Posts

Showing posts from November 7, 2021

भौगोलिक मानांकन मान्यताप्राप्त फलोत्पादन पिकांचे अधिकृत वापरकर्ता वाढविण्यासाठी कृषी विभागामार्फत मोहीम

    अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका):- केंद्र व राज्य शासनाने कृषी माल निर्यात धोरण लागू केले आहे. राज्यात जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात कक्षाची स्थापना दि.15 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आली आहे. भौगोलिक मानांकन मान्यताप्राप्त फलोत्पादन (फळे व भाजीपाला पिकांचे, कृषी उत्पादनांच्या नोंदणी, प्रचार प्रसिद्धी व मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी अधिकृत वापरकर्ता वाढविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादनामध्ये अग्रेसर असून राज्यातील विविध भागांमध्ये उत्कृष्ट दर्जाचे फळे व भाजीपाला उत्पादन घेतले जात असल्याने व त्या भागातील वैविध्यपूर्ण बाबींकरिता प्रसिध्द असल्याने संबंधित विभाग व जिल्हे आता फळपीकनिहाय देशात त्या नावाने ओळखले जात आहेत. त्याचप्रमाणे कोकण विभागातील हापूस आंब्यास वैशिष्ट्यपूर्ण चवीमुळे भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. फलोत्पादन विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध फळबाग लागवड योजनामुळे संपूर्ण राज्यात आणि कोकणात फळबागांखालील क्षेत्र मोठ्याप्रमाणात वाढलेले आहे. वरील वस्तुस्थितीचा विचार करून या पिकाच्या गुणवत्तेस हमीभाव मिळण्याचे दृष्टिकोनातून भौगोलिक चिन्हांकन नोंदणीस विशे

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-   शनिवार दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.30 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने ता.श्रीवर्धनकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. श्रीवर्धन येथे आगमन व नगरपरिषदे अंतर्गत मिनी अग्निशमन शिघ्र कृती वाहनाचा लोकार्पण समारंभ. स्थळ : नगरपरिषद कार्यालय, श्रीवर्धन. दुपारी 12.00 वा. श्रीवर्धन येथून शासकीय वाहनाने दिवेआगरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा दिवेआगर येथे आगमन व विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन कार्यक्रम :- दिवेआगर नं.1 ब्राम्हण समाज सामाजिक सभागृह भूमिपुजन कार्यक्रम, दिवेआगर नं.2 आगरी समाज सामाजिक सभागृह भूमिपुजन, दिवेआगर नं.3 कुंभार समाज सामाजिक सभागृह भूमिपुजन, दिवेआगर एस.टी.पिकअप शेड उद्घाटन समारंभ,   दिवेआगर अंतर्गत रस्ता उद्घाटन समारंभ, दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराकडे जाणारा रस्त्याचे भूमिपुजन समारंभ. दुपारी 2.00 वा. राखीव. दुपारी 3.00 वा. दि

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-   शनिवार दि.13 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8.30 वा. शासकीय निवासस्थान ब-2 मादाम कामा रोड, मंत्रालयासमोर, मुंबई येथून जुहू विमानतळ हेलिपॅड मुंबईकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. जुहू विमानतळ हेलिपॅड, मुंबई येथून हेलिकॉप्टरने आर.सी.एफ.मैदान हेलिपॅड थळ, अलिबाग, जि.रायगडकडे प्रयाण. सकाळी 10.00 वा.हेलिकॉप्टरने आर.सी.एफ.मैदान हेलिपॅड, थळ-अलिबाग येथे आगमन व मोटारीने राजमळा लोणारे अलिबागकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. अलिबाग तालुका शिवसेना मेळाव्यास उपस्थिती. स्थळ : आमदार महेंद्र दळवी यांचे निवासस्थान, राजमळा लोणारे अलिबाग. सकाळी 11.50 वा. लोणारे अलिबाग येथून मोटारीने आर.सी.एफ.मैदान हेलिपॅड थळ, अलिबागकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. आर.सी.एफ.क्रीडा संकुल हेलिपॅड थळ-अलिबाग येथून हेलिकॉप्टरने जे.एस.डब्ल्यू.डोलवी हेलिपॅड पेणकडे प्रयाण. दुपारी 12.20 वा. हेलिकॉप्टरने जे.एस.डब्ल्यू.डोलवी हेलिपॅड पेण येथे आगमन व मोटारीने आगरी समाज हॉल, पेणकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. पेण तालुका शिवसेना मेळाव्यास उ

रायगड जिल्ह्यात प्रकल्प उद्यमिता घडविणार 200 उद्योजक

    अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका):- कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय व लेट्स इंडोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यात 200 उद्योजक घडविण्याकरीता प्रोजेक्ट उद्यमिता हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून जिल्ह्यातील युवकांनी या प्रकल्पाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शा.गि.पवार   केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय आणि लेट्स इंडोर्स संस्था यांच्या भागीदारीतून उद्यमिता हा प्रकल्प रायगड, नाशिक, पुणे आणि नांदेड जिल्ह्यात राबिवण्यात येणार आहे. याद्वारे, शेकडो अतिसूक्ष्म/सूक्ष्म/लघु उद्योजकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत रायगड जिल्हयात किमान 200 उद्योजक घडविण्याचे लक्ष्य   ठेवण्यात आले आहे. प्रकल्प उद्यमिता ही अनोख्या शैलीमध्ये इच्छुक उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उद्देशाने उभी केलेली यंत्रणा आहे. यामध्ये स्थानिक पातळीवरील व्यवसाय, बचत गटांचे लघुद्योग, गृहोद्योग, जोड-व्यवसाय, आणि इतर उपजीविकेची साध

इतर मागासवर्गीय घटकांचे प्रस्ताव व सूचना सादर कराव्यात -- इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख मंगेश कुडाळकर

  अलिबाग,जि.रायगड दि.12 (जिमाका):- भारतीय संविधानाने समाजातील दुर्बल घटकांना सबल घटकांच्या बरोबरीने विकासाची संधी दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय घटकांचे काही प्रस्ताव व सूचना असतील तर त्या तातडीने सादर कराव्यात,असे प्रतिपादन विधान सभा सदस्य तसेच इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख श्री.मंगेश कुडाळकर यांनी आज येथे केले.      महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती दि.10 ते दि.12 नोव्हेंबर 2021   या तीन दिवसीय रायगड जिल्हा दौऱ्यावर आली असून जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आयोजित दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी समारोपाच्या बैठकीत ते बोलत होते.               यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय इतर मागासवर्ग कल्याण समितीचे पदाधिकारी विधानसभा सदस्य श्री.राजू कारेमोरे (तुमसर मतदारसंघ), श्रीमती मंजुळा गावित (साक्री मतदारसंघ), गणपत गायकवाड (कल्याण पूर्व मतदारसंघ), आणि श्री. तानाजी मुटकुळे (हिंगोली मतदारसंघ),मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे,    विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी अवर सचिव (समिती) घ.ज्ञा.देबडवार, निवासी उपजिल्हा

राज्यव्यापी मतदार नोंदणी शिबीर-2021 चे आयोजन

  अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाकडून र दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम-2022 जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात शनिवार दि.13 नोव्हेंबर, रविवार, दि.14 नोव्हेंबर 2021 व शनिवार दि.27 नोव्हेंबर, रविवार, दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी राज्यव्यापी मतदार नोंदणी शिबीर-2021 चे आयोजन करण्यात आले आहे, असे उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांनी कळविले आहे.

इतर मागासवर्गीय उद्योजकांना सूवर्णसंधी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाच्या विविध कर्ज योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी दि.29 नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका) :- राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग कल्याण महामंडळाची स्थापना केली आहे.        समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व 20 टक्के बीज भांडवल योजना तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे.       सन 2021-22 या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. थेट कर्ज योजना व 20 टक्के बीज भांडवल योजना या योजनांचे अर्ज जिल्हा कार्यालयात स:शुल्क उपलब्ध आहेत.   या योजनेच्या लाभार्थी निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून या समितीमार्फत लाभार्थी निवडीसाठी सोमवार,

जिल्ह्यातील कोविड-19 लसीच्या दुसऱ्या डोसनंतर पूर्ण झालेल्या आणि 14 दिवस उलटून गेलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि गर्भवती महिलांना सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळांना भेट देण्याची परवानगी

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका): शासन सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशान्वये महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशान्वये लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत अधिसूचनेनुसार सुधारीत निर्देश लागू करण्यात आलेले आहेत. शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील मार्गदर्शक सूचनाच्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याच्या हद्दीत पुढील आदेश होई पर्यंत यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधामध्ये दि.07 ऑक्टोबर 2021 पासून प्रतिबंधीत (Containment Zone) क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळ सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील आदेशान्वये कोविड-19 लसीच्या दुसऱ्या डोसनंतर पूर्ण झालेल्या आणि 14 दिवस उलटून गेलेल्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक आणि गर्भवती महिलांना या आदेशाच्या तारखेपासून सर्व धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी फेस मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंगची तरतूद आणि हात धुणे किंवा सॅनिटायझर अनिवार्य असेल. धार्मिक स्थळे/प्रार्थना स्थळे खुला करण्याबाबत शासनाकडील दि.24 सप्टेंब

पाली नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या (ना.मा.प्र) सुधारित आरक्षणाच्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये जिल्ह्यातील पाली नगरपंचायत ही नवनिर्मित नगरपंचायत असल्याने या नगरपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे. या आदेशाच्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण व सोडत कार्यक्रम टप्पा (अ) प्रारूप प्रभाग रचना आरक्षणासह अ.क्र.1 अन्वये प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षण यासह) मुख्याधिकारी यांनी बुधवार, दि. 10 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत यांच्याकडील दि. 10 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये या कार्यालयाकडे प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव (नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींची 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्ष

खालापूर नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या (ना.मा.प्र) सुधारित आरक्षणाच्या हरकती व सूचना दाखल करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या आदेशा मधील सूचनांनुसार दि.09 मार्च 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम प्रभाग रचनेमधील आरक्षण पाहता रायगड जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायतीमध्ये आरक्षण मर्यादा ही सदस्य संख्येच्या 50 टक्क्यांच्या पुढे जात आहे. त्यामुळे खालापूर नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या (ना.मा.प्र) सुधारीत आरक्षणाची सोडतीची कार्यवाही मुख्याधिकारी, खालापूर नगरपंचायत यांच्या मार्फत दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी पूर्ण करण्यात येणार आहे. आदेशामधील परिशिष्ट 1 मधील पुढील टप्पा (ब)हरकती व सूचना तसेच सुनावणी मधील अ.क्र.1 अन्वये नगरपंचायतीतील नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला आरक्षणाची (अधिसूचना कलम 10 नुसार) रहिवाश्यांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविण्याकरिता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषद नगरपंचायतीच्या वेबसाईटवर शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021   पर्यंत प्रसिध्द करण्याबाबत आदेशित केलेले आहे. आदेशामधील परिशिष्ट 1 मधील पुढील टप्पा (ब) हर

जिल्ह्यातील ग्रामीण/शहरी भागातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना निःशुल्क सहशिक्षणाची जवाहर नवोदय विद्यालयात सूवर्णसंधी

    अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना 1986 च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार करण्यात आली आहे. देशाचे युवा पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या अथक प्रयत्नाने ग्रामीण प्रतिभावान विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक, शारीरिक व विविध कलागुणांचा विकासाबरोबर आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली. नवोदय विद्यालय हे भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालय विभागाच्या स्वायत्त संस्थेमार्फत भारत सरकारच्या वतीने चालविण्यात येते. या विद्यालयातील प्रवेशासाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख दि.30 नोव्हेंबर 2021 तर परीक्षेची तारीख दि.30 एप्रिल 2022 अशी आहे. तसेच www.navodaya.gov.in या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज भरण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय शाळातील इयत्ता 5 वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य किरण इंगळे यांनी केले आहे. नवोदय विद्यालयात इयत्ता 6 वी पासून इयत्ता 12 वी पर्यंत वसतिगृहयुक्त पूर्णत निः

महाडमधील तळीये दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख मंगेश कुडाळकर यांनी दिली सांत्वनपर भेट

    अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका) :- महाड तालुक्यातील तळीये या   दरडग्रस्त भागाची विधानसभा सदस्य व महाराष्ट्र विधान मंडळ इतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुख श्री.मंगेश कुडाळकर आणि विधानसभा सदस्य व समिती सदस्य अभिजित वंजारी यांनी आज पाहणी केली. तसेच त्यांनी दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.     इतर मागासवर्ग कल्याण समिती तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर आली असून काल (दि.10 नोव्हेंबर) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी महाडमधील तळीये या गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबतची त्याचप्रमाणे दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना जिल्हा प्रशासनाने केलेल्या मदतीबाबतची माहिती समिती प्रमुख तसेच इतर समिती सदस्यांना दिली होती.        या पार्श्वभूमीवर तळीये गावाचे पुनर्वसन ज्या ठिकाणी करण्यात आले आहे त्या ठिकाणी जावून तेथील नागरिकांची समिती प्रमुख श्री.कुडाळकर व समिती सदस्य श्री.वंजारी यांनी आस्थेने विचारपूस केली. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाने केलेल्या पुनर्वसन कामाबाबत समाधानही व्यक्त केले.       यावेळी पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल

भारतीय डाक विभागामध्ये खेळाडूंची भरती, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून होणार शालेय क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी

    अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभागाद्वारा राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्य धारक खेळाडूंकरिता विविध पदांच्या खेळाडूं भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. 64 खेळ प्रकारातील खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रीया आयोजित केली आहे.   या भरतीची सविस्तर जाहिरात व माहिती https://dopsportsrecruitment.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरतीसाठी ज्या खेळाडूंनी भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे असे खेळाडूं पात्र ठरणार आहेत. संबधित खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारा प्रमाणित करुन देण्यात येत आहे. रायगड जिल्हयातील ज्या खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे, त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्याकडे अलिबाग येथे अर्ज सादर करावेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे फॉर्म 04 भरुन, स्पर्धा प्राविण्य पत्रासह अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.21

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाकडून मतदान नोंदणीसाठी होणार अधिकाअधिक जनजागृती

    अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड अलिबाग यांच्या आदेशान्वये दि.01 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दि. 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये अधिकाअधिक मतदान नोंदणी करण्याकामी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून   योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मतदान कार्ड आहे किंवा नाही याबाबत विचारणा करणे, नसल्यास तात्काळ नोंदणी करून घेण्याबाबत अवगत करावे. तसेच कार्यालयात येणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या परिचयातील दि. 01 जानेवारी 2022 रोजी पर्यंत 18 वर्ष पूर्ण होत असलेल्या व्यक्तीला मतदार यादीत नाव नोंदणी करण्यास प्रोत्साहित करणे, नागरिकांना मतदार नोंदणी करणेबाबत जनजागृती करणे, मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांचे   eci.nic.in   या संकेतस्थळावर व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे   ceo.maharashtra.gov.in   या

धरमतर खाडीमध्ये अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाची धडक कारवाई

  अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- अलिबाग तालुक्यातील मौजे शहाबाज येथील धरमतर खाडीमध्ये सक्शन पंपाद्वारे अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव   यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय अधिकारी, अलिबाग श्री.प्रशांत ढगे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तहसिलदार श्रीमती मीनल दळवी व तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर दि.7 नोव्हेंबर 2021 रोजी मध्यरात्री धडक   कारवाई केली.   या कारवाईत या पथकाने तीन बार्ज, एक सक्शन पंप आणि 35 ब्रास वाळू जप्त केली.        यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्यासह तहसिलदार मीनल दळवी, निवासी नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, सारळ, मंडळ अधिकारी, नागाव, मंडळ अधिकारी, पोयनाड, तलाठी, कोतवाल सहभागी होते. ०००००

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग,जि.रायगड,दि.11 (जिमाका):- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-   शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून शासकीय वाहनाने ता.म्हसळाकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. पाष्टी, ता.म्हसळा येथे आगमन व तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपुजन व उद्घाटन कार्यक्रम :- पाष्टी रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, पाष्टी बौध्दवाडी सभामंडप भूमिपुजन कार्यक्रम, मांदाटणे साठवण तलाव उद्घाटन कार्यक्रम, रा.मा.99  ते कुडगाव जोडमार्ग भूमिपुजन कार्यक्रम.   दुपारी 1.30 वा. श्री.दाजी विचारे यांच्या निवासस्थानी, मु.फळसप, ता.म्हसळा येथे राखीव. दुपारी 2.00 वा. फळसप येथे साकव बांधकामाचे भूमिपुजन कार्यक्रम, संदेरी बौध्दवाडी रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, संदेरी येथील साकव बांधकामाचे भूमिपुजन कार्यक्रम, आंबेत वलजारवाडी रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, मुख्य रस्ता ते आंबेत रस्त्याचे भूमिपुजन कार्यक्रम, आंबेत बौध्दवाडी ते मोहल्याकड

पाली नगरपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):- मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.9 नोव्हेंबर 2021च्या आदेशान्वये डिसेंबर 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या 17, मुदत समाप्त झालेल्या 2 व 7 नवनिर्मित अशा 26 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना, आरक्षण तसेच सोडतीचा कार्यक्रम 2021 जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील पाली नगरपंचायत ही नवनिर्मित नगरपंचायत असून या नगरपंचायतीची प्रभाग रचना व कार्यवाही पूर्ण करणे आवश्यक आहे.   महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरीकरण अधिनियम 1965 मधील कलम 10 अन्वये सर्व आरक्षण नमूद करूनच प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात यावी. त्यामुळे प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित नगरपंचायत क्षेत्रात सभा आयोजित करून सोडत पद्धतीने अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करणे बंधनकारक आहे.   मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि. 9 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये परिशिष्ट 1 मधील अ प्रारुप प्रभाग रचना आरक्षण टप्पा 1 अन्वये गुरुवार दि.11 नोव्ह

खालापूर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    अलिबाग,जि.रायगड दि.11 (जिमाका):- मा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.29 ऑक्टोबर 2020 च्या आदेशान्वये खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतीची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या आदेशान्वये   वरील नगरपंचायतीची आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण होऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षण यापूर्वीच दि.09 मार्च 2021 रोजी शासन राजपत्रात यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आलेले आहे. मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या आदेशान्वये माहे एप्रिल 2020   ते मे 2021 या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या एकूण 86 नगरपंचायतीमधील सदस्य पदांच्या ना.मा.प्र. आरक्षणाच्या सोडतीकरिता सुधारीत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. या आदेशामध्ये नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या (ना.मा.प्र.) आरक्षणाची सोडत काढणे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) आरक्षण सोडतीची कार्यवाही संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी करण्याबाबत आदेशित केलेले आहे. मा.राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील दि.09 नोव्हेंबर 2021 च्या

विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटप करण्यासाठी समाज कल्याण विभाग अभियान राबवणार--डॉ.प्रशांत नारनवरे

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका) :- विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळण्यास अनेक अडचणी येतात. याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृह, निवासी शाळा, समाजकार्य महाविद्यालय अनुदानित वसतिगृह तसेच जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका व नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले त्वरीत मिळावे यासाठी समाज कल्याण अधिकारी यांनी ग्रामीण व शहरी भागात शिबीरे घेवून जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी अभियान सुरु करावे असे निर्देश समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले. कोकण भवन येथे (दि.09 नोव्हेंबर 2021) रोजी झालेल्या मुंबई विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विद्यार्थ्यांना जातीचे दाखले मिळण्यास अडचणी येत असतात. त्यामुळे जे विद्यार्थी समाज कल्याण विभागाच्या अनुदान शाळा, शासकीय वसतिगृह, अनुदानित वसतिगृह, समाजकार्य महाविद्यालय इत्यादी मध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांना व इतर विद्यार्थ्यांना जातीचे दाखले त्वरीत मिळण्यासाठी संबंधित जिल्हयाच्या सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कॅम्प आयोजित करावेत. जेणेकरुन संबंधित विद्यार्थ्यांना जातीचे दाखले त्वरीत

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अर्ज सादर करावेत

    अलिबाग , जि.रायगड दि. 10 ( जिमाका):- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत सुरु असलेल्या 12 शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षाकरिता अर्ज सादर करावयाचे आहेत.   या प्रवेशासाठी इयत्ता आठवी, अकरावी, प्रथम वर्ष पदवी, पदविका, पदव्युत्तर, डी.टी.एड, बी.एड साठी वसतिगृहातील रिक्त जागेनुसार व गुणवत्तानिहाय प्रवेश देण्यात येईल. तरी अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी https://swayam.Mahaonline.Gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, पेण शशिकला अहिरराव यांनी केले आहे. ०००००

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम मतदार यादी शुध्दीकरणासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

    अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका) :-   मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. दि. 1 नोव्हेंबर, 2021 ते 20 डिसेंबर   2021 या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविला जाणार आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी करणे, दि.01 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) रोजी, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.01 नोव्हेंबर, 2021   (सोमवार) ते दि. 30 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार), विशेष मोहिमांचा कालावधी दि. 13 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दि. 14 नोव्हेंबर, 2021 (रविवार) तसेच दि. 27 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दि. 28 नोव्हेंबर, 2021 (रविवार), दावे व हरकती निकालात काढणे दि.20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे.दि. 05 जानेवारी, 2022 (बुधवार). या कार्यक्रमांतर्गत दि.01 ते दि.30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेषत: दि.1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. शासन, ग्रामविकास विभागाकडील दि.25 ऑक्टोबर 2021 च्या परिपत्रकानुसा