Posts

Showing posts from March 12, 2017

शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक -- केंद्रीय मंत्री अनंत गीते

Image
शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक                                                --  केंद्रीय मंत्री अनंत गीते  अलिबाग, दि. 16 (जिमाका) :-      जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्हयात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवाव्यात असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिले.   केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीस पंचायत समितीत्यांचे नवनिर्वाचित सभापती,उपसभापती,नगराध्यक्ष, समितीचे सदस्य तसेच जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे  तसेच जिल्हयातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.   मंत

प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त -- केंद्रीय मंत्री अनंत गीते

Image
प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त                                     --  केंद्रीय मंत्री अनंत गीते              अलिबाग दि. 16 (जिमाका):-  युवकांना रोजगार व स्वयंरोजगार करता यावा. नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी  प्रधानमंत्री मुद्रा कार्ड योजना रायगड जिल्हयासाठी उपयुक्त असून ही योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी अशा सूचना केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते यांनी आज येथे दिल्या. केंद्र पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत इतर विषयांबरोबरच मुद्रा योजनेचा आढावा घेऊन  मार्गदर्शन करतांना मंत्रीमहोदय बोलत होते. रायगड जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा जिल्हा असल्याने मुद्रा योजनेचा लाभ घेऊन अनेक तरुणांना त्यांच्या आवडीनुसार व सोयीनुसार रोजगार व स्वयंरोजगार करता येणार आहे. त्यांना रोजगार मिळण्याबरोबरच येथे येणाऱ्या पर्यटकांचीसुध्दा सोय हो

अभिलेख जतन करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले

Image
दिनांक:- 15/03/2017                                                                                                   वृत्त क्र. 147 अभिलेख जतन करणे  ही महत्वपूर्ण जबाबदारी                                                         - जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले अलिबाग दि.15 (जिमाका) शासकीय कार्यालयातील अभिलेख जतन करणे ही महत्वपूर्ण जबाबदारी असून संबंधितांनी त्याचे योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी श्रीमती शीतल तेली-उगले यांनी आज येथे केले. पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने आयोजित अभिलेख व्यवस्थापन शाखा या विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, तसेच पुराभिलेख विभागाचे अभिलेखाधिकारी गणेश खोडके, राजकुमार वाघ, मुख्य छायाचित्रकार अनिल सावंत आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकरी तथा मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात झाली. यावेळी