Posts

Showing posts from January 21, 2024

स्वामित्व योजनेंतर्गत गावांची सनद वाटप 2 लाख 86 हजार 550 रुपये सनद वसूल

    रायगड,दि.27(जिमाका):- दि.26 जानेवारी 2024 रोजी भारतीय 75 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण सर्वे झालेल्या अलिबाग तालुक्यातील मौजे-परहुरपाडा, भाकरवड, मान तर्फे झिराड, खंडाळे, लोणारे व नारंगी या गावांची सनद वाटप करण्यात आली.  उप अधीक्षक भूमी अभिलेख अलिबाग भोलाशंकर कोकने व शिरस्तेदार बाळासाहेब दुरगुडे यांनी विशेष लक्ष देऊन एकूण रक्कम 2 लाख 86 हजार 550 रुपये सनद वसूल केली आहे. ००००००

तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात येणाऱ्या पॅनलवरील विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    रायगड,दि.27(जिमाका):- फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 25 (3) नुसार रायगड जिल्ह्यातील न्यायालयांमधील शासनातर्फे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी विशिष्ट खटल्यांचे कामासाठी कार्यरत असलेल्या पॅनलला बरखास्त न करता नविन 12 (बारा) विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचे पॅनल तयार करण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे. यासाठीच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.:- विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदासाठी अर्जदार हा भारताचा नागरीक असावा, या पदासाठी अर्जदाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षाने शिथिलक्षम, या पदासाठी अर्जदार मान्यता प्राप्त विधी शाखेची पदवी धारण करणारा असावा व वकील म्हणून नोंदणी केलेला व कमीत कमी 05 वर्ष फौजदारी प्रकरणे चालवण्याचा वकीलीचा अनुभव असावा,  विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांची नेमणूक ही तात्पुरत्या स्वरुपाची असून, कोणतीही पूर्व सूचना न देता केव्हाही संपुष्टात आणण्यात येईल,  विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या नेमणूका फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 25

प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    रायगड,दि.26 (जिमाका) :-    जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात 75    व्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे    यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,  कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. एस. हरळय्या, आदी मान्यवर व इतर अधिकारी,कर्मचारी, नागरिक, पत्रकार, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                   सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे    यांनी 75 व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. ०००००

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध --महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड मैदानात महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    रायगड,दि.26(जिमाका):- समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार, दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तसेच रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे पर्व निरंतर सुरु रहावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी  केले.   पोलीस मुख्यालयाच्या मैदानात भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.  याप्रसंगी आयोजित दिमाखदार सोहळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड , जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के,  उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती स्नेहा उबाळे,  कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग जगदीश सुखदेवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा उद्योग केंद्राचे

नवमतदार नोंदणी हा राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य उद्देश--जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

Image
  रायगड,दि.25(जिमाका):-  लोकशाहीचा सर्वात सक्षम घटक मतदार असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविला पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपण मतदार असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे, असे सांगून आजच्या युवा पिढीला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मतदार नोंदणी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले. जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ,जेएसएम कॉलेज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने  14 वा राष्ट्रीय मतदार दिन नियोजन भवन येथे साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.             व्यासपीठावर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, जेएसएम कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सोनाली पाटील,  निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, अलिबागचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटनाचे अध्यक्ष साईनाथ पवार, युवा प्रतिनिधी तपस्वी गोंधळी यांसह मान्यवरांसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या विभागातील अधिकारी, कर्मचारी, जेएसएम महाविद्यालयातील शिक्षक, कर्

महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड,दि.25(जिमाका):-  राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार, दि.25 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 7.00 वा. शासकीय निवासस्थान, मुंबई येथून वाहनाने अलिबाग, जि.रायगड कडे प्रयाण. रात्रौ 10.00 वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. शुक्रवार,दि. 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8.35 वा. शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने पोलीस परेड ग्राऊंड, अलिबागकडे प्रयाण. सकाळी 9.15 वा. भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग. सकाळी 10.30 वा. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : मेघा चित्र मंदिर, अलिबाग. सकाळी 11.30 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने मांडवा जेट्टीकडे प्रयाण. दुपारी 12.00  वा. मांडवा जेट्टी येथे आगमन व स्पीड बोटीने मुंबईकडे प्रयाण. ००००००

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

    रायगड,दि.25(जिमाका):-  राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार, दि.27 जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार, दि.  27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वा. पलावा, डोंबिवली येथून शासकीय वाहनाने अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. दुपारी 3.00 वा. कमळ नागरी पतसंस्था, अलिबाग आणि सतिश धारप यांच्या विशेष प्रयत्नातून कमळ सेवा संस्था संचलित डायलिसिस सेंटर च्या शुभारंभ सोहळ्यास उपस्थिती. स्थळ : कमळ सेवा संस्था, म्हाडा कॉलनी, श्रीबाग नं.2 अलिबाग. दुपारी 3.30 वा अलिबाग येथून माणगाव, जि.रायगडकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा. माणगाव येथे आगमन व माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सी.बी.एस.ई.स्कूल च्या भूमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : अमित कॉम्प्लेक्स समोर, निजामपूर रोड, माणगाव. सायं.6.00 वा. माणगाव येथून पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण. ००००००

राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

    रायगड,दि.25(जिमाका):-   केंद्रशासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने राज्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री  ( Multipurpose Artificial Insemination Worker in Rural India (MAITRI)  म्हणून प्रशिक्षण द्यावयाचे आहे.  याकरिता जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पशुधन विकास अधिकारी (विस्तार) ,  पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन , रायगड-अलिबाग डॉ.सचिन देशपांडे  व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद रायगड डॉ.शामराव कदम यांनी केले आहे.  प्रशिक्षित व्यक्तीची कृत्रिम रेतन व अनुषंगीक कार्य करण्यासाठी नियुक्ती करावयाची आहे.  जेणेकरुन राज्यातील गायी-म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची व्याप्ती वाढेल व ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच त्या योगे दुग्धउत्पादनात वाढ होवून शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. हा प्रशिक्षण कार्यक्रम 3 महिने कालावधीचा असून यामध्ये 1 महिना क्लासरुम ट्रेनिंग व 2 महिने प्रॅक्टीकल ट्रेनिंगचा समावेश राहील.

पशुधनाच्या नोंदणीसाठी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

    रायगड,दि.25(जिमाका):- रायगड जिल्ह्यातील पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पशुधनास tagging भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी यांनी पशुधनास tagging व online नोंदणीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून आपल्या पशुधनाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, रायगड-अलिबाग डॉ.सचिन देशपांडे यांनी केले आहे. भारत पशुधन प्रणालीवर पशुधन नोंदणी (Animal Registration), पशुपालक नोंदणी (Owner Registration), पशुपालक हस्तांतरण नोंदणी (Owner Transfer) पशुधनाच्या नोंदीत बदल (Search and modify animal) ,कानातील tag बदल नोंदी (Tag change), पशुपालकांच्या नावातील बदल (Search and Modify Owner) या बाबींचा समवेश आहे. यासाठी आवश्यक tag जिल्ह्यात उपलब्ध आहेत. दि.05 जानेवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार दुध उत्पादक शेतकऱ्यांना गाय दुधासाठी प्रती लिटर रु. 5 /-अनुदान देय आहे. यासाठी  पात्र पशुधनास कानात Tagging करून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी  करणे अत्यावशक आहे. 0000000

कौटुंबिक न्यायालयाची भूमिका व मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज, सद्यस्थिती तसेच मराठी साहित्याच्या नजरेतून कुटुंबाचे महत्व या विषयांवर व्याख्यानाचे आयोजन

              रायगड,दि.25(जिमाका):-  कौटुंबिक न्यायालय, रायगड-अलिबाग आणि लायन्स क्लब श्रीबाग शाखा, अलिबाग, यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याच्या निमित्ताने कौटुंबिक न्यायालय, श्रीबाग, चेंढरे, कच्छी भवन, दुसरा मजला, अलिबाग, येथे सोमवार, दि. 29 जानेवारी रोजी सायं.4.00 ते 6.00 या वेळेत कौटुंबिक न्यायालयाची भूमिका व मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज, सद्यस्थिती तसेच मराठी साहित्याच्या नजरेतून कुटुंबाचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.               या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौटुंबिक न्यायालय, अलिबागच्या न्यायाधीश श्रीमती ए.ए शिंदे तर  प्रमुख वक्त्या म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा अलिबाग अध्यक्षा श्रीमती सुजाता पाटील असणार आहेत.  कार्यक्रमासाठी फाउन्डर प्रेसिडेन्ट, लायन्स क्लब श्रीबाग शाखा, अलिबाग लायन डॉ.अॅड. निहा राऊत व लायन्सक्लब श्रीबाग शाखा, आलिबाग अध्यक्ष  लायन संजय रावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. 00000000

जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

                 रायगड,दि.24(जिमाका):-जिल्हा स्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचे आज दि.25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वा.  नियोजन भवन,  जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे  आयोजन करण्यात आले,असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हानिवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी दिली आहे.               मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी प्रमाणे दि. 25 जानेवारी 2024  रोजीच्या 14 व्या राष्ट्रीय मतदार दिवसाकरिता "Nothing like voting. I vote for sure" हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला आहे. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय अलिबाग व निवडणूक साक्षरता मंडळ जे.एस.एम कॉलेज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.             दि. 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणुक आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपय

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस मुख्यालय मैदानावर महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न होणार ध्वजारोहण

    रायगड , दि.24(जिमाका):- भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ शुक्रवार ,   दि.26 जानेवारी 2024 रोजी  महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे  यांच्या हस्ते अलिबाग पोलीस मुख्यालय मैदान येथे सकाळी 9.15 वा.संपन्न होणार आहे.              तरी नागरिकांनी ,   प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी या समारंभासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,   असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ००००००

नेताजी सुभाषचंद्र बोस, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
         अलिबाग, दि. २३ (जिमाका):- महान स्वातंत्र्यसेनानी आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.       यावेळी उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विठ्ठल इनामदार,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक,नायब तहसीलदार श्री यादव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते. 0000000

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार याद्या प्रसिध्द मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ

Image
    रायगड (जिमाका)दि.23 :-  विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर 2023 च्या प्रारुप मतदार यादीत 58 हजार 203 मतदारांची नाव नोंदणी झाली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये 8 हजार 770 मतदारांची निव्वळ वाढ (Net Addition) होऊन एकूण मतदारांची संख्या 23 लाख 16 हजार 515 आहे. मतदार नोंदणी कार्यालयामध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. मतदारांनी मतदाता सेवा पोर्टल या संकेतस्थळावर जावून मतदार यादीतील आपले नाव तपासावे तसेच यादी नाव नसलेल्या नागरिकांनी 6 क्रमांकाचा अर्ज भरुन मताधिकारी सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे. यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्वाच्या निवडणूका घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी  सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यांत आली होती. जिल्ह्यात दि.01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षण