उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नवीन स्थलांतरित जागेत कामकाज सुरु

 

 

रायगड,(जिमाका):-दि.09:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण या कार्यालयाचे सर्व कामकाज दि.10 मे 2024 पासून मौजे जिते येथल नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले असून वाहन व अनुज्ञप्ती संदर्भातील सर्व कामकाजासाठी जनतेने दि.10 मे 2024 पासून मौजे जिते या ठिकाणी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण गट नं 28/1, मु.पो. जिते, ता-पेण, जि-रायगड, दू. क्र.02143-252234  वर संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पेण कार्यालयास गट नं. 28/1, मौजे जिते, ता.पेण या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासकीय जागेत रस्ता सुरक्षा हॉल व कार्यालयीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून दिनांक 23 मार्च 2024 रोजी परिवहन आयुक्त, विवेक भीमनवार  यांच्या हस्ते या इमारतीचा उदघाटन सोहळा संपन्न झाला आहे.

पेण-खोपोली बायपास रोड तसेच विकासस्मृती या इमारतीमध्ये सुरू असलेले अनुज्ञप्नी विभागाचे सर्व कामकाज दि.29 एप्रिल 2024  पासून मौजे जिते येथल नवीन इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

वाहन मालक, चालक तसेच नागरिकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे, मौजे जिते येथल नवीन इमारतीत सर्व कामकज सुरळीत होईपर्यंत सहकार्य करावे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड