Posts

Showing posts from November 19, 2023

रायगड जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रा रथास जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले मार्गस्थ

Image
    रायगड दि.23(जिमाका):-  भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा दि.15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने विकसित भारत संकल्प यात्रा योजनेच्या रथाला आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी  डॉ.योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.                यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदींसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरुकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद वैयक्तिक कथा/अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे ही  विक

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात एस.एन.सी.यु.कक्ष (नवजात बालक कक्ष) कार्यान्वित

  रायगड दि.23(जिमाका):-  जिल्हा रुग्णालयाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या  इमारतीच्या एन.एच.एम.  अंतर्गत अत्याधुनिक   एस.एन.सी.यु.कक्ष (नवजात बालक कक्ष)   नवीन कक्ष दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली आहे. या नवीन कक्षाला यंदाच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण झाली असून या ठिकाणी नवजात बालकांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्याचे  काम सुरु आहे. नवजात बालकांमध्ये होणारे आजार जसे कमी दिवसांच्या कालावधीत जन्माला आलेले बाळ, कावीळ, जन्मतः श्वासघेण्यास त्रास होणे, जन्मतः मातेच्या पोटात शी गिळणे,जन्मतः वंग असणे, आकडी येणे  अशा विविध स्वरूपाच्या आजारांवर उपचार केले जातात. मागील 10 वर्षाच्या कालावधीत  एस.एन.सी.यु.माध्यमातून 9 हजार 358 नवजात बालकांना नवजीवन मिळाले आहेत. तसेच अंदाजे 2 हजार कमी दिवसांची बालके बरी होऊन गेली आहेत. येथे दर आठवड्याला नवजात बालकांची आरओपी (डोळ्यांची) तपासणी कानाची बेरा व ओएइ तपासणी एअमौयु केलेल्या संस्थामार्फत  करण्यात येते.  तसेच new born Screening करण्यात  येते.  तसेच यामध्ये रक्तदोष  आढळल्यास योग्य उपचार द

48 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांचे हस्ते उद्घाटन संपन्न

Image
    रायगड दि.22(जिमाका) :-  रायगड पोलीस विभागातर्फे सरखेल कान्होजी आंग्रे क्रीडा नगरी, पोलीस मुख्यालय अलिबाग येथे आयोजित 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 स्पर्धेचे उद्घाटन  महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते ज्योत पेटवून व हवेत फुगे उडवून उद्घाटन संपन्न झाले.                यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा नवी मुंबई श्री.काकडे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप वनसंरक्षक राहुल पाटील आदींसह पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.             यावेळी महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, 48 वी कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा-2023 रायगड जिल्ह्यामध्ये संपन्न होत असून रायगडकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.  पोलीस विभागाचे क्रीडा क्षेत्राशी अतुट व जिव्हाळयाचे  नाते आहे.  पुढील काळात अधिकाधिक चांगले खेळाडू तयार होवून पोलीस विभागाचे नाव उंचवावे.  पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना  वर्षांचे बारा महिने

“ब्लॅक स्पॉट” वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाय कराव्यात -- जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

Image
  रायगड,दि.21(जिमाका):-   रायगड जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात निश्चित करण्यात आलेल्या  “ ब्लॅक स्पॉटस् ”  ची संबंधित विभागांनी तातडीने पाहणी करून  “ ब्लॅक स्पॉटस् ”  वरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी संबंधित विभागांच्या उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात रस्ता सुरक्षा समिती आढावा बैठक  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे  अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अधीक्षक अभियंता,  सार्वजनिक बांधकाम मंडळ कोकण भवन, नवीमुंबई श्रीमती सुषमा गायकवाड,  जिल्हा नियेाजन अधिकारी ज.द.मेहत्रे,  कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे, पनवेल उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पेण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते, एमएसआरडीसी मुंबई बांद्रा चेतन वाणी, एमएसआरडीसी पुणे सी.जी.जाधव  आदींसह  सार्वजनिक बांधकाम विभाग, उप प्रादेशिक परिवहन, राष्ट्रीय महामार्ग व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित

दि.24 नोव्हेंबर रोजी युवा महोत्सवाचे आयोजन युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

    रायगड दि.20(जिमाका):-  युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन शासनाच्या वतीने करण्यात येते. राज्यात सन 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नेहरु युवा केंद्र व कृषी आयुक्तालय महाराष्ट्र राज्या यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येकस्तरावर विजयी होणारे युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी रायगड जिल्ह्यातील युवक युवतींना जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे माध्यमातून प्राप्त होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 घोषित केलेले असल्याने युवा महोत्वासाठी महाराष्ट्र राज्यात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. वयोगट व सहभागा

मराठा आरक्षणासंदर्भात कागदपत्री पुरावे जिल्हयातील नागरिकांना सादर करण्याचे आवाहन दस्तावेज जुने अभिलेखे कागदपत्री पुरावे स्विकारण्यासाठी तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन

  रायगड दि.20(जिमाका):-  मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमूर्ती श्री. संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे .  शासन निर्णयान्वये शासनाचे विविध विभागामार्फत जातप्रमाणपत्र वितरित करण्याकरीता पुरावे संकलीत करणेचे काम प्रगतीपथावर आहे. त्याअनुषगाने जिल्हयातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्वीकारण्यात येणार आहेत.  अधिक व्यापक कामकाज होणेकरीता नागरीकांमार्फत त्यांच स्तरावर असलेले पुरावे सादर करणे सोईचे होईल.             रायगड जिल्हयातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इतर जुने अभिलेखे स्विकारण्याची येणार आहेत. सदर उपलब्ध पुरावे तालुक्यातील तहसिलस्तरावरील स्थापित विशेष कक्षात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात दि. 21/11/2023 ते 24/11/2023 या काला

अलिबाग बस स्थानकात प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून मतदार नोंदणी विषयक जनजागृती

Image
    रायगड दि.20(जिमाका):- जिल्हाधिकारी कार्यालय तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या माध्यमातून विशेष संक्षिप्त पुनर्नरीक्षण कार्यक्रम सन-2024 अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अलिबाग बस स्थानकात (दि.18 नोव्हेंबर ) रोजी प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी मतदार नोंदणी विषयक जनजागृती केली. आपला मताधिकार गमावू नका जर तुम्ही एक जानेवारी 2024 किंवा त्याआधी 18 वर्षाचे होणार असाल तर दिनांक 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 दरम्यान होणाऱ्या विशेष संक्षिप्त पुननिरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी करा, आवश्यक असल्यास मतदार यादीतल्या तपशीला दुरुस्त्या करा तसेच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही ते तपासा ऑनलाइन नोंदणीसाठी वोटर सर्विस पोर्टलला भेट द्या किंवा वोटर हेल्पलाइन हे मोबाईल ॲप वापरा अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालय किंवा तहसील कार्यालयाला भेट द्या किंवा 1950 या वोटर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा.  या मोहिमेत नव मतदारांनी तसेच महिलांनी जास्तीत-जास्त प्रमाणात मतदार नोंदणी करावी असा

जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेला सुरुवात मोहिमेला सुरुवात

  रायगड दि.20 (जिमाका):-  जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेला आज पासून सुरुवात करण्यात आली आहे. ही मोहिम दि.6 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान आशासेविका, स्वंयसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणार आहे. जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसुत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे पाटील व सहाय्यक संचालक आरोग्यसेवा कुष्ठरोग डॉ.प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत 354 पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली 1 हजार 913 पथके स्थापन करण्यात आली आहेत.   कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 24 लाख 56 हजार 871 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, गृहभेटी दरम्यान 5 लाख 69 हजार 492 घरांचे भेटीचे नियोजन केले आहे. 1 हजार 958 पथके तयार करण्यात आली आहेत. मोहिमेंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठ

विकसित भारत संकल्प यात्रा मोहिम केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा -संचालक अणुऊर्जा विभाग इ.रविंद्रन

Image
    रायगड दि.20 (जिमाका):-  केंद्र शासनाच्या  योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. यासाठी शहरी भागाबरोबर ग्रामीणस्तरावर अधिक काम करा, अशा सूचना अणुऊर्जा विभागाचे संचालक श्री.इ.रविंद्रन यांनी दिल्या.   भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यत वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून ही यात्रा दि.15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत पार पडणार आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केलेले अणुऊर्जा विभागाचे संचालक श्री.इ.रविंद्रन (भा.प्र.से) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आढावा घेतला.                 यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा नियेाजन अधिकारी ज.द.मेहत्रे, उपजिल्हाधिकारी सा.प्र. विठ्ठल इनामदार आदींसह विविधि संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.