पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारार्थीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न


 

अलिबाग,दि.05(जिमाका):- महिला व बालविकास क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास विभागांतर्गत राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार सन 1996-97 पासून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला जातो.

शासनाकडून सन 2013-14 ते सन 2019-20 या वर्षांचे राज्य, विभाग व जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारार्थीची निवड घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये कोकण विभागासाठी विभागीय स्तर व रायगड जिल्हास्तरीय पुरस्कारार्थीचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात संपन्न झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, कोकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनित म्हात्रे, जिल्हा परिविक्षा अधिकारी अशोक पाटील, श्रीमती शकुंतला वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.   

 

 पुरस्कारार्थीची माहिती पुढीलप्रमाणे :-

कोकण विभागस्तरीय पुरस्कार-

सन 2015-16 करिता वनवासी विकास सेवा संघ, उसरोली, पो.मजगाव, ता. मुरुड, जि. रायगड, 

सन 2017-18 करिता आश्रय सोशल फाऊंडेशन, पनवेल, जि.रायगड.

रायगड जिल्हास्तरीय पुरस्कार-

सन2013-14 करिता- श्रीमती मिनल ‍मिलिंद टिपणीस, सार्थक प्लॉट नं.4,रोड नं.7,सेक्टर 19,नवीन पनवेल,जि.रायगड.

सन 2014-15 करिता- सौ. प्रमिला रोहिदास चव्हाण, मु.जामरुंग, पो.आंबिवली, ता. कर्जत, जि.रायगड.

सन 2015-16 करिता- सौ.शुभांगी दत्तात्रेय झेमसे, सदनिका क्र.111, युनिक बाजार, पेण, जि.रायगड.

सन 2016-17 करिता-श्रीमती ॲड.निहा अनिक राऊत, जि.रायगड.

सन 2017-18 करिता- श्रीमती सुप्रिया विभिषण जेधे, जि.रायगड.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक