ग्रंथालय, ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले


अलिबाग,(जिमाका)दि.6- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून
 उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, ग्रंथालय क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यकर्ता आणि ग्रंथालय सेवक यांचेकडून ग्रंथालय कार्यकर्ता व ग्रंथमित्र या पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविले आहेत.
शासनमान्य् सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट् ग्रंथालय पुरस्कार देण्यात येतात. त्याचप्रमाणे ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनाही डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.
राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ ब क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार रुपये, 30 हजार रुपये,20 हजार रुपये, 10हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट् कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागस्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता  व सेवक यांना प्रत्येकी 15 हजार  रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते.
सन 2017-18 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 20 सप्टेंबर 2017 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी या कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक किरण गं.धांडोरे, व जिल्हा ग्रंथालय अधिकारी  ध.बा.वळवी, यांनी केले आहे.    

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक