००००००००

प्लास्टिक संकलनाचे अंतरिम व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत काशिदचा पुढाकार

    अलिबाग,दि.20(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध नयनरम्य समुद्र किनारा लाभलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद ग्रामपंचायत परिसराची स्वच्छता सुविधेच्या दृष्टीने जिल्हा स्वच्छता कक्षाकडून पाहणी करण्यात आली.  या पाहणीवेळी येथील सर्व स्टॉल धारक प्रतिनिधी, कॉटेज प्रतिनिधी, हॉटेल संघटना प्रतिनिधी, कचरा व्यवस्थापक ठेकेदार, काशिद ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.नम्रता  कासार, उपसरपंच सौ.वर्षा दिवेकर, सदस्य संतोष राणे, विलास मोरे, सदस्या सौ.मयूरी धारवे, सौ.तुलसा पवार, इतर मान्यवर श्री.नरेश मरवाडे, श्री.अमित खेडेकर, श्री.विलास दिवेकर, ग्रामसेवक श्री.सुशांत ठाकूर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी आणि मान्यवर ग्रामस्थ  सी.आर.पी, मुख्याध्यापक, बचतगट अध्यक्ष  यांची बैठक  घेण्यात आली.             यावेळी प्लास्टिक संकलन व त्याचे अंतरिम व्यवस्थापन होण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती व आम्ही संस्था यांनी भविष्यात करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रत्येक घटकाची असणारी जबाबदारी याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले. होते. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती शुभांगी नाखले, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.जयवंत गायकवाड, श

कारागृहासह बंदिवानांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न कारागृहावर राहणार आता ड्रोनची नजर

    अलिबाग,दि.20(जिमाका):- राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 12 ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार आहे, अशी महिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांनी दिली.             यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साठे पश्चिम विभाग,कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय श्री.सुनील ढमाळ,येरवडा कारागृह अधीक्षक श्रीमती राणी भोसले, प्राचार्य दौलतराव जाधव तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा श्री.चंद्रमणी इंदुरकर इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.               कारागृह सुरक्षा बळकटीकरण करण्यासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार 12 ड्रोन विविध कारागृहातील बारीक गोष्टींवर हालचाली टिपणार आहे. संबंधित ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळीही चित्रीकरण करण्यात येणार आहे. विशेषतः कारागृहात होणाऱ्या घटना आणि कैद्यांची अपडेट मिळण्यास मदत होणार आहे.                  प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण कार्यालयामार्फत “वॉकथॉन-2023” जल्लोषात संपन्न

    अलिबाग,दि.19 (जिमाका) :-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित  “ सामाजिक   समता पर्व ”  कार्यक्रमांतर्गत दि.14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयापासून अलिबाग बीचपर्यंत पदयात्रा  “ वॉकथॉन-2023 ”  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रायगड जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश जगदीश कोकाटे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री. सुनिल जाधव, अलिबाग पोलीस निरीक्षक श्री.शैलेश सणस यांच्या हस्ते माल्यार्पण करुन  “ वॉकथॉन-2023 ”  ला सुरुवात झाली.   या  “ वॉकथॉन-2023 ”  मध्ये सत्र न्यायाधीश श्री.जगदीश कोकाटे, सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव,  संशोधन अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, रायगड श्री.रवीकिरण पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, श्री.नितिन मंडलिक, अलिबाग पोलीस निरीक्षक श्री.शैलेश सणस, मांडवा पोलीस निरीक्षक श्री.राजू पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.राजाराम हुलवान, जे.एस.एम. कॉलेजचे प्राध्यापक प्रा.प्रेम आचार्य, अलिबाग येथील मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल संदीप कदम,

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत वक्तृत्व,निबंध, पथनाट्य व रॅलीच्या माध्यमातून उत्साहात संपन्न

  अलिबाग,दि.19(जिमाका) :- भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.30 एप्रिल 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.11 एप्रिल 2023 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग तालुक्यातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी, विद्यार्थीनींच्या विविध स्पर्धा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड-अलिबाग यांच्या वतीने लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय, चोंढी किहीम येथे वक्तृत्व, निबंध व एकांकिका स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव, कार्यालय अधीक्षिका श्रीमती माधुरी पाटील, गृहपाल श्री.संदिप कदम, लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय चोंढी किहीमचे कार्यवाहक श्री.रविंद्र ठाकूर, प्राचार्य श्रीमती लिना पाटील, प्राध्यपक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड-अलिबाग यांच्या अधिनस्त मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली, पनवेल,महाड येथेही निबंध व  वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. दि.11 एप्रिल 2023 रोजी  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा

“सामाजिक समता पर्व” कार्यक्रमांतर्गत पथनाट्याच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांची जनजागृती

    अलिबाग,दि.19 (जिमाका):-  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023  या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन  “ सामाजिक समता पर्व ”  कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मागासवर्गीय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील पाच तालुक्यात शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी अलिबाग बीच, गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह अलिबाग श्री.संदिप कदम, श्रीमती उषा गुजेला, समतादूत श्रीमती रश्मी भोईर, अलिबाग. शुक्रवार, दि.14 एप्रिल 2023 रोजी एसटी बस स्थानक महाड, गृहपाल, मुलांचे शासकीय वसतिगृह, महाड श्री.अनिल मोरे, गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह महाड श्रीमती सुधा सावंत. मंगळवार, दि.18 एप्रिल 2023 रोजी एस.टी. बस स्थानक खोपोली, गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली-सुधागड श्रीम.मिनाक्षी येमले, समतादूत खालापूर श्रीमती मनिषा कळके, समतादूत पाली-सुधागड श्री.अमोल म्हात्रे. बुधवार, दि.19 एप्रिल 2023 एसटी बस स्थानक पनवेल, गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली-सुधागड श्रीम.मिनाक्षी येमले, समतादूत पनवेल श्री.सदानंद जाधव, समतादूत पनवेल श्रीमती रा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त “सलग 18 तास अभ्यासक्रम” उपक्रम संपन्न

    अलिबाग,दि.19(जिमाका):-   भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,अलिबाग-रायगड येथे  “ सलग 18 तास अभ्यासक्रम ”  उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.   डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिलेल्या अधिकारांमुळेच सर्वसामान्य व्यक्तीदेखील  शासकीय उच्च पदावर पोहोचू शकतो. या महामानवाचा आपण सदैव आदर्श ठेवला पाहिजे व शैक्षणिक जीवनात मुलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकराप्रमाणेच अभ्यास करायला पाहिजे, असा संदेश अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील यांनी यावेळी  दिला.    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अंजन गायकवाड, डॉ.सुजाता चहांदे, डॉ.आडके, डॉ.घुगे, डॉ.विशाल उबाळे, डॉ. शिल्पा नारायणकर, डॉ.वागमोडे, डॉ.शिंदे, डॉ.कासले, डॉ.पवार, डॉ.नाझिया, डॉ.श्रुती पांडे, डॉ.पंकज कांबळे, डॉ.सौरभ पाटील, डॉ. कृष्णा बडगिरे, डॉ.राऊत, डॉ.मनीष, डॉ.अंकिता ताठे, डॉ.प्रियांका आंबेकर, डॉ.अदिती थळे, मयूर, सुबोध यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी दिली आहे. 00000000

“सामाजिक न्याय पर्व” अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन

  अलिबाग, दि.19(जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त  “ सामाजिक न्याय पर्व ”  कार्यक्रमांतर्गत मंगळवार, दि. 25 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जंजिरा हॉल, पोलीस ग्राऊड, अलिबाग येथे या ठिकाणी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, सफाई कर्मचारी व त्यांचे पुनर्वसन कायदा 2013 जनजागृती, अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे, व्यसनमुक्ती प्रचार व प्रसार, या विषयांची कार्यशाळा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यशाळेसाठी समाज कल्याण, पोलीस विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सुनिल जाधव यांनी कळविले आहे. ०००००००

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेच्या लाभासाठी अर्ज सादर करावेत

    अलिबाग, दि.19(जिमाका) :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांना स्वयंरोजगारासाठी  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ विविध योजना राबवित असते. या महामंडळामार्फत राबवित असलेल्या योजनांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 50 टक्के अनुदान योजना-  प्रकल्प मर्यादा रु.50 हजार पर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार पर्यंत अनुदान देण्यात येते.  बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.  बीजभांडवल योजना-  प्रकल्प मर्यादा रु.50 हजार 1 ते 5 लाखपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीजभांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याज दराने देण्यात येते. राशीमध्ये महामंडळाचे अनुदानाचा रु. 10 हजारचा समावेश आहे,  बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व त्या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो, महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाचे आत करावी लागते, अर्जदारास 5 टक्के स्वतः चा सहभाग भरावयाचा आहे. अर्ज करण्यास आवश्यक पात्रता-  अर्जदार अनुसूच

“सामाजिक समता पर्व” कार्यक्रमांतर्गत जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी व समुपदेशन कार्यशाळा संपन्न

  अलिबाग,दि.19(जिमाका):-  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त  “ सामाजिक समता पर्व ”  दि.01 एप्रिल 2023 ते दि.02 मे 2023 या कालावधीत साजरा करण्याचे सामाजिक न्याय विभागाने ठरविले आहे. ‘सामाजिक समता पर्व' कार्यक्रमातंर्गत दि.18 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता श्री समर्थ कृपा वृध्दाश्रम, परहूरपाडा, ता.अलिबाग येथे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व समुपदेश कार्यशाळा संपन्न झाली. समर्थ कृपा वृध्दाश्रम, परहूर पाडा, ता.अलिबाग येथे जिल्हा रुग्णालय, अलिबाग चे डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी 50 जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये सर्वसाधारण, रक्त तपासणी, बी.पी., शुगर इ. तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच श्री सत्पाल लोणे, जनसेवा फाउंडेशन, पुणे यांनी जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक जागृती, उपचार, वैद्यकीय सुविधा, आहार विषयक, निवारा केंद्रे, वृध्दाश्रम, डे केअर सेंटर, विरंगुळा केंद्र, मेडिटेशन, जेष्ठासंबंधी साधने इ.बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले. या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ नागरिकांसाठी उत्कृष्ट काम करणारे संचालक, समर्थ कृपा वृ

अलिबाग तालुक्यात स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे सनद वाटप कार्यक्रम

    अलिबाग,दि.19(जिमाका):-  शासनाचा स्वामित्व योजना गावठाण भूमापन हा महत्त्वपूर्ण प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वीरित्या सुरु आहे.  या कामी संपूर्ण महाराष्ट्रात जनतेकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.  त्यानुसार रायगड जिल्ह्यातील उप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग या कार्यालयाकडील अलिबाग तालुक्यातील 140 गावाचे स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोन सर्व्हे झालेला आहे.  साधारण 80 गावांचे चौकशी काम पूर्ण झाले आहे.  तसेच चौकशी कामानुसार एकूण 13 गावाचे सनद (मालकी हक्काचा पुरावा) हा तयार झालेला असून ते सर्व घराचे मालक, धारक यांना वाटपाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.              अलिबाग तालुक्यातील संपूर्ण 140 गावांची सनद तयार करून पूर्ण शंभर टक्के लोकांना त्यांच्या घरापर्यंत सनद मे 23 अखेर पोहचविण्याचे उद्दिष्ट उपसंचालक भूमी अभिलेख कोकण प्रदेश, कोकण (मुंबई) श्री.जयंत निकम यांनी अलिबाग तालुक्याला दिलेले असून त्यानुषंगाने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग श्री.सचिन इंगळी यांच्या मार्गदर्शनानुसार अलिबाग तालुक्यात विशेष मोहीम घेऊन प्रत्येक गावात सनद वाटप कार्यक्रम सुरु केला आहे असून त्यास जनतेचा चांगला मिळत आहे.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत सागरमित्र पदाच्या तात्पुरत्या स्वरूपात नियुक्तीसाठी उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन

    अलिबाग,दि.18(जिमाका):-  प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत ‍जिल्ह्यात 45 मासळी उतरविण्याच्या केंद्रावर सागरमित्र या पदाची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे. मासळी उतरविण्याची केंद्रांची नावे, सागरमित्र नेमणूकीबाबत अटी व शर्ती आणि कार्ये पुढीलप्रमाणे आहेत.      मासळी उतरविण्याची केंद्रे :-   परवाना अधिकारी उरण कार्यक्षेत्र :-  उल्वे-मोहा, दिघोडे, केळवणे, वरेडी, करंजा, नवापाडा, मोरा, मोरावे-गव्हाण, हनुमान कोळीवाडा, आवरे.     परवाना अधिकारी अलिबाग कार्यक्षेत्र:-  धरमतर, अलिबाग,  थळ,  नवगाव, आग्राव, रेवस गदिना, सासवणे, वर्सोली चाळमाळा, साखर आक्षी, थेरोंडा, रेवदांडा.  परवाना अधिकारी मुरुड कार्यक्षेत्र :-   साळाव, कोर्लई, बोर्ली मांडला,न्हावे, चोरढे, नांदगांव-मजगांव, मुरुड, एकदरा, राजपुरी, खामदे, आगरदांडा.     परवाना अधिकारी श्रीवर्धन कार्यक्षेत्र :-  दिघी, वाशी, कुडगाव, आदगाव, मेंदडी, खरसई, पाभरे, खारगांव,  भरडखोल-दिवेआगार, बागमांडला, शेखाडी, जिवना, मूळगाव दांडा.   अटी व शर्ती पुढीलप्रमाणे :-  शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा मधून उत्तीर्ण असावे/असावी. ज्य

वातावरणातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी– जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

  अलिबाग,दि.17(जिमाका):-  सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याने उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे  आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी आवश्यकता नसल्यास नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नये. आपली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी केले आहे.    वातावरणातील तापमान प्रमाणाबाहेर वाढले की, शरीरातील तापमान नियंत्रण यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे, स्नायूंना आकडी येणे अशी विविध लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी घाबरून न जाता तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.    उष्माघात होवू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट वा चप्पलचा वापर करावा, प्रवास करताना पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी.   उन्हाळ्यात त्रास होवू लागल्यास तात्काळ जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा त

दुचाकी वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी तीनपट व नियमित शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्विकारणे व लिलाव कार्यपध्दती जाहीर

    अलिबाग,दि.17(जिमाका):-   उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चार चाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील त्यांनी दि.24 एप्रिल 2023 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30  ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जांमध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतिसह जमा करावा.  एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.24 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन वेळेत नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एका पेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्यांची नोंद घेऊन दि.25 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रकमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा. अतिरिक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रुपयाचा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षणचा विचार केला जाणार नाही.  या अर्जासाठी त्याच दिवशी सायं. 4.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवी

जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी मानिव अभिहस्तांतरण मोहीम अलिबाग तालुक्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी संपर्क साधावा

    अलिबाग,दि.17(जिमाका):-   अलिबाग तालुक्यातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्थांनी आपल्या संस्थेची इमारत सहकारी संस्था म्हणून ज्या जमिनीवर नोंदणीकृत आहे, ती जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी मानिव अभिहस्तांतरण मोहीम शासनाच्या सहकार विभागा मार्फत सुरू केली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील 31 मार्च 2023 अखेर 498 नोंदणीकृत गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. यापैकी अगदी कमी प्रमाणात गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अभिहस्तांतरण झाले आहे.  सहकार आयुक्त व निबंधक सहकार संस्था, पुणे यांच्या दि.24 मार्च 2023 रोजीच्या कार्यालयीन परिपत्रकानुसार निर्गमित परिपत्रकीय सूचना तथा शासनाच्या ध्येय धोरणानुसार प्रत्येक नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालील जमिनीची मालकी ही त्या संस्थेच्या नावे हस्तांतरित होणे यालाच अभिहस्तांतरण असे म्हणतात.  तथापि विकासक यांच्या असहकारामुळे किंवा संस्थेतील पदाधिकारी व सदनिकाधारक यांच्या अज्ञानामुळे किंवा याबाबत त्यांना ज्ञान न मिळाल्यामुळे आपल्या संस्थेची इमारत ज्या भूमीवर उभी आहे, त्या भूमीचे क्षेत्र आपल्या (संस्थेच्या) मालकीचे व्हावे यासाठी, नोंदणीकृत गृहनिर्माण स