जिल्हा नियोजन समिती लहान गटाची बैठक संपन्न



अलिबाग, जि. रायगड, (जिमाका)दि.5 :- जिल्हा नियोजन समितीची जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विधानसभा सदस्य तथा सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर,  जिल्हा नियोजन समिती सदस्या श्रीमती रिना घरत, श्रीमती वृषाली वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव तसेच शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी आ.ठाकूर यांनी विविध विभागांचा सन 2017-18 मध्ये झालेल्या खर्च, सन 2018-19 मधील मंजूर नियतव्यय व सन 2019-20 मधील प्रस्तावित निधी यांचा आढावा घेतला. सन 2018-19 मधील सर्व मंजूर निधी खर्ची पडेल  याकरीता सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. निधी समर्पित होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सर्व संबंधित विभागांना तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तात्काळ सादर करावे. जेणे करुन निधी खर्च होईल. तांत्रिक मंजूरी प्राप्त करण्यासाठी काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील,असे त्यांनी यावेळी सांगितले.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक