Posts

Showing posts from June 10, 2018

जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय १६ व १७ ला सुरु राहणार

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-   विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रवेशासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी   जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयाचे कामकाज येत्या शनिवार दि.16 व रविवार दि.17 रोजी शासकीय सुटी असली तरी सुरु राहणार आहे.   या संदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगडचे सदस्य तथा उपायुक्त सामाजिक न्याय विभाग विशाल नाईक यांनी केलेल्या आवाहनानुसार, 2017-18 या शैक्षणिक   वर्षात इयत्ता 12 वी (शास्त्र) या वर्गात शिक्षण घेत असलेल्या   व जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीकडे अर्ज सादर केलेल्या अर्जदारांपैकी   ज्या अर्जदारांना अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,त्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेअभावी या समितीकडे प्रलंबित आहेत अशा अर्जदारांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी   शनिवार दि.16 जून व रविवार दि.17 जून रोजी शासकीय सुट्टीच्यादिवशी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.तरी ज्यांना अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा अर्जदारांनी या समितीच्या कार्यालयाकडे आपणाकडे उपलब्ध जातनोंदविषयक कागदपत्रांच्या मूळ व सत्यप्रतींसह समक्ष उपस्थित राहून त्र

म्हसळा येथील आय.टी.आय.मध्ये ऑनलाईन प्रवेश सुविधा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - आगरवाडा ता. म्हसळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ( आय.टी.आय) मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन प्रवेश सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे संधाता,नळकारागिर, कर्तन व शिवण या व्यवसायासाठी ऑगस्ट-2018   सत्र   प्रवेशाकरीता ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. हे अर्ज भरुन विद्यार्थ्यांनी सकाळी 11 ते सायं. पाच वाजेपर्यंत या वेळात सादर करावेत. प्रवेशाकरीता व्यवसाय, मंजूर जागा, शैक्षणिक अर्हता व   कालावधी पुढीलप्रमाणे- 1.)संधाता (वेल्डर) -16 जागा, प्रवेश उपलब्ध-21 जागा-दहावी पास,नापास,1 वर्ष. 2.) नळकारागिर (प्लंबर)-20 जागा,प्रवेश उपलब्ध-26, दहावी पास,1वर्ष. 3.) कर्तन व शिवण (स्युईंग टेक्नॉलॉजी)16 जागा,प्रवेश उपलब्ध-21, दहावी पास-नापास, 1वर्ष. 4.)जोडारी (फिटर)- 16 जागा,प्रवेश उपलब्ध-21, दहावी पास,2वर्ष. 5.) वीजतंत्री (इलेक्ट्रिीशियन) -16 जागा, प्रवेश उपलब्ध-21 जागा, दहावी पास,दोन वर्ष.   6.) यांत्रिक इलेकट्रॉनिक (इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिकल)-20 जागा, प्रवेश उपलबध-26, दहावी पास,दोन वर्ष. सविस्तर माहितीसाठी माहितीपुस्तकही ऑनला

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 - जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.28 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 217.49   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 1.00 मि.मि., पेण-3.00 मि.मि., मुरुड-2.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-0.40 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-11.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-4.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-0.00, म्हसळा-9.06मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-1.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 36.48 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.28 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   6.92 % इतकी आहे. ०००००

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.33 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 215.21   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 2.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-5.40 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00 मि.मि., तळा-3.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-3.00, म्हसळा-2.00मि.मि., श्रीवर्धन-3.00 मि.मि., माथेरान-2.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 21.20 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 1.33 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   6.85 % इतकी आहे. 00000

मतदानाच्या वेळेत बदल

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14 -   भारत निवडणूक आयोगाकडील दि.13 जून 2018 रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने   महाराष्ट्र विधानपरिषदेची 2 पदवीधर व 2 शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकी करिता मतदानाची वेळे 2 तसांनी वाढविली आहे. सोमवार दि. 25 जून 2018 रोजी    मतदान    होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत केली आहे.   असे अ.ना.वळवी, उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी   यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. ------------

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा

  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14-   जिल्ह्यात   मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व   कोकण विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक-2018 जाहीर झाली आहे.   सोमवार दि. 25 जून 2018 रोजी   मतदान   असून सदर दिवशी महाराष्ट्र शासन निर्णय दि.25 जून   2011 अन्वये पदवीधर मतदार संघातील तसेच शिक्षक मतदार संघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदारसंघाच्या निवडणूकीच्या दिवशी    मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्या दिवसाची विशेष नैमित्तिक रजा   मंजूर केली आहे.   सदर रजा ही कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमित्तीक रजेव्यतिरिक्त असेल असे उप जिल्हाधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी रायगड-अलिबाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 0 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 2 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.69 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 213.29   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 1.00 मि.मि., पेण-4.20 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-1.80 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-5.40 मि.मि., खालापूर-6.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-3.50 मि.मि., तळा-5.00 मि.मि., महाड-1.00 मि.मि., पोलादपूर-80.00, म्हसळा-7.20मि.मि., श्रीवर्धन-0.50 मि.मि., माथेरान-4.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 43.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 2.69 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   6.79 % इतकी आहे. 00 00

र.वा.दिघे स्मृती पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 - कोकणातील साहित्यिक कै. र.वा.दिघे यांच्या नावाने कोकणातील साहित्यिकांसाठी गेल्या 10 वर्षापासून पुरस्कार देण्यात येत आहे. रुपये पाच हजार तसेच स्मृतीचिन्ह् असे पुरस्काराचे स्वरुप असून गुरुवार दि.19 जुलै रोजी पत्रकार संघाच्या वर्धापनदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 1 मे 2017 ते 15 जून 2018 या कालावधीत ज्यांची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. अशा लेखकांनी सोमवार दि.25 जून 2018 पर्यंत आपली पुस्तके दोन प्रतीत अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ, रामनारायण पत्रकार भवन, ता.अलिबाग जि.रायगड या पत्त्यावर पाठवावेत,असे आवाहन अध्यक्ष, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ यांनी केले आहे.संपर्कासाठी फोन नं.9370690626,9767341291 असा आहे.

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22 मि.मि.पावसाची नोंद

         अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.11 - रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.93 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.    तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण    सरासरी 210.60   मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-                अलिबाग 6.00 मि.मि., पेण-14.00 मि.मि., मुरुड-6.00 मि.मि., पनवेल-6. 40 मि.मि., उरण-28.00 मि.मि., कर्जत-17.60 मि.मि., खालापूर-13.00 मि.मि., माणगांव-25.00 मि.मि., रोहा-38.00 मि.मि., सुधागड-9.50 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-73.00 मि.मि., पोलादपूर-40.00, म्हसळा-20.60मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-41.80 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 366.90 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 22.93 मि    इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी   6.70 % इतकी आहे. 00 00