Posts

Showing posts from September 3, 2017

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान गाव विकासासाठी वास्तवदर्शी आराखडा हवा- माजी मुख्यसचिव गायकवाड

Image
अलिबाग,(जिमाका)दि.9-   ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अंतर्गत  गावांचा विकास करतांना गाव निहाय विकास आरखडा तयार करण्यात येत आहे, तथापि हा आराखडा तयार करतांना त्यात गाव विकासाचे वास्तवदर्शी प्रतिबिंब असणारा आराखडा हवा, अशी अपेक्षा राज्याचे माजी मुख्य सचिव व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी आज येथे ग्राम प्रवर्तकांशी बोलतांना व्यक्त केली.  ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान हे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीकोनातुन गावे सक्षम करण्यासाठी राज्यात राबविले जात आहे. त्या अंतर्गत राज्यातील एक हजार गावे स्वयंपुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यात रायगड जिल्ह्यातील 16 गावांचा समावेश आहे. आज या गावांतील ग्राम प्रवर्तक व जिल्ह्यातील यंत्रणा प्रमुखांसह श्री. गायकवाड यांनी आढावा घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  पी.डी. शिगेदार,  जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती देवराज, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक शालिक पवार, कौशल्य विकास अधिकारी  सागर मोहिते, ग्राम सामाजीक

रॅडिसन रिसॉट येथे रक्तदान शिबीर

Image
            अलिबाग दि.9(जिमाका)- जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथील शासकीय रक्तपेढीमार्फत रॅडिसन रिसॉट येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 47 व्यक्तींनी रक्तदान केले.             यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी, रॅडिसन रिसॉट चे जनरल मॅनेजर विशाल जामवार, एच.आर.मॅनेजर इशरत सिद्दीकी, एल ॲण्ड डी मॅनेजर ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने आदि उपस्थित होते.             जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अजित गवळी यांनी यावेळी रक्तदानाचे महत्व व एचआयव्ही/एड्स विषयी व्यवस्थापक व इतर कर्मचारी यांनी माहिती दिली. तसेच जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे असे आवाहन ही केले.             या रक्तदान शिबीराकरीता शासकीय रक्तपेढीतील रक्तसंक्रमण अधिकारी डॉ.दिपक गोसावी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता प्रमोद जगताप, प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, जिल्हा सहाय्यक लेखा रविंद्र कदम, महेश घाडगे यांनी सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता विशेष परिश्रम घेतले. एडस सर्वेक्षणासंदर्भात कार्यशाळा नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टीट्युट पुणे यांच्या मार्फत जिल्हा प्रशिक्षण

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 9 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.09:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 9.45 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3071. 50  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-09.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-09.30 मि.मि., खालापूर-21.00 मि.मि., माणगांव-23.00 मि.मि., रोहा-23.00 मि.मि., सुधागड-15.00 मि.मि., तळा-07.00 मि.मि., महाड-01.30 मि.मि., पोलादपूर-18.00, म्हसळा-03.20मि.मि., श्रीवर्धन-11.00 मि.मि., माथेरान-08.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 151.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 9.45 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   99.17 % इतकी आहे. 000000

महाराष्ट्र फुटबॉल मिशन अंतर्गत जिल्ह्यात क्रीडा दिन उपक्रमः फुटबॉल, हॉकी स्पर्धांचे आयोजन

अलिबाग,(जिमाका)दि.8-  ' महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन' अंतर्गत क्रीडा दिनानिमित्त दि. 29 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व अलिबाग तालुका फुटबॉल असोसिएशन यांच्या   संयुक्त विद्यमाने आर.सी.एफ स्कुल, कुरुळ, ता.अलिबाग येथे फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच क्रीडा दिनाचे औचित्य साधून मोहोपाडा ता. खालापूर येथे हॉकी स्पर्धा तसेच जिल्हा क्रीडा संकूलात क्रीडा संघटनांची कार्यशाळा असे विविध  उपक्रम राबविण्यात आले. कुरुळ येथे फुटबॉल स्पर्धा फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (FIFA) मार्फत 17 वर्षाखालील खेळाडूंसाठी 'फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा'   महाराष्ट्रात घेण्यात येणार आहे. या स्पर्धा दि.6 'ते 28 ऑक्टोबर 2017 या कालावधीत संपूर्ण देशात होणार असून एकूण सामन्यांपैकी 6 सामने नवी मुंबई येथील डी.वाय.पाटील स्टेडियम येथे होणार आहेत. या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यात फुटबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी व अधिकाधिक मुलांनी फुटबॉल खेळण्यासाठी प्रवृत्त व्हावे यासाठी ' महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.08:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.04 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3062.05  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-23.00 मि.मि., रोहा-01.00 मि.मि., सुधागड-01.00 मि.मि., तळा-38.00 मि.मि., महाड-75.00 मि.मि., पोलादपूर-70.00, म्हसळा-41.00मि.मि., श्रीवर्धन-51.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 304.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 19.04 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   98.89 % इतकी आहे. 000000

गट शेती प्रोत्साहन योजनाः शेतकरी गटाचे प्रकल्प अहवाल मागविले

अलिबाग,(जिमाका)दि.7-   रायगड जिल्ह्याकरीता गत शेती पथदर्शी प्रकल्पासाठी सहा प्रकल्पांचे उदिष्ट देण्यात आले आहे. त्याकरीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प्‍ संचालक आत्मा यांच्याकडे शेतकऱ्यांच्या गटाने आपल्या गट शेतीचे प्रकल्प अहवाल   दि.20 सप्टेंबर 2017 पर्यंत  सादर करावयाचे आहेत, असे प्रकल्प संचालक आत्मा, रायगड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रायगड अलिबाग यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे. गट शेतीस   प्रोत्साहन देणे व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत सन 2017-18 व 18-19 या दोन वर्षासाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास दि.24 जुलै 2017 च्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे अटी व शर्ती आहेत- या अंतर्गत या योजनेंतर्गत किमान 20 शेतकरी गटांच्या माध्यमातून किमान 100 एकर क्षेत्रावर विविध कृषि व कृषि पूरक उपक्रम प्रकल्प स्वरुपात राबविण्यात येईल.या समुह शेतीचा प्रयोग हा एका शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामुहिकरित्या नियोजनबद्ध शेती करणारा असावा. या योजनेंतर्गत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्

क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जयंती; जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Image
अलिबाग,(जिमाका)दि.7-   क्रांतिवीर   राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी  यांनी राजे  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, जिल्हाधिकारी कार्यालयातील  अन्य शाखांचे प्रमुख,अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस फुले वाहुन अभिवादन केले. राजे उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड कुटुंबामध्ये 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील ते आद्यक्रांतिकारक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे आदर्श होते. भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. 1857 च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर म्हणजे उमाजी नाईक. 000000

आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून रायगडचा विकास करण्याचे नियोजन-जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
         अलिबाग,(जिमाका)दि.6-   रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. रायगड जिल्हा हा अनेक प्रकारची वैशिष्ट्य असलेला  ऐतिहासिक जिल्हा आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला रायगड किल्ला आणि अन्य पर्यटनस्थळांचा विकास आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारीत करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी वार्तालाप करतांना डॉ. सूर्यवंशी बोलत होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांचीही उपस्थिती होती. यावेळी 'लोकराज्य' मासिकाच्या सप्टेंबर 2017 च्या अंकाचे प्रकाशन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  रायगड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून काम करतांना मी प्रथम रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.  शालेय जीवनापासून शिवछत्रपतींच्या इतिहासाचा अभ्यास करत असतांना रायगड जिल्ह्याविषयी येथील गावां विषयी कुतूहल होते. ऐतिहासिक पर्यटनाला चालना  ते म्हणाले की, शासनानेही रायगड किल्

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना

अलिबाग,(जिमाका)दि.6:-   अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता जमीनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीकोनातून सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना' या नावाने राबविण्यास शासनाने दि.27 एप्रिल 2016 च्या शिफारशीनुसार मान्यता दिली आहे. या योजनेमध्ये सन 2017-18 या वर्षात घटकनिहाय अनुदान मर्यादा याप्रमाणे- 1)नवीन विहीरीसाठी उच्चतम अनुदान मर्यादा –अडीच लक्ष रुपये. 2)जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, 3)इनवेल बोअरींगसाठी 20 हजार रुपये, 4)पंप संच 25 हजार रुपये, 5)वीज जोडणी आकार 10 हजार रुपये, 6)शेततळ्याचे प्लास्टीक अस्तरीकरण एक लक्ष रुपये, 7)सुक्ष्म सिंचन- मंत्रीमंडळ उपसमितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार. या योजनेंतर्गत वरील 7 बाबी असून लाभ पॅकेज स्वरुपात द्यावयाचा आहे. लाभार्थी पात्रतेच्या अटी:- लाभार्थी हा अनुसूचित जाती,नवबौद्ध शेतकरी असला

ग्रंथालय, ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले

अलिबाग,(जिमाका)दि.6-   महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून  उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथालय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्ता आणि ग्रंथालय सेवक यांचेकडून ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथमित्र या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले आहेत. शासनमान्य् सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट् ग्रंथालय पुरस्कार देण्यात येतात. त्याचप्रमाणे ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनाही डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ ब क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये,20 हजार रुपये, 10हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट् कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 0.04 मि.मि.पावसाची नोंद

        अलिबाग,(जिमाका)दि.06:-   जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.04 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण   सरासरी 3043.02  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-               अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.60 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 0.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 0.04 मि   इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी   98.33 % इतकी आहे. 000000

संवादपर्वः श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे पथनाट्यातून शासकीय योजनांचा जागर

Image
अलिबाग दि.5,(जिमाका)- माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत गणेशोत्सवात संवादपर्व कार्यक्रमात   श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे, रोहा येथे  'वाटचाल रायगडची' या पथनाट्यातून शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. शासकीय उपक्रम व योजनांची माहिती देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या संवाद पर्व या कार्यक्रमाचे आयोजन   श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणे, ता.रोहा येथे करण्यात आले होते. जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली.             यावेळी श्री शिव गणेश मित्र मंडळ बाजारपेठ नागोठणेचे अध्यक्ष अरविंद जावरे,  उपाध्यक्ष संतोष जैन, उपाध्यक्ष सचिन मोदी, सचिव अमित मोदी, खजिनदार नरेश जैन, सहसचिव संतोष इप्ते, सहखजिनदार सचिन जैन, सल्लागार मंगेश तेरडे,  मंडळाचे सदस्य, प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबागचे  प्रतिम सुतार, प्रणिता गोंधळी, स्वप्नाली थळे,  सुचित जावरे आदि उपस्थित