जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय १६ व १७ ला सुरु राहणार



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण प्रवेशासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयाचे कामकाज येत्या शनिवार दि.16 व रविवार दि.17 रोजी शासकीय सुटी असली तरी सुरु राहणार आहे.
 या संदर्भात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगडचे सदस्य तथा उपायुक्त सामाजिक न्याय विभाग विशाल नाईक यांनी केलेल्या आवाहनानुसार, 2017-18 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी (शास्त्र) या वर्गात शिक्षण घेत असलेल्या  व जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी या समितीकडे अर्ज सादर केलेल्या अर्जदारांपैकी  ज्या अर्जदारांना अद्याप जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही,त्यांचे अर्ज त्रुटीपूर्ततेअभावी या समितीकडे प्रलंबित आहेत अशा अर्जदारांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी   शनिवार दि.16 जून व रविवार दि.17 जून रोजी शासकीय सुट्टीच्यादिवशी कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.तरी ज्यांना अद्यापपर्यंत जातवैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा अर्जदारांनी या समितीच्या कार्यालयाकडे आपणाकडे उपलब्ध जातनोंदविषयक कागदपत्रांच्या मूळ व सत्यप्रतींसह समक्ष उपस्थित राहून त्रूटींची पूर्तता करावी. जेणेकरुन आपली पुढील प्रवेशप्रक्रिया सुलभ होईल.  अधिक माहितीसाठी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती, दुसरा मजला डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ, गोंधळपाडा अलिबाग दूरध्वनी क्रमांक 02141-228603 येथे संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड विशाल नाईक, यांनी  केले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक