Posts

Showing posts from April 2, 2023

कोविडचे प्रमाण वाढत आहे-घाबरू नका...पण काळजी घ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांनी जनतेस केले आवाहन

    अलिबाग,दि.05(जिमाका) :-  सध्या राज्यामध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यानुषंगाने दि. 29 मार्च 2023 रोजी सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या तयारीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये संचालक, सहसंचालक, उपसंचालक तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये कोविडच्या अनुषंगाने राज्य व जिल्हा स्तरावर रुग्णालयाची तयारी, मॉकड्रीलबाबतच्या सूचना आणि औषधसाठा व इतर साधन सामग्रीबाबत तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतील सविस्तर चर्चेनंतर सर्व जिल्हा व महानगरपालिका  प्रशासनाला पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे जनतेलाही विविध मुद्दयांबाबत आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य यंत्रणांनी रुग्णालय स्तरावर आणि कार्यक्षेत्रात भेटीदरम्यान आरोग्य कर्मचारी यांनी ILI /SARI सारख्या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी करणे,ILI म्हणजे सौम्य ताप , सर्दी, खोकला, अंगदुखी, घशामध्ये खवखवणे, SARI म्हणजे तीव्र ताप, श्वसनास त्रास होणे, धाप लागणे, तीव्र स्वरूपाचा खोखला लागणे इ., कोविड  Genomic seque

350 व्या शिवराज्याभिषेक दिमाखदार सोहळ्याची जय्यत तयारी सुरु पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला सविस्तर आढावा

    अलिबाग,दि.05 (जिमाका) :-  छत्रपती शिवाजी महाराज यांचा दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात असतो. यावर्षी तारखेप्रमाणे व तिथीप्रमाणे 350 वा   शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड येथे साजरा होणार आहे. त्यानुषंगाने रायगड किल्ला येथे दरवर्षी पेक्षा जास्त संख्येने शिवभक्त तसेच मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने त्यानुषंगाने आवश्यक ते नियोजन करण्याकरिता सोमवार, दि.3 एप्रिल 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व रायगड किल्ला जतन, संवर्धन व विकास आराखडा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री.संभाजी शाहू, छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे हे ऑनलाईन तर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, रायगड किल्ला विकास प

रोहा वन विभागांतर्गत म्हसळा येथे सागरी वन्यजीवाचा अवैध साठा जप्त

    अलिबाग,दि.05(जिमाका):-  उपवनसंरक्षक रोहा श्री.अप्पासाहेब निकत यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून मौजे देवघर ता.म्हसळा येथील सर्व्हे क्रमांक 1/3 येथे कॅपिझ शेल (Placenta Placenta) या सागरी वन्यजीव प्राण्याचे अवशेषांचा अवैध व्यापार चालू असल्याबाबतची माहिती मिळाली. याबाबत वनक्षेत्रपाल म्हसळा श्री.पांढरकामे व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी दि.04 एप्रिल 2023 रोजी त्या ठिकाणी धाड टाकली असता घटनास्थळी ट्रक क्र. RJ22 GB2387 मध्ये कॅपिझ शेल (Placenta Placenta) या सागरी वन्यजीव प्राण्याचे अवशेष प्लॅस्टिक गोणीमध्ये भरून ठेवलेला आढळून आला. याबाबत अधिक चौकशी केली असता या ठिकाणी काही लोक या समुद्रजीवाच्या अवशेषांचा खरेदी विक्री व्यवहार करीत असल्याचे आढळून आले. या सागरी वन्यजीव हा वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील सूची क्र IV अन्वये प्रतिबंधित केला आहे. त्यामुळे घटनास्थळी खरेदी विक्री व्यवहार करणाऱ्या श्री.मुरलीधर महादेव महामूणकर, श्री.धनंजय मारुती बनसोडे, श्री.रोहित अरविंद सादरे, श्री.गोपाळसिंग पिरसिंज राजपूत, श्री.प्रेमदास श्रवणदास (राहणार-राजस्थान) यांना पुढील चौकशीसाठी  ताब्यात घेवून त्यांच्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारार्थीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न

  अलिबाग,दि.05(जिमाका):-  महिला व बालविकास  क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 1996-97 पासून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो. शासनाकडून सन 2013-14 ते सन 2019-20 या वर्षांचे राज्य, विभाग व जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारार्थीची निवड घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये कोकण विभागासाठी विभागीय स्तर व रायगड जिल्हास्तरीय पुरस्कारार्थीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, श्रीमती शकुंतला वाघमारे आदि मान्य

जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या विविध कामकाजांसाठी कल्याण संघटक श्री.शेख यांच्या नियोजित दौऱ्याचे आयोजन

    अलिबाग,दि.05 (जिमाका) :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड कार्यालयाच्या अखत्यारितील सैनिकी मुलांचे वसतिगृह, महाड येथे श्री.शेख युनूस शेख गुलजार हे महाड येथे वसतिगृह अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते माजी सैनिक कल्याण संघटक म्हणूनही जबाबदारी सांभाळतात. माहे मार्च 2023 पासून जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा पत्नी, अवलंबित यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणे, आर्थिक मदतीची प्रकरणे, पेन्शन विषयक कामे, नामनिर्देशन, माजी सैनिक ओळखपत्रे, दुसरे महायुद्ध हयातीचे दाखले इत्यादी कामाकरिता महिन्याचा दुसरा व चौथा मंगळवार, सैनिक विश्रामगृह, पोलादपूर, महिन्याचा दुसरा व चौथा बुधवार सैनिक विश्रामगृह, माणगाव येथे माजी सैनिक कल्याण संघटक श्री.शेख यांचा नियोजित दौरा निश्चित करण्यात आला आहे.  तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी, विधवा पत्नी यांनी दौऱ्याच्या ठिकाणी सकाळी 10.30 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत उपस्थित राहून आपल्या प्रलंबित काम पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, ले.कर्नल (निवृत्त) श्री.राहुल वैजनाथ माने यांनी केले आहे. ०००००००

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रमांचा जागर कार्यक्रमाचे आयोजन

    अलिबाग,दि.05 (जिमाका) :-   डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.1 एप्रिल ते दि.1 मे 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्व अभियानांतर्गत विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने थेट जनतेपर्यंत संवाद साधण्याच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रमांचा जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनील जाधव यांनी केले आहे. या विविध उपक्रमांच्या जागर कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या व मातंग समाजाच्या वस्त्यांना भेटी देणे, त्यांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणे, रमाई आवास योजनेतून मातंग समाजासाठी घरकुले मंजूर करणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जाती पडताळणी समिती कार्यालये यांनी शिक्षण विभागाशी समन्वय करुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेतून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करणे, जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा, शासकीय वसतिगृहामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित वक्त