Posts

Showing posts from May 26, 2019

सातवी आर्थिक गणना राज्यस्तरीय प्रशिक्षण महाराष्ट्रासह, केंद्रशासित प्रदेशातील साधन व्यक्ती सहभागी

Image
खारघर,जि रायगड, दि.1 (जिमाका):- देशाच्या सातव्या आर्थिक गणनेसाठी प्रशिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम आज खारघर- नवी मुंबई येथील ग्रामविकास भवनात पार पडला. या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य, दादरा नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील साधन व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आपले सरकार,ई. सेवा केंद्राचे राज्यस्तरीय प्रमुख वैभव देशपांडे, समीर पाटील, राष्ट्रीय प्रतिदर्श सर्व्हेक्षण संस्थांच्या मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या उप महानिदेशक श्रीमती सुप्रिया रॉय, नागपूर विभागाचे श्रीनिवास उपाला, दिल्ली येथील क्षेत्रीय कार्यालय विभाग उप महानिदेशक इ.के.तोपराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्रीनिवास, अर्थ व सांख्यिकी संचालनालय चे संचालक आर आर.शिंगे,सह संचालक जयवंत सरनाईक, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग विकास संस्थेच्या उपसंचालक भाग्यश्री साठे तसेच राज्यभरातील सांख्यिकी अधिकारी, आपले सरकार इ सेवा केंद्राचे समन्वयक आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस व्ही आर श्री

जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक कार्यक्रम

अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.30 - राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट 9- कळंब ता. कर्जत व पेण पंचायत समितीतील 46 वडखळ गण येथील पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, तो याप्रमाणे- दि.3 ते 8 जून नामनिर्देशन पत्र स्विकारणे,दि.10 जून नामनिर्देशन पत्र छाननी व निर्णय, दि.13 जून पर्यंत नामनिर्देशन पत्राबाबत निवडणूक निर्णय अधिकऱ्यांनी दिलेल्या निर्णयाबाबत अपिल करण्याची मुदत,   दि.17 जून जिल्हा न्यायाधीशांनी   अपिलावर सुनावणी घेऊन निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख,   दि.15 जून (जेथे अपिल नाही तेथे) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख व 19 जून (जेथे अपिल आहे तेथे) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख, दि.23 जून रोजी मतदानाची तारीख व 24 जून रोजी मतमोजणीची तारीख. सदर निवडणूक क्षेत्रात निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले आहे. 00000

अल्पसंख्याक शाळांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी अनुदान

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.30 -   शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडून   राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान दिले जाते.   सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी या अनुदानाच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील इच्छुक शाळांनी   विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव   जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय रायगड- अलिबाग यांच्याकडे दि.31 ऑग्सट 2019 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा सदस्य सचिव उच्चस्तर निवड समिती रायगड- अलिबाग यांनी केले आहे. 00000

आपत्ती व्यवस्थापनः पालकमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.29 -   आगामी मॉन्सूनच्या पार्श्वभुमिवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलेल्या पूर्वतयारीचा राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री   तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी आज   विभागनिहाय आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे,   उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, प्रतिमा पुदलवाड, विठ्ठल इनामदार, रविंद्र बोंबले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार आदी अधिकारी उपस्थित होते.   यावेळी जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्रात करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, संभाव्य पूरस्थिती निर्माण होणारी ठिकाणे, तेथील उपाययोजना, आरोग्य यंत्रणांची सज्जता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील वाहतूक कोंडींची संभाव्य ठिकाणे,कामे सुरु असल्याने वळविण्यात आलेले मार्ग,

भात खरेदी केंद्र आढावा बैठक : भात खरेदीसाठी शेतकऱ्यांशी करार करा- ना.चव्हाण : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी फिरते भात खरेदीकेंद्रांचा प्रस्ताव

Image
अलिबाग,जि. रायगड,दि.29 (जिमाका):- यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या भात पिकाची हमीभावाने जास्तीत जास्त खरेदी व्हावी व शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांसोबत शासनाने करार करावा, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिले. तसेच शेतकऱ्यांकडून भात खरेदीसाठी फिरते भात खरेदी केंद्राचा प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यातील भात खरेदीसंदर्भात आज ना.चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील , जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जि. प. उपाध्यक्ष ऍड आस्वाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, जिल्हा

खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक 2019 : 1 लाख 18 हजार 395 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन : उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांपर्यंत सुविधा पोहोचवा- ना.चव्हाण

Image
अलिबाग,जि. रायगड,दि.29 (जिमाका):- यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पादन घेता यावे व उत्पादन वाढ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान व सुविधा पोहोचवा,असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रवींद्र चव्हाण यांनी आज येथे दिले. जिल्ह्याची सन 2019 च्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, आ.सुभाष उर्फ पंडितशेट पाटील , जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जि. प. उपाध्यक्ष ऍड आस्वाद पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय अभयसिंह शिंदे इनामदार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ सुभाष म्हस्के, आरसीएफ चे विपणन अधिकारी एस आर काटकर, जिल्हा अग्रणी बँकेचे आनंद निंबेकर, महावितरण चे अधीक्षक अभियंता डी आर पाटील आदी उपस