पीडीलाईट इंडस्ट्रियल लिमिटेड यांच्या वतीने रु.25 लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द




अलिबाग,जि.रायगड.दि.16 (जिमाका)–करोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाला मदत म्हणून पीडीलाईट इंडस्ट्रियल लिमिटेड महाड,तळोजा व इस्ट कामोठे यांनी जिल्हा आपत्ती प्रतिसाद सहाय्यता निधी करिता 25 लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे  आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुपूर्द केला.
       राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल  जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे,असे आवाहनही केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक