जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन

 

 

            रायगड,दि.24(जिमाका):-जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिवसाचे आज दि.25 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.00 वा.  नियोजन भवन,  जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे  आयोजन करण्यात आले,असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा उप जिल्हानिवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी दिली आहे.

              मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी प्रमाणे दि. 25 जानेवारी 2024  रोजीच्या 14 व्या राष्ट्रीय मतदार दिवसाकरिता "Nothing like voting. I vote for sure" हा विषय (Theme) आयोगाकडून देण्यात आला आहे. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय अलिबाग व निवडणूक साक्षरता मंडळ जे.एस.एम कॉलेज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            दि. 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. भारत निवडणुक आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणुक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरुक करण्यासाठी केला जातो.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक