दुचाकी वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी तीनपट व नियमित शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्विकारणे व लिलाव कार्यपध्दती जाहीर

 

 

अलिबाग,दि.17(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. यासाठी ज्यांना खाजगी चार चाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (तीनपट शुल्क) भरून हवे असतील त्यांनी दि.24 एप्रिल 2023 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30  ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जांमध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतिसह जमा करावा.  एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.24 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन वेळेत नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एका पेक्षा जास्त अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्यांची नोंद घेऊन दि.25 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रकमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा. अतिरिक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रुपयाचा असावा त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षणचा विचार केला जाणार नाही.  या अर्जासाठी त्याच दिवशी सायं. 4.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

 ज्या दुचाकी वाहनांना चारचाकी वाहनाच्या नोंदणी क्रमांकासाठी आलेल्या अर्जांचे नोंदणी क्रमांक वगळून आकर्षण तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी दि.25 एप्रिल 2023 रोजी कार्यालयीन वेळेस सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जांमध्ये कार्यालयाच्या खाजगी वाहन विभागात जमा करावेत. यामध्ये एकाच नंबरकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दि.25 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्ड लावण्यात येईल. त्यानुसार एकाच नंबरसाठी एकापेक्षा अर्ज असतील तर त्या अर्जदारांनी त्यांची नोंद घेऊन दि. 26 एप्रिल 2023 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी त्यांच्या इच्छेप्रमाणे जास्तीच्या रकमेचा डीडी बंद लिफाफ्यामध्ये कार्यालयात जमा करावा. अतिरिक्त धनाकर्षण कमीत कमी 301 रुपयाचा असावा. त्यापेक्षा कमी रकमेच्या धनाकर्षणचा विचार केला जाणार नाही. या अर्जासाठी त्या दिवशी सायं. 4.30  वाजता  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिलाव करण्यात येईल.

 डीडी Dy.RTO,PEN यांच्या नावे नॅशनलाईज, शेड्युल्ड बँकेचा असावा. तसेच तो दोन महिन्यांपेक्षा जास्त जुना नसावा. अर्जदाराने अर्जासोबत पॅनकार्ड व आधारकार्ड साक्षाकिंत प्रत जोडणे अनिवार्य राहील. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी (फक्त एकच डीडी) या सीलबंद पाकीटात जमा करावा. आकर्षण क्रमांकासाठी आलेल्या अर्जासोबत असणारे धनाकर्षण अर्ज स्वीकारणाऱ्या दिवसापासून दोन महिन्यापेक्षा जुने असलेले धनाकर्षनाचे अर्ज बाद केले जातील. तसेच विविध शुल्कापेक्षा कमी रकमेचे असलेले डीडी सुद्धा बाद केली जातील.

 एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी शासन जमा होईल. कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी, कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्यांचे समायोजन करता येणार नाही.

नवीन दुचाकी मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-तिप्पट शुल्क (चारचाकी) चे अर्ज स्विकारणे, सोमवार, दि.24 एप्रिल 2023, तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जांसाठी लिलाव, मंगळवार, दि.25 एप्रिल 2023, दुचाकी वाहनांसाठी अर्ज स्विकारणे, मंगळवार, दि.25 एप्रिल 2023, दुचाकी वाहनांसाठी आलेल्या अर्जांचा लिलाव, बुधवार, दि.26 एप्रिल 2023.

 आकर्षण क्रमांकासाठी आगाऊ स्वरूपात अर्ज स्विकारत असून चालू मालिका संपल्याशिवाय नवीन मालिका सुरू होणार नाही. तसेच आगाऊ प्रक्रियेमध्ये स्विकारलेल्या अर्जाच्या धनाकर्षणच्या पावत्या, जुन्या मालिकेतील पूर्ण नंबर संपल्याशिवाय फाडल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक