Posts

Showing posts from May 14, 2023

जिल्हा न्यायालयासाठी बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पध्दतीने डाटा एन्ट्री ऑपरेटर्स करिता ई-निविदा जाहीर

  अलिबाग,दि.१८(जिमाका):-  जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग यांच्या कार्यालयासाठी मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार बाह्य यंत्रणेमार्फत १९ डाटा एन्ट्री ऑपरेटर्स (Data Entry Operators)  यांची सेवा कंत्राटी पध्दतीने उपलब्ध करुन घेण्याची असून त्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने शासनाच्या  http://mahatenders.gov.in  या संकेतस्थळावर दि.१२ मे २०२३ रोजी निविदा जाहिरात प्रसिध्द करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी न्यायालय व्यवस्थापक, जिल्हा न्यायालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा न्यायालय व्यवस्थापक श्री.महेश दायमा यांनी केले आहे. ००००००००

आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टिक तृणधान्य) वर्ष 2023 निमित्त श्रीवर्धन येथे मल्टिमीडीया प्रदर्शनाचे आयोजन

    अलिबाग,दि.१८(जिमाका):-  केंद्र  सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो ,  प्रादेशिक कार्यालय पुणे  व राज्य शासनाचे विविध विभाग तसेच नगरपरिषद श्रीवर्धन यांच्या सहकार्याने श्रीवर्धन येथील समुद्र किना ऱ्या वर  दि. 19 ते दि. 21 मे 2023 दरम्यान  आंतरराष्ट्रीय भरड धान्य (पौष्टिक तृणधान्य) वर्ष 2023 निमित्त मल्टिमीडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.             या पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्वाविषयी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी या मल्टीमीडीया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्र संघानी 2023 हे वर्षे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणू न  साजरे करण्याची घोषणा केली आहे.  मानवी शरीराला लागणारे पोषक घटक पुरवणारे अन्न म्हणून  या  धान्यांकडे बघितले जाते .  या तृणधान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, वरई, कोदो, कुटके,सावा, कूट्टु व राजगिरा या दहा धान्यांचा समावेश होतो. या   भरडधान्यांना सुपरफूड म्हटले जाते .             या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.  19 मे 2023 रोजी सकाळी 11  वाजता मान्यवरांच्या

मुख्य पोस्टमास्तर जनरल मुंबई येथे 123 व्या डाक अदालतीचे आयोजन

  अलिबाग,दि.१८(जिमाका):-  पोस्टाची सेवा देताना संभाषणामध्ये, पत्र व्यवहारांमध्ये किंवा सेवेतील काही त्रुटींमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात की, त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते.  या तक्रारीच्या योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे.त्यामध्ये पोस्ट विभागाचे अधिकारी तक्रार सोडविण्याचा प्रयत्न करतात.  यानुषंगाने मुख्य पोस्ट जनरल महाराष्ट्र सरकार मुंबई द्वारे दि. 20 जून 2023 रोजी दुपारी 3 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये 123 वी डाक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक आर्थिक जीवनाचा एक अभिनव भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण केले आहे. पोस्ट खातेही लोकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा व ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचे प्रयत्न करीत आहे.   महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारीचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर

मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध--- केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला

Image
  अलिबाग,दि.१८(जिमाका):-  भारत देशाला लांबच लांब समुद्रकिनारे लाभले आहेत. या सामुद्रिक संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या आमच्या मच्छीमार बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासन कटिबद्ध आहोत, असे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री.परषोत्तम रूपाला यांनी काल (१७ मे ) रोजी करंजा जेट्टी, उरण येथे केले.     सागर परिक्रमा कार्यक्रम २०२३ अंतर्गत पाचव्या चरणाचा शुभारंभ उरण तालुक्यातील करंजा जेट्टी येथून संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.      यावेळी व्यासपीठावर राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, केंद्रीय मंत्री महोदयांच्या पत्नी श्रीमती रुपाला, केंद्रीय मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी श्री.अभिलाष लेखी, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ.अतुल पाटणे, सहसचिव डॉ.जे.बालाजी, श्री.पंकज कुमार,भारतीय तटरक्षक दलाचे डीआयजी अनुराग कश्यप, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त महेश देवरे, सहाय्यक आयुक्त संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.     

रायगड ते काणकोण हा सागर परिक्रमेचा पाचवा टप्पा 17 ते 19 मे दरम्यान होणार केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, सागर परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात सहभागी होणार

      अलिबाग,दि.1 7 (जिमाका):- सागर परिक्रमा उपक्रमाचा पाचवा टप्पा सुरू करण्याची घोषणा,   केंद्रीय मत्स्यव्यवसाय,   पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने केली आहे. महाराष्ट्रात रायगड इथून   17   मे   2023   रोजी ही परिक्रमा सुरु होऊन, 19   मे   2023   रोजी गोव्यात काणकोण इथे या टप्प्याची सांगता होईल. रायगड ते काणकोण या पट्ट्यातील मच्छिमार आणि इतर मत्स्यव्यावसायिक तसंच संबंधितांच्या समस्या जाणून घेणे,   प्रधानमंत्री मत्स्य संपदा   (PMMSY)   आणि किसान क्रेडिट कार्ड (KCC)   यांसारख्या विविध मत्स्यपालन योजना आणि उपक्रमांचा लाभ मिळवून देऊन त्यांची उन्नती साधणे,     हे या परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याचे उद्दिष्ट आहे.     केंद्रीय मत्स्यव्यवसाय,   पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह विविध प्रतिष्ठित मान्यवर,   तसेच विविध सरकारी संस्था,   संघटना आणि आस्थापनांचे अधिकारी,   परिक्रमेच्या या पाचव्या टप्प्यात सहभागी होणार आहेत. ही सागर परिक्रमा म्हणजे,   भारतीय स्वातंत्र्याला   75   वर्षे पूर्ण झाल्या निमित्त साजऱ्या झालेल्या आझादी का अमृत महोत्सवामागील भावनेचे स्मरण करत

छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा इच्छुक विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा

    अलिबाग,दि.16(जिमाका):-  पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत पेण विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थी व पालकांकरिता गुरुवार, दि.18 मे 2023 रोजी सकाळी 9 वाजता आगरी समाज सभागृह, चिंचपाडा पेण येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या शिबिरात  “ दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना करीअरच्या संधी ”  या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, कौशल्याधारित व्यवसाय अभ्यासक्रम, व्यक्तिमत्व विकास, शिक्षणिक कर्ज  इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   तरी पेण मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवार, विद्यार्थी  व पालक यांनी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पेण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या विद्या पाटील यांनी केले आहे. ०००००००

व्हॉलीबॉल खेळाडूंनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

  अलिबाग,दि.16 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील व्हॉलीबॉल प्रशिक्षणाच्या दृष्टीने दि.1 जानेवारी 2023 रोजी 17 वर्षे आतील असलेले व्हॉलीबॉल खेळाडू  तसेच ज्यांची उंची 6 फूट 2 इंच इतकी असेल तर असे व्हॉलीबॉल खेळाडू आणि जे खेळाडू  सन 2019-20 मधील शालेय, जिल्हा स्तर, विभाग, किंवा राज्य स्तर व्हॉलीबॉल स्पर्धेत प्रथम चार क्रमांक मिळविला असेल तथापि 17 वर्षे वयाची अट आणि उंचीची अट पूर्ण करणारे व्हॉलीबॉल खेळाडूंनी  तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,अलिबाग रायगड यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी आवाहन केले आहे. 000000

उन्हात फिरणे टाळा..उष्माघातापासून सांभाळा…! --जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे

    अलिबाग,दि.15(जिमाका):-  रायगड जिल्हा उष्माघातप्रवण आहे. त्यानुषंगाने दि.1 मार्च ते दि.15 जून 2023 या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सर्व कार्यकारी यंत्रणामध्ये समन्वय राहण्यासाठी उन्हाळी हंगामातील उष्मलाटेमुळे उद्भवणाऱ्या उष्माघातानी मानव, पशु-प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर विविध विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड डॉ.योगेश म्हसे यांनी सर्व शासकीय विभागांना आदेशित केले आहे. तसेच नागरिकांना  “ उन्हात फिरणे टाळा..उष्माघातापासून सांभाळा…! ”  असे आवाहनही केले आहे.            वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे रायगड जिल्हा उष्मालाट प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी संयुक्तरित्या आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेत उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरप

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या तळा येथील मुलांचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

      अलिबाग,दि.15 (जिमाका):  सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, हे बोरघर हवेली, तालुका क्रीडा संकुला जवळ ता.तळा, जि. रायगड येथे कार्यरत आहे. या वसतिगृहाची मान्य संख्या 100 आहे. या वसतिगृहात इ.8    वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे:- अनुसूचित जाती- 80 टक्के अनुसूचित जमाती- 03 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमाती- 05 टक्के, आर्थिक मागास व इतर मागास वर्गातील दारिद्रयरेषेखालील कुटूंबातील विद्यार्थी 5 टक्के, विशेष मागास प्रवर्ग- 02 टक्के, अनाथ- 02 टक्के, अपंग- 03 टक्के. या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.वसतिगृहात विद्यार्थ्याकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहामध्ये नाष्टा व भोजनाची विनामूल्य व्यवस्था आहे.  नाश्ता :-  दररोज पोहे/ शिरा/उपीट इ. पैकी एक आलटून पालटून तसेच उकडलेली दोन अंडी, एक सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध दररोज नाष्ट्यासाठी विनामूल्य देण्यात येते.     भोजन व्यवस्था :-  दुपार व सायंकाळी जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड, सलाड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो. वसतिगृहामध्ये 8 वी ते 10 वी च्या

“सागरी परिक्रमा यात्रा” करंजा येथील कार्यक्रमाला जिल्ह्यातील मच्छिमार बांधव, मत्स्य व्यवसायिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे --सहाय्यक आयुक्त संजय पाटील

  अलिबाग,दि.15(जिमाका):-   सागर परिक्रमा कार्यक्रम-2023 (तृतीय चरण) गुजरात येथून सुरू झालेल्या सागर परिक्रमा यात्रेला दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सातपाटी येथून प्रारंभ झाला आहे.    ही यात्रा  “ देशाची अन्नसुरक्षा, किनारपट्टीवर निवास करणाऱ्या मच्छिमारांची उपजीविका आणि सागर पर्यावरणाची सुरक्षा ”  या मुद्यांवर केंद्रित आहे.    भारत सरकारच्या मत्स्यपालन विभागाने (Fisheries Department) ही यात्रा  “ आजादी का अमृत महोत्सव ”  चा एक भागून आयोजित केली आहे.   या सागर परिक्रमा यात्रेचे हे पाचवे चरण उरण तालुक्यातील करंजा येथून दि.17 मे 2023 रोजी सुरू होऊन दि.18 मे 2023 रोजी रत्नागिरी येथे समाप्त होईल.    ही सागर परिक्रमा यात्रा करंजा, मिरकरवाडा व मिऱ्या बंदर येथे संपन्न होणार आहे. या यात्रेतून प्रगतशील मच्छिमार मुख्यत्वे किनारी भागात निवास करणारे मच्छिमार, मत्स्य शेतकरी, तरुण मत्स्य उद्योजक इत्यादींना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY), केसीसी FIDF आणि महाराष्ट्र राज्याच्या मत्स्य व्यवसाय    विषयक योजनांची माहिती दिली जाईल.   या कार्यक्रमासाठी विधानसभा अध्यक्ष श्री.राहुल ना

लोकाभिमुख प्रशासनाची जय्यत तयारी.. शासन आपल्या दारी..!

  अलिबाग,दि.15(जिमाका) :-   कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते.    शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवत असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत    यासाठी शासनाने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे.. या उपक्रमांतर्गत शासन शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी    थेट जनतेपर्यंत घरोघरी    जाणार आहे. या उपक्रमाचे नाव आहे   “ शासन आपल्या दारी..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून लोकाभिमुखतेची ग्वाही दिली आहे. या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातारा येथे नुकताच शुभारंभ झाला. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.    त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यातील लाखो गरजू व्यक्तींना या