Posts

Showing posts from June 28, 2020

एन.सी.आर.एम.पी. योजनेंतर्गत भूमिगत वीज वितरण वाहिनीच्या मंजूरीसाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी घेतली ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट

अलिबाग,जि.रायगड, दि.02 (जिमाका) :- निसर्ग चक्रीवादळाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्याला मोठा तडाखा दिला होता. या वादळात विद्युत खांबांचे प्रचंड नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. महाराष्ट्र राज्य वीज नियामक मंडळाने युध्द पातळीवर काम करून बऱ्याच ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत केला असून उर्वरीत ठिकाणी वीजपुरवठा लवकरच सुरू होईल. अलिबाग येथे नॅशनल सायक्लॉन रिस्क मिटीगेशन प्रोजेक्ट (एन.सी.आर.एम.पी.) अंतर्गत भूमिगत वाहिनीनुसार वीज वितरण व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. याच धर्तीवर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन शहर व लगतचा भाग, मुरूड शहर व लगतचा भाग, उरण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहर व लगतचा भाग, त्याचप्रमाणे गुहागर शहर व लगतचा भाग येथे एन.सी.आर.एम.पी. योजनेंतर्गत भूमिगत वीज वितरण वाहिनी टाकण्याचे काम मंजूर होणेबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री श्री. नितीन राऊत यांची मंत्रालयात भेट घेवून विनंती केली. तसेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांचीही भेट घेऊन त्यांना एन.सी.आर.एम.पी. योजनेंतर्गत भूमिगत वीज वितरण वाहिनी टाक

कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणे Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

वृत्त क्रमांक :- 904                                                                     दिनांक :-02 जुलै 2020 अलिबाग,जि.रायगड, दि.02 (जिमाका) :   जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील विविध ठिकाणी करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने ज्या ठिकाणी अशा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत, ती करोना बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहेत :- मौजे कर्जत, ता.कर्जत येथील अमिरा पॅलेस, दुसरा मजला. मौजे कर्जत येथील आनंद नगर, ए विंग, तळमजला.   मौजे पाली ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा परिसर, उत्तर सचिन धर्मा गायकर यांचे घरापर्यंत, दक्षिणेस पाली गाव ते पाली वाडीकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत, पूर्वेस पाली गाव अंतर्गत रस्त्यापर्यंत, पश्चिमेस मधूकर हरिभाऊ गायकर यांच्या घरापर्यंत.   मौजे देऊळवाडी ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा परिसर, उत्तर-संजय बागा इतकर यांचे घरापर्यंत, दक्षिणेस-महेंद्र देशमुख यांचे घरापर्यंत, पूर्वेस-शैला दिवेकर यांचे घरापर्यंत, पश्चिमेस-हरिश्चंद्र ध्वनी यांचे घरापर्यंत.   मौजे वाकस ता.कर्जत येथील घर व घराच्या आजूबाजूचा परिसर, उत्तर-बुधाजी

कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 2 हजार 448जणांनी केली करोनावर मात

वृत्त क्रमांक :- 903                                                            दिनांक :- 01 जुलै 2020 “  अलिबाग,जि.रायगड, (जिमाका) दि.1 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 2 हजार 448  रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 266 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-808, पनवेल ग्रामीण-351, उरण-64, खालापूर-72, कर्जत-64, पेण-66, अलिबाग-53, मुरुड-9, माणगाव-40, तळा-3, रोहा-71,सुधागड-3, श्रीवर्धन-14, महाड-9, पोलादपूर-3 अशी एकूण 1 हजार 630 झाली आहे.     कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 392 , पनवेल ग्रामीण-356, उरण-219, खालापूर-19, कर्जत-75, पेण-63, अलिबाग-83, मुरुड-17, माणगाव-67, तळा-12, रोहा-40, सुधागड-2, श्रीवर्धन-10, म्हसळा-29, महाड-36, पोलादपूर-28 अशी एकूण 2 हजार 448 आहे.           आज दिवसभरातही पनवेल मनपा-60,

मासेमारी बंदी कालावधीत यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करताना आढळल्यास होणार कठोर कारवाई

वृत्त क्रमांक :- 902                                                              दिनांक :- 01 जुलै 2020 अलिबाग, जि.रायगड (जिमाका) दि.01 :- महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 अंतर्गत मासेमारी बंदी कालावधी दि.1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीकरिता शासनाच्या कृषी व पदुम आणि मत्स्यव्यवसाय विभागाने दि.1 जून ते 31 जुलै (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) मासेमारी बंदी कालावधी निश्चित केला आहे.   यानुसार राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलांपर्यत) यांत्रिकी मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आल्याचे यापूर्वी सर्व सागरी मच्छिमारी संस्थांना पत्राद्वारे तसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे जाहीर आवाहन केले होते, असे असतानाही पावसाळी बंदी कालावधीत मासेमारी चालू असल्याच्या तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.             या तक्रारीच्या अनुषंगाने मासेमारी बंदी कालावधीत यापुढे कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करताना आढळल्यास त्या नौकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच त्या नौकांचा मासेमारी परवाना रद्द

एम.एम.आर.डी.ए. कडील रिक्तपदांच्या भरतीकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

              अलिबाग, जि.रायगड (जिमाका) दि.01 :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर कार्यालय, मुंबई यांच्यामार्फत कुशल/अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   हा मेळावा दिनांक 08 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10.00   ते सायंकाळी 06.00   या वेळेत फक्त कौशल्य विकास व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.   या मेळाव्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, (M.M.R.D.A.) वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई- यांच्याकडील विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. या पदांमध्ये गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्सींग करणारे),   फिटर (बार बेंडींग व फिक्सींग करणारे), वेल्डर, ईलेक्ट्रीशियन, वायरमन, आणि अकुशल कामगार (श्रमीक) या पदांचा समावेश आहे.   जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता   विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेबपोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job)-Jobseeker

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त अभिवादन

       अलिबाग, जि.रायगड (जिमाका) दि.01 :- हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे. यावेळी तहसिलदार सतिश कदम, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

“पिक विमा उतरवा आपत्तीपासून सावरा”

       अलिबाग, जि.रायगड (जिमाका) दि.01 :- शासनाने भात व नागली पिकासाठी पिक विमा योजना सुरु केलेली आहे. रायगड जिल्ह्याकरीता एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी नेमलेली आहे. भात पिकासाठी विमा संरक्षित एक एकर भात पिकासाठी रु.18 हजार 200/- असून विमा हप्ता रक्कम रु. 364/- म्हणजे प्रति गुंठयाला साधारणपणे रु. 10/- आहे. तसेच नागली या पिकासाठी विमा संरक्षित एक एकर नागली पिकासाठी रु. 8 हजार   असून विम्याचा हप्ता रक्कम रु.160/- म्हणजे प्रति गुंठयाला साधारणपणे रु.4/- आहे. पावसातील खंड, पूर, दुष्काळ यामुळे शेतीचे नुकसान होऊन उत्पादन 50 टक्के पेक्षा कमी आल्यास विमा संरक्षण मिळते. विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख दि.31 जुलै 2020 आहे. गेल्या वर्षी रायगड जिल्हयामध्ये एकूण 2 हजार 190 शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. एक एकर भात पिक क्षेत्राला रु. 18 हजार एवढी रक्कम मिळाली आहे. या तुलनेत आपत्ती अर्थसहाय्य फक्त रु.3 हजार 200   एवढेच मिळालेले आहे. त्यामुळे पिक विमा उतरविणे फायद्याचे आहे. यासाठी शेतकऱ्

नव तंत्रज्ञानाने नारळ, सुपारीच्या बागा व आंबा, काजूच्या पुनर्लागवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
अलिबाग,जि.रायगड, दि.29 (जिमाका) : निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सर्व भागांना तडाखा बसून मोठया प्रमाणावर नारळ, सुपारीच्या बागांचे, आंबा, काजूच्या झाडांचे   मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नव तंत्रज्ञानाने जिल्ह्यातील नारळ, सुपारीच्या बागा व आंबा, काजूच्या पुनर्लागवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथे केले. निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नारळ, सुपारी फळबागांची पुनर्लागवड तसेच त्या संबंधीचे नवीन तंत्रज्ञान व शासकीय योजना याबाबतची बैठक उपविभागीय कार्यालय, श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीसाठी खासदार सुनिल तटकरे, कृषी, पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, श्रीवर्धन नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, दर्शन विचारे, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती प्रगती अदावडे, पंचायत समिती सदस्य मंगेश कोमनाक, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, उपसंचालक फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे श्री.एस.व्ही.भालेकर, संचालक, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, एस.बी.भगत, प्रांताधिकारी