जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न खरीप हंगामात कृषी विभागाने शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होण्याची दक्षता घ्यावी --जिल्हाधिकारी किशन जावळे
.jpeg)
रायगड (जिमाका)दि.8 :- आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते. बैठकीला खा.धैर्यशील पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी जिल्हा सत्यजित बढे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदी उपस्थित होते. खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन आवश्यक आहे. पिक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्य...