मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम मतदार यादी शुध्दीकरणासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका) :-  मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि.1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. दि. 1 नोव्हेंबर, 2021 ते 20 डिसेंबर  2021 या कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यक्रम राबविला जाणार आहे.

एकत्रीकृत प्रारूप मतदारयादी प्रसिद्धी करणे, दि.01 नोव्हेंबर, 2021 (सोमवार) रोजी, दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी दि.01 नोव्हेंबर, 2021  (सोमवार) ते दि. 30 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार), विशेष मोहिमांचा कालावधी दि. 13 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दि. 14 नोव्हेंबर, 2021 (रविवार) तसेच दि. 27 नोव्हेंबर, 2021 (शनिवार) व दि. 28 नोव्हेंबर, 2021 (रविवार), दावे व हरकती निकालात काढणे दि.20 डिसेंबर, 2021 (सोमवार) पर्यंत, मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणे.दि. 05 जानेवारी, 2022 (बुधवार).

या कार्यक्रमांतर्गत दि.01 ते दि.30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेषत: दि.1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. शासन, ग्रामविकास विभागाकडील दि.25 ऑक्टोबर 2021 च्या परिपत्रकानुसार दि.16 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये मतदार नोंदणी अधिकारी व गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्या संयुक्त प्रयत्नाने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत ग्रामपंचायतीची अस्तित्वात असलेली मतदार यादी गावातील सर्व नागरिकांना पाहाण्यासाठी/तपासण्यासाठी उपलब्ध करुन दिली जाईल तसेच या यादीचे वाचन करण्यात येईल. मतदार यादीमधील नोंदीबाबत नागरिकांना हरकती असल्यास, त्यांना नोंदीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास किंवा नाव नसलेल्या पात्र नागरीकांना त्यांचे नाव नव्याने नोंदवावयाचे असल्यास त्यांना विहित अर्ज ग्रामसमेत उपलब्ध करुन दिले जातील. मयत मतदारांची वगळणी, कायम स्थलांतरीत मतदारांची वगळणी, लग्न होऊन बाहेर गेलेल्या महिलांच्या नावाची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावाची नोंदणी, दिव्यांग मतदार चिन्हांकित करणे व ज्यांचे दि. 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहेत त्यांची नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन संबंधित ग्रामसेवक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी करतील.

तरी सर्व नागरिकांनी दि. 16 नोव्हेंबर 2021 रोजी ग्रामसभेस उपस्थित राहून मतदार यादी शुध्दीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक