Posts

Showing posts from November 4, 2018

उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    राज्याचे खनिकर्म, उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.9 रोजी रात्रौ आठ वा. माणगाव येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.10 रोजी सकाळी साडे नऊ वा. मोटारीने रोहाकडे प्रयाण.   सकाळी दहा ते दुपारी बारा वा.रोहा औद्योगिक क्षेत्र भेट.   दु.बारा वा. रोहा येथून मुंबई कडे प्रयाण. 00000

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.6 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शुक्रवार दि.9 रोजी सायं. सात वा. महाड एमआयडीसी येथे आगमन व मुक्काम. शनिवार दि.10 रोजी सकाळी साडे नऊ वा. महाड एमआयडीसी येथून श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी अकरा वा.श्रीवर्धन येथे आगमन. दुपारी तीन वा. श्रीवर्धन येथून मुरुडकडे प्रयाण. दुपारी साडे चार वा. मुरुड येथे आगमन. सांय. सात वा. मुरुड येथून साळाव मुरुडकडे प्रयाण. सायं. साडे सात वा. साळाव मुरुड येथे आगमन व मुक्काम. रविवार दि.11 रोजी सकाळी दहा वा. साळाव मुरुड येथून रोहाकडे प्रयाण. सकाळी साडे अकरा वा. रोहा येथे आगमन. दुपारी दोन वा. रोहा येथून तळाकडे प्रयाण. दुपारी तीन वा. तळा येथे आगमन. सायं. सहा वा. तळा येथून मुंबई कडे प्रयाण. 00000

लोकशाही दिनी 2 अर्ज दाखल

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.5 -    या महिन्याचा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली   जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. यावेळी   एकूण 2 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 2 अर्ज कारवाईसाठी संबंधित विभागांकडे सूपूर्द करण्यात आले. विभागनिहाय प्राप्त अर्ज संख्या याप्रमाणे-   महसूल विभाग-1, सह जिल्हा निबंधक रायगड-अलिबाग-1   असे एकूण 2 अर्ज प्राप्त झाले आहेत. 00000

जिल्हा नियोजन समिती लहान गटाची बैठक संपन्न

Image
अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.5 :- जिल्हा नियोजन समितीची जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विधानसभा सदस्य तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,   जिल्हा नियोजन समिती सदस्या श्रीमती रिना घरत, श्रीमती वृषाली वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आ.ठाकूर यांनी विविध विभागांचा सन 2017-18 मध्ये झालेल्या खर्च, सन 2018-19 मधील मंजूर नियतव्यय व सन 2019-20 मधील प्रस्तावित निधी यांचा आढावा घेतला. सन 2018-19 मधील सर्व मंजूर निधी खर्ची पडेल   याकरीता सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. निधी समर्पित होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांना तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावे. जेणे करुन नि