Posts

Showing posts from May 5, 2024

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन

                रायगड,दि.09 (जिमाका):  केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार पुरस्कार दिला जातो. त्यानुषंगाने बाल शक्ती पुरस्कार-2025 या वर्षासाठी दि.1 एप्रिल ते दि.31 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार -ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज ( https://awards.gov.in ) या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पध्दतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण फामगिरी केली आहे त्यांचे प्रस्ताव ( https://awards.gov.in )  स

32-रायगड लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत

  रायगड(जिमाका)दि.09:-  32 रायगड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर व दापोली या विधानसभा मतदार संघामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान केंद्रावरील मतपेट्या जिल्हा क्रिडा संकुल नेहुली, अलिबाग या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉग रुममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉग रुमच्या सुरक्षेकरिता मा.निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण बंदोबस्त व्यवस्थेचे प्रभारी अधिकारी म्हणून श्री.विनीत चौधरी, उप-विभागीय पोलीस अधिकारी, अलिबाग यांना नियुक्त करण्यात आले आहे. सुरक्षा व्यवस्था खालीलप्रमाणे असेल पहिला स्तर -पहिल्या स्तरामध्ये केंद्रिय सशस्त्र दल CRPF 113 बटालीयन G कंपनी चे एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमधील सशस्त्र जवान हे स्ट्रॉग रुमच्या जवळच्या सर्वात आतील कॉर्डन 1 मध्ये असतील व त्यांची स्ट्रॉग रुम वर 24 तास नजर असेल. तसेच स्ट्रॉग रुममध्ये लावण्यात आलेल्या सी.सी.टी.व्ही.चे कंट्रोल रुम यांच्या ताब्यात असेल.

उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि.31 मे पर्यंत

    रायगड,(जिमाका):-दि.09 :-  सर्व उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा मानदे कायद्या नुसार त्यांच्या आस्थापनेत उत्पादित/आयात केलेल्या अन्नपदार्थांबाबत वार्षिक परतावा सादर करणे बंधनकारक असून उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांना वार्षिक परतावा भरण्याची मुदत दि. 31 मे 2024 पर्यंत आहे. सर्व उत्पादक व आयातदार पेढयांनी आपला वार्षिक परतावा दि. 31 मे 2024 पर्यंत अगोदरच  foscos.fssai.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन दाखल करावा. दि. 31 मे 2024 नंतर अन्न परतावा दाखल केल्यास प्रती दिन 100/- अशी दंडाची आकारणी करण्यात येते याची उत्पादक व आयातदार अन्न व्यवसायिकांनी नोंद घ्यावी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन पेण नि.दि.मोहिते यांनी कळविले आहे. ०००००००

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नवीन स्थलांतरित जागेत कामकाज सुरु

    रायगड,(जिमाका):-दि.09 :-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण या कार्यालयाचे सर्व कामक ाज   दि .10 मे 2024   पासून   मौजे जिते येथ ी ल नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात  आले असून   वाहन व अनुज्ञप्ती संदर्भातील सर्व कामकाजासाठी जनतेने दि .10 मे 2024   पासून मौजे जिते या ठिकाणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण गट नं  28 / 1 , मु.पो .   जिते, ता-पेण, जि-रायगड ,   दू .   क्र .02143-252234  वर  संपर्क साधावा ,   असे  आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे . उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयास गट नं.  28 / 1 , मौजे जिते, ता.पेण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय जागेत रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून दिनांक  23 मार्च 2024   रोजी परिवहन आयुक्त,   विवेक भीमनवार    यां च्या   हस्ते  या   इमारती चा   उदघाटन सोहळा संपन्न झाला आहे. पेण-खोपोली बायपास रोड तसेच विकासस्मृती या इमारतीमध्ये सुरू असलेले अनुज्ञप्नी विभागाचे सर्व कामकाज दि .29 एप्रिल 2024    पासून मौजे जिते येथ ी ल नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. वाहन

नाशिक येथे प्रेरणा रॅलीचे आयोजन जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा

    रायगड,(जिमाका):-दि.09 :-  बॉईज स्पोटर्स कंपनी आर्टीलरी सेंटर नाशिक रोड येथे दि.17 ते दि.19 मे 2024 या कालावधीत साधारण व सिध्द खेळाडूंना स्पोटर्स कॅडेट म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रेरणा रॅली काढण्यात येणार असून या रॅलीकरिता जिल्ह्यातील तायक्वांदो खेळाडूंनी प्रेरणा रॅलीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत), ले.कर्नल राहुल वैजनाथ माने  यांनी केले आहे.   या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंची वयोमर्यादा  08 ते 14 वर्षे असून यासाठी सहा रंगीत पासपेार्ट फोटो   तसेच    जन्मपत्र ,   जात   प्रमाणपत्र , चा रित्र्य   प्रमाणपत्र ,  अ धि वास प्रमाण प त्राच्या   म ू ळ प्रत ी आणि  जिल्हा पातळीवर खेळले असल्यास त्या खेळाचे म ू ळ प्रमाणपत्र   ही लागणारी आवश्यक कागदपत्रे आहेत.  ०००००००

32-रायगड लोकसभा मतदारसंघात 60.51 टक्के मतदान मतदार याद्या परिपूर्ण असल्याने सुरळीत मतदान

    रायगड (जिमाका)दि.08 :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघात दि.7 मे रोजी 2024  रोजी सकाळी सात ते सायंकाळी  मतदान संपेपर्यंत एकूण 10 लाख 9 हजार 567  मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  असून एकूण 60.51 टक्के मतदान झाले आहे, यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 334 तर महिला मतदार 5 लाख 9 हजार 233 असल्याची मााहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे. 32 रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16 लाख 68 हजार 372 मतदार असून 8 लाख 47 हजार 763 महिला तर 8 लाख 20 हजार 605 पुरष आणि 4 तृतीयपंथीय मतदार आहेत. विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे आहे, 191-पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 3 लाख 3 हजार 308 इतके मतदार असून 1 लाख 95 हजार 653 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1 लाख 2 हजार 255 पुरुष तर 93 हजार 398 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 192-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 2 लाख 97 हजार 396 मतदार असून त्यापैकी 1 लाख 98 हजार 289 मतदारांनी मतदान केले असून  यामध्ये 1 लाख 629 पुरुष तर 97 हजार 660 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 193- श्रीवर्धन विधानसभा मतदार

निवडणूक प्रक्रीयेच्या पाहणीसाठी विदेशी प्रतिनिधी मंडळाचे अलिबाग येथे झाले आगमन भारतीय पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत मतदान साहित्य वाटप-वाहतूक प्रक्रिया पाहणी आणि स्ट्रॉंग रूमला भेट

Image
  रायगड(जिमाका)दि.6:-  भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी  आइव्हीपी कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत विदेशी प्रतिनिधीचे मंडळ निवडणूक प्रक्रीयेची पाहणी करण्याकरीता रायगड जिल्ह्यातील 32 रायगड लोकसभा मतदार संघात आगमन झाले आहे. या प्रतिनिधी मंडळाने आज अलिबाग विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी आणि टीमच्या साहित्य वाटप, वाहतूक आणि स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्षाची पाहणी केली. भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था (EMBs) यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी International Election Visitors Programme (IEVP) कार्यक्रम आयोजित केला आहे. या विदेशी प्रतिनिधी मंडळाचे रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भारतीय संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने औक्षण, फेटा आणि हार घालून स्वागत करण्यात आले. या विदेशी प्रतिनिधी मंडळ मध्ये बांग्लादेशचे 2 प्रतिनिधी महंमद मोनिरुझ्झमन टी,जी एम शाहताब उद्दीन (बांग्लादेश निवडणूक आयोग

केंद्रीय संचार ब्युरोमार्फत अलिबाग येथे मतदारांमध्ये जनजागृती पथनाट्यांना पर्यटकांचा जोरदार प्रतिसाद, मतदान करण्याची केली प्रतिज्ञा

Image
    रायगड,(जिमाका)दि. 6:- लोकसभा निवडणूक  2024  च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो ,  पुणे विभागीय कार्यालयामार्फत  स्थानिक जिल्हा प्रशासन ,  नेहरू युवा केंद्र तसेच प्रिझम सामाजिक विकास संघटना यांचे सहकार्याने रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम ( SVEEP)  राबविण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी  श्रीमती  स्नेहा उबाळे ,  प्रांताधिकारी मुकेश चव्हाण ,  नायब तहसिलदार अजित तोलकर आणि अलिबाग येथील राज्य परिवहन महामंडळाचे आगार व्यवस्थापक अजय वनारसे ,  केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी सहायक पी. कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. अलिबाग हे कोकणातील लोकप्रिय असे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबई ,  पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून याठिकाणी पर्यटक विरंगुळ्याचे क्षण घालवण्यासाठी दररोज दाखल होतात. विशेषतः शनिवार ,  रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी अलिबाग परिसर हा पर्यटकांच्या गर्दीने फुललेला असतो. या बाबी विचारात घेता पर्यटकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोमार्फत अलिबाग समुद्रकिनारा आणि अलिबाग बस स्ट

मतदानासाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी भर पगारी रजा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांचे आदेश

    रायगड दि.05(जिमाका) :-32  रायगड लोकसभा मतदारसंघात क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या  प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी मंगळवार 7 मे  2024 रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.    जिल्हातील 32  रायगड लोकसभा मतदार संघात  तिस-या टप्प्यात मंगळवार 7 मे रोजी मतदान होणार आहे . या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना मंगळवार दिनांक 7 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती/अटीस अधिन राहून देय आहे. 1) सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे.  2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थित

सोशल मिडीयावर रायगड पोलिसांची करडी नजर

  रायगड,दि.5जिमाका  -रायगड लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील पोलीस सायबर सेल आणि मिडीया सेल च्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येत आहे.सोशल मिडीया (व्हॉट्सअॅप) वर लोकसभा 2024 च्या अनुषंगाने आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण करणारी ऑडीओ क्लिप व्हायरल करण्याऱ्या अज्ञात ईसमावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुक 2024 चे पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस दलाकडून सोशल मिडीया मॉनेटरिंग करण्याकरीता सोशल मिडीया सेल स्थापन करण्यात आलेला असून त्याव्दारे फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम व टियूटर या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे नेत्यांनी केलली भाषणे व त्या अनुषंगाने लोकांनी केलेली टीका टिप्पणी तसेच वॉट्सप ग्रुपवर लोकांनी व्हिडीओ,ऑडीओ व इतर प्रकारे केलेल्या पोस्ट या ऐकुन पाहुन व वाचन करून त्या मधील आक्षेपाहर्य पोस्ट मिळून आल्यास त्यावर योग्यती कार्यवाही करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी निर्देश दिले आहेत. त्यानुसार सोशल मिडीया लॅबब्दारे मॉनि

रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज ---जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे

Image
  रायगड,(जिमाका) दि.5:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 32-रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान येत्या 7 मे रोजी होत आहे. निवडणूक मतदानासाठी यंत्रणा सज्ज असून प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, उन्हाळ्याची स्थिती लक्षात घेता औषधे, पाच पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रावर बैठकव्यवस्था, उन्हाळा लक्षात घेता मंडप उभारणी आदी सुविधेसोबतच इतर तांत्रिक बाबींची पूर्तताही करण्यात आली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार होईल, मतदारांनी  निर्भय होऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले. अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक मतदान पूर्वतयारीबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व पत्रकारांशी जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री.जावळे