Posts

Showing posts from April 12, 2020

उरण तालुक्यातील जासई हद्दीतील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                      अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जासई हद्दीतील बिल्डींग E व F, रेल्वे कॉलनी, जासई गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

कोविड-19- करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! दि.01 मार्च ते 17 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांची माहिती जाहीर

अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) :   जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 17 एप्रिल 2020     दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधी नागरिकांचा तपशिल कळविला आहे, तो पुढीलप्रमाणे- सद्य:स्थितीत करोना ‘+’ ve     असलेल्या नागरिकांची संख्या-38 (पनवेल मनपा-28, पनवेल तालुका-5,उरण तालुका-3, श्रीवर्धन-1, पोलादपूर-1), मुंबई फोर्टीज हॉस्पिटल, मुलूंड येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून त्याची     तब्येतीची स्थिती गंभीर आहे.     उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक 24 असून यातील सर्व दाखल रुग्णांची तब्येतीची स्थिती उत्तम आहे. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, वाशी येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या     नागरिकांची संख्या-02 असून या एका नागरिकाच्या तब्येतीची स्थिती उत्तम असून दुसऱ्या नागरिकाच्या तब्येतीची स्थिती गंभीर आहे. सेव्हन हिल्स रुग्णालय, मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक-03 असून दाखल रुग्णांच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. जोगेश्वरी मुंबई येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक-01 असून     दाखल रुग्णांच्या तब्येतीची स्थिती उत्तम आहे. भाभा रूग्णालय,

‘रमजान’ मध्ये मुस्लिम बांधवांनी घरातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करावे करोना प्रादूर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

                                                 अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.   करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले आहे. करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक विलगीकरणाच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशिदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ

पनवेल महानगरपालिका हद्दीतील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे प्रशासनाला आदेश

अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 नुसार संपूर्ण राज्यात दि. 3 मे 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता तेथील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा देणारे धान्य दुकानदार, मेडीकल स्टोअर्स, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते आदींची तात्काळ करोना चाचणी करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पनवेल मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील ज्या दुकानदारांची करोना चाचणी झालेली आहे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी ते बाधित नसल्याचे निश्चित केले आहे, त्याच ठिकाणाहून वस्तू विकत घ्यावी. जेणेकरून करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी   सहकार्य मिळेल, शिवाय नागरिकांनी बेजबाबदारपणे न वागता घरातच राहावे, शासन या घटनेबाबत गंभीर दखल घेत असून   नियमांचा भंग करणाऱ्या नागरिकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा प्रशासनाला दि

पोलादपूर तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                      अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील पोलादपूर   तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र.2- हनुमाननगर, ग्रामीण रुग्णालय परिसर, पोलादपूर, प्रभाग क्र.5- बौध्दवाडी, भैरवनाथनगर (पश्चिमेकडील भाग), प्रभाग क्र.6- प्रभातनगर, जाखमाता नगर, गोकूळनगर, सैनिकनगर व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण र

सोशल मीडियावर मेसेजेस् फॉरवर्ड करताना राहा दक्ष..! महाराष्ट्र सायबरचे आपल्यावर आहे लक्ष..!

विशेष लेख-8                                                                  दि.18 एप्रिल 2020 “ करोना विषाणू..कोविड-19 ” काळजी करू नका.. काळजी घ्या !     सध्याच्या करोना महामारीच्या व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सोशल   मीडियावर चुकीचे मेसेजेस् फिरत आहेत. त्यात प्रामुख्याने व्हाट्सॲपवर अफवा पसरविणारे चुकीचे मेसेजेस्, फोटोज्, व्हीडिओज्, पोस्टस् सारासार विचार न करता फॉरवर्ड केले जात आहेत. महाराष्ट्र सायबर व्हॉट्सॲप या मेसेजिंग प्लॅटफॉर्म वरील सर्व ग्रुप सदस्य, ग्रुप ॲडमिन्स, ग्रुप निर्माते (Creators/Owners) यांच्या करिता विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय, महाराष्ट्र सायबर यांच्या वतीने मार्गदर्शिका प्रसारित करण्यात आली आहे . चला तर जाणून घेऊया… त्यातील ठळक मुद्दे… तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुपचे सदस्य असला तर हे करावे : ·          चुकीच्या/ खोट्या बातम्या द्वेष निर्माण करु शकणारी भाषणे व अशा प्रकारची माहिती ग्रुपवर पोस्ट करु नये. ·          आपल्या ग्रपुमधील जर अन्य कोणी सदस्याने अशी माहिती त्या ग्रुपवर पाठविली तर ती आपण अज

करोना विषाणू प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी संसाधने उपलब्ध

अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : करोना विषाणू प्रादूर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी   आरोग्य विभागाकडून तसेच काही सामाजिक संस्थाकडून जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे विविध संसाधने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ही संसाधने किती प्रमाणात मिळाली व त्याचे वितरण कोणाकोणाला झाले, त्याची माहिती पुढीलप्रमाणे--             पीपीई किट- प्राप्त संख्या 1 हजार 377, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 987, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक -390, एन-95 मास्क- प्राप्त संख्या 12   हजार 080, ,   ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 1 हजार 680, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक – 10 हजार 400, सॅनिटायजर (500 मिली)- प्राप्त संख्या 1 हजार 500, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 300, जिल्हा रुग्णालयाकडे शिल्लक -1 हजार 200, हायड्रॉक्झि-क्लोरोक्विन गोळया- प्राप्त संख्या 12 हजार 800, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय यांना पुरविण्यात आलेली संख्या- 6 हजार 800, जिल्हा रुग्

पनवेल तालुक्यातील उलवे मधील सेक्टर 20 व आजूबाजूचा परिसर Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित

                                      अलिबाग, जि. रायगड, दि.18 (जिमाका) : जिल्ह्यातील पनवेल   तालुक्यातील उलवे येथील साई गणेश रेसिडेन्सी बिल्डिंग, सेक्टर-20, प्लॉट क्र.113 व त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी दि.4 मे 2020 पर्यंत हे क्षेत्र Containment Zone (करोना विषाणू बाधित क्षेत्र) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड   श्रीमती निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.    या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 71, 139 तसचे भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड तथा जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी कळविले आहे. 0000

दि.01 मार्च ते 16 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

कोविड-19- करोना विषाणू ” काळजी करू नका..काळजी घ्या ! अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 16 एप्रिल 2020   दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve   नागरिकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 589. निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 801, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-754, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-0. मयत नागरिकांची संख्या-01, सद्य:स्थितीत करोना ‘+’ ve   असलेल्या नागरिकांची संख्या-33 (पनवेल मनपा-26, पनवेल तालुका-4,उरण तालुका-2, श्रीवर्धन-1), मुंबई फोर्टीज हॉस्पिटल, मुलूंड येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून त्याची   तब्येतीची स्थिती गंभीर आहे.   उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक 24 असून यातील सर्व दाखल रुग्णांची तब्येतीची स्थिती उत्तम आह

शेजारधर्माची जाणीव ठेवत पशूसंवर्धन विभागाने परजिल्ह्यातील मजूरांच्या चेहऱ्यावर फुलविले हसू मजूरांसहित त्यांच्या पशूधनाच्या खाद्याचाही सोडविला प्रश्न

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.17 (जिमाका) : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडी व पाचाड येथे किल्ल्याच्या कामासाठी परजिल्ह्यातून आलेले कामगार अडकून राहिलेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पशूधनही (90 गाढवे) अडकून पडलेली होती. याची दखल जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी तात्काळ घेवून पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. म्हस्के यांना हे कामगार व त्यांच्या पशूधनासाठी तातडीने मदत उपलब्ध करून देण्याविषयी आदेश दिले. पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.अर्ले हे तात्काळ कामाला लागले, त्यांनी क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले व   स्थानिक स्तरावरून मदतीचे नियोजन करुन या मजूरांसाठी अन्नधान्य व त्यांच्या पशूधनासाठी अवघ्या   3 तासात चारा उपलब्ध करून देण्यास यश मिळविले. यात विशेष उल्लेख म्हणजे छत्री निजामपूरचे सरपंच प्रेरणा प्रभाकर सावंत, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.दत्तात्रय सोनावळे आणि ग्रामसेवक विजय जाधव, पशूधन पर्यवेक्षक मंजुषा गायकवाड, शिवराम दर्शने यांनी अधिक प्रयत्न करुन या मजूरांचा अन्नधान्याचा व त्यांच्या पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न सो

लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य पुरवठा किंवा स्वस्त धान्य दुकानांविषयी मदत किंवा मार्गदर्शनासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्र.जाहीर

वृत्त क्रमांक :- 189                                                                                  दिनांक :- 16 एप्रिल 2020 अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका) : करोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथ रोग अधिनियम 1897 च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या इतर सर्व तरतुदीनुसार संपूर्ण राज्यात    दि.14 एप्रिल 2020 या तारखेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.   मात्र आता लॉकडाऊनचा कालावधी दि.3 मे पर्यंत वाढविण्यात आल्याने यापुढेही दि.14 एप्रिल 2020 रोजीच्या रात्री 12.00 पासून ते दि.03 मे 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे . लॉकडाऊन दरम्यान अन्नधान्य पुरवठा किंवा स्वस्त धान्य दुकानांविषयी मदत किंवा मार्गदर्शनासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा पुरवठा अधिकारी, मधुकर बोडके-9004711999, कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02141-222087/222097, व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी, श्री.गोविंद वाकडे, मो.9762813831 यांच्याशी तर तालुकास्तरीय मदतीसाठी वा मार्गदर्शनासाठी स

दि.01 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांची माहिती जाहीर

अलिबाग,दि.16(जिमाका) : जे नागरीक दि.01 मार्च ते 15 एप्रिल 2020   दरम्यान परदेश प्रवास करुन जिल्ह्यात परतले आहेत, त्या प्रवाशांबद्दलचा तपशिल जिल्हा प्रशासनाने कळविला आहे. तो पुढीलप्रमाणे- एकूण परदेश प्रवासावरुन परतलेले व करोना ‘+’ ve   नागरिकांच्या संपर्कात आल्याने निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 1 हजार 989. निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubation कालावधी पूर्ण केलेले नागरिक- 1 हजार 522, घरामध्ये अलगीकरणात (Home Quarantine) असलेले नागरिक-439, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये (Institutional Quarantine) असलेले नागरीक-0. मयत नागरिकांची संख्या-01, सद्य:स्थितीत करोना ‘+’ ve   असलेल्या नागरिकांची संख्या-27 (पनवेल मनपा-21, पनवेल तालुका-4,उरण तालुका-2), मुंबई फोर्टीज हॉस्पिटल, मुलूंड येथे विलगीकरण कक्षात दाखल नागरीक-01 असून त्याची   तब्येतीची स्थिती गंभीर आहे.   उप जिल्हा रुग्णालय पनवेल येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेले नागरीक 18 असून यातील सर्व दाखल रुग्णांची तब्येतीची स्थिती उत्तम आहे. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, वाशी येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या   नागर

पीडीलाईट इंडस्ट्रियल लिमिटेड यांच्या वतीने रु.25 लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द

Image
अलिबाग,जि.रायगड.दि.16 (जिमाका )–करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला मदत म्हणून पीडीलाईट इंडस्ट्रियल लिमिटेड महाड,तळोजा व इस्ट कामोठे यांनी जिल्हा आपत्ती प्रतिसाद सहाय्यता निधी करिता 25 लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे   आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द केला.        राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल   जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहनही केले आहे . 000000

जिल्ह्यातील कोणताही पात्र शिधापत्रिकाधारक अन्नधान्याच्या लाभापासून वंचित राहणार नाही -जिल्हाधिकारी निधी चौधरी

अलिबाग, जि. रायगड, दि.16 (जिमाका) : करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू आहे . या लॉकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र शिधापत्रिकाधारकांना माहे एप्रिल , मे व जून 2020 मध्ये दरमहा नियमित योजना निहाय अन्नधान्य वितरीत करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत . तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने च्या अंत्योदय अन्नयोजना व प्राधान्य कुटूंब योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ माहे एप्रिल , मे व जून 2020 महिन्यात दरमहा त्या - त्या महिन्यात वितरण करणाचे शासनाचे निर्देश आहेत .                राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांसाठीही शासनाने प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य माहे मे व जून 2020 या दोन महिन्यांसाठी दरमहा त्या त्या महिन्यात वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत .               रायगड जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटूंब  शिधापत्रिकाधारकासाठी दरमहा वितरीत