राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालयात एस.एन.सी.यु.कक्ष (नवजात बालक कक्ष) कार्यान्वित

 

रायगड दि.23(जिमाका):- जिल्हा रुग्णालयाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या  इमारतीच्या एन.एच.एम.  अंतर्गत अत्याधुनिक एस.एन.सी.यु.कक्ष (नवजात बालक कक्ष) नवीन कक्ष दि.17 नोव्हेंबर 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी दिली आहे.

या नवीन कक्षाला यंदाच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण झाली असून या ठिकाणी नवजात बालकांना गुणवत्तापूर्वक सेवा देण्याचे  काम सुरु आहे. नवजात बालकांमध्ये होणारे आजार जसे कमी दिवसांच्या कालावधीत जन्माला आलेले बाळ, कावीळ, जन्मतः श्वासघेण्यास त्रास होणे, जन्मतः मातेच्या पोटात शी गिळणे,जन्मतः वंग असणे, आकडी येणे  अशा विविध स्वरूपाच्या आजारांवर उपचार केले जातात.

मागील 10 वर्षाच्या कालावधीत  एस.एन.सी.यु.माध्यमातून 9 हजार 358 नवजात बालकांना नवजीवन मिळाले आहेत. तसेच अंदाजे 2 हजार कमी दिवसांची बालके बरी होऊन गेली आहेत. येथे दर आठवड्याला नवजात बालकांची आरओपी (डोळ्यांची) तपासणी कानाची बेरा व ओएइ तपासणी एअमौयु केलेल्या संस्थामार्फत  करण्यात येते.  तसेच new born Screening करण्यात  येते.  तसेच यामध्ये रक्तदोष  आढळल्यास योग्य उपचार देण्यात येतात. पुढील संभाव्य धोके टाळण्यास मदत होते.  तसेच जन्मजात व्यंग याचे देखील रोग निदान करून डीईआयसी  मार्फत पुढील संदर्भात सेवा व उपचार केले जातात. आजपर्यंत याच फायदा अनेक नवजात बालकांना झाला आहे. त्यामुळे मृत्युदर कमी होण्यास मदत झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या  ठिकाणी असल्यामुळे सर्व तालुक्यामधून नवजात बालके उपचारकरिता येथे येत असतात.

यामध्ये नवीन एस.एन.सी.यु.ची मान्यता पाच तालुके श्रीवर्धन, माणगाव, कर्जत, रोहा, महाड या ठिकाणी कार्यान्वित करण्याकरिता शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी सद्य:स्थितीत सन 2025-26 वर्षाकरिता एका एस.एन.सी.यु. ची मान्यता महाड येथे मिळाली आहे. जेणे करून तेथील नवजात बालकांना योग्यरितीने उपचार व आरोग्य सेवा मिळावी हा या मागचा उद्देश आहे .

या एस.एन.सी.यु.च्या उत्तम कामकाज मध्ये अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शीतल जोशी-घुगे,बालरोग तज्ञ डॉ.सागर खेदु,अधिसेविका श्रीमती अनिता भोपी यांच्या मार्गदर्शना खाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष पाटील, डॉ.प्रितम वर्सोलकर एस.एन.सी.यु.परिसेविका, बालरोग तज्ञ परिचारिका, एस.एन.सी.यु.,अधिपरिचारिका तसेच स्वच्छता सेवक, सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने जिल्हा रुग्णालय अलिबाग येथील एस.एन.सी.यु. कक्षाने आपल्या उत्तम कामगिरी ने  10 वर्षांचा  कालखंड पूर्ण केला आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक