पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन ठिकाणी स्थलांतरीत
रायगड,(जिमाका)दि.06:- प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पनवेल हे कार्यालय दि. 5 मे 2025 पासून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल,व्हॅली शिल्प को-ऑप. हौ.सो.,बिल्डिंग क्र. एच-1, दुसरा मजला,सेक्टर 36, खारघर नोड,ता. पनवेल, जि. रायगड – 410210 ई-मेल: rto.46-mh@gov.in येथे नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहे.
नवीन पत्त्यावर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरु झाले असून नागरिकांना सर्व संबंधित कामांसाठी नवीन पत्त्यावरच संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल जयंतकुमार पाटील यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment