Posts

Showing posts from December 9, 2018

गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्ह्यात आजअखेर 4 लाख 23 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.16- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार दि.27 पासून गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात शनिवार (दि.15 डिसेंबर)  अखेर जिल्ह्यातील 4 लाख 23 हजार 652  बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार काल (शनिवार दि.15) दिवसअखेर   जिल्ह्यातील 126 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 19 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 1589 विद्यार्थ्यांना तर 105 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 11 हजार 643 विद्यार्थ्यांना अशा एकूण 13 हजार 232 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात 6 हजार 696 मुले व 6 हजार 536 मुलींचा समावेश आहे.   तर आज अखेर एकूण 2 लाख 20 हजार 435 मुले   व 2 लाख 3   हजार 217 मुली असे एकूण 4 लाख 23 हजार 652 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी   माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी    डॉ.सचिन देसाई यांनी दि

ग्रंथांनीच घडविला आमच्यातला साहित्यिक परिसंवादातून साहित्यिकांनी व्यक्त केले ग्रंथांचे ऋण

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘माझ्या जडणघडणीतील ग्रंथांचे महत्व’ या विषयावर आयोजित परिसंवादात मान्यवर साहित्यिकांनी ‘आपली साहित्यिक म्हणून झालेली जडण घडण ग्रंथांमुळेच झाली’, अशा शब्दात ग्रंथांप्रति आपले ऋण व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने आयोजित रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018चेआयोजन सार्वजनिक वाचनालय डोंगरे हॉल येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात ‘ माझ्या जडणघडणीतील ग्रंथांचे महत्त्व’ या विषयावर आपली मते मांडली. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अलिबाग येथील ज्येष्ठ साहित्यिक विलास नाईक हे होते. या परिसंवादात उरण येथील एल.बी. पाटील, पनवेल येथील प्रा. चंद्रकांत मढवी, गोरेगाव येथील डॉ. नंदकुमार मराठे, अलिबाग येथील पूजा वैशंपायन या साहित्यिकांनी सहभाग घेतला. यावेळी उरण येथील एल. बी. पाटील म्हणाले की, मी खेडेगावातला, पाठ्यपुस्तकां व्यतिरिक्त फारसे वाचन नाही पण निसर्

कवि संमेलनातून घडला प्रतिभाविष्कार

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जिल्ह्यातील प्रसिध्द कवींच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण   कवि संमेलनात झाले. या मान्यवर कविवर्यांच्या काव्य सादरीकरणातून अलिबागकर रसिक वाचकांना प्रतिभाविष्काराची प्रचिती मिळाली. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सहयाद्री मंडळ अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे हे होते. या कविसंमेलनात सिद्धेश लखमंदे, प्रा.महेश नायकुडे, वैभव धनावडे,   संध्या दिवकर,   विनायक पवार, बाबू पूजारी, पुंडलिक म्हात्रे, उमा कोल्हे,   दिलीप मोकल,   म.वा. म्हात्रे, विनोद टेंबुलकर, सायली राऊळ,हरिश्चंद्र माळी, आशिष पाटील, प्रा. महेश बिऱ्हाडे, कल्पेश शहा, प्रतिक धनावडे,     आदी कविंनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या. जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी उपस्थित कविंचे स्वागत केले. या कविंनी आपल्या रचनांमधून आपापले भावविश्व उपस्थित रसिकांसमोर शब्दबद्ध केले. प्रारंभी सिद्धेश लखमंदे यांनी आपल्या कवी या कवितेतून आपल्या कवित्वाची कवाडे रसिकांसमोर उघडली. वैभव धनावडे यांनी षडाक्षरी कविता रसिकांची दाद घेऊन गेली तर संध्या दि

माणूस घडविण्यासाठी वाचनसंस्कार महत्त्वाचा ‘माध्यमे व वाचन संस्कृती’ परिसंवादात मान्यवर वक्त्यांनी मांडले विचार

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- वाचनाने ज्ञान, माहिती मिळते हे जरी खरे असले तरी त्या ज्ञानाने समृद्ध असा माणूस घडविण्यासाठी वाचनाचा संस्कार महत्त्वाचा आहे, असे मत ‘माध्यमे व वाचन संस्कृती’ या परिसंवादात सहभागी मान्यवर वक्त्यांनी मांडले. रायगड जिल्हा ग्रंथोत्सवात उद्घाटन सत्रानंतर ‘माध्यमे व वाचन संस्कृती’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी   अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार अमर वार्डे हे होते. या परिसंवादात कांतीलाल कडू,पनवेल,संतोष पवार, माथेरान, नागेश कुलकर्णी, अलिबाग आदी मान्यवर पत्रकारांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी संतोष पवार म्हणाले की, वाचाल तर वाचाल हा उपदेश आपण नेहमी ऐकत असतो. तथापि, वाचन ही प्रक्रिया तुम्हाला ज्ञानी बनविणारी आहे आणि हे वाचन तुमच्यापर्यंत   पोहोचविण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. माध्यमांमुळे माहिती अनेकांपर्यंत पोहोचते.   मुद्रित माध्यमांच्या माहितीचा लाभ घेण्यासाठी साक्षर असणे आवश्यक आहे.   मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे माहिती ही न लिहिता वाचता येणाऱ्यांपर्यंतही पोहोचते. मात्र ज्ञान संपादन करण्यासा

जिल्हा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन : पुस्तकेच असतात खरे मित्र, गुरु आणि मार्गदर्शक- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- वाचनामुळे पुस्तकांची आपल्याला आवड निर्माण होते आणि हेच पुस्तके आपले खरे मित्र, गुरु आणि मार्गदर्शक बनतात, जीवनाच्या कठीण प्रसंगात आपल्याला आधार देतात, अशा शब्दात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी ग्रंथ व वाचन याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने आयोजित रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018 चे आज येथे थाटात उद्घाटन करण्यात आले. अलिबाग शहरातील डोंगरे सभागृहात हा सोहळा पार पडला.   यावेळी अलिबाग शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबागचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.राजेंद्र कुंभार, नागेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथपूजन करुन या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरां

दादली व टोळ पुलावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- सावित्री खाडीवरील दादली पूल व टोळ पूल कमकुवत झाल्याने त्यावरील अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत. या आदेशानुसार या पुलावरून केवळ 20 मे. टन वाहतूक प्रति तास 20 कि.मी या वेगानेच करता येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश जारी केले असून शासन राजपत्रही प्रकाशित झाले आहे. त्यानुसार, सावित्री खाडीवरील मांदाड तळा, इंदापूर, निजामपूर, पाचाड-महाड विसापूर रस्त्यामधील दादली पूल (लांबी 120.50 मीटर) तसेच वीर टोळ, आंबेत, बागमांडला रस्ता हा टोळ पूल (लांबी 158 मीटर) हे कमकुवत झाले आहेत असा अहवाल अधिक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ (पूल) कोकण भवन, नवीमुंबई यांनी त्यांच्या कार्यालयीन पथक व क्षेत्रीय अधिकारी यांनी पाहणी अंती दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी रायगड यांनी, मांदाड तळा इंदापूर निजामपूर पाचाड महाड विसापूर रस्ता दादली पूल व वीर टोळ, आंबेत, बागमांडला रस्ता हा टोळ पूल हे दोन्ही पूलावरूल अवजड व वेगवान वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊन फक्त 20 मे.टन पर्यंत वजनाची वाहतूक प्र

अलिबाग येथे आजपासून जिल्हा ग्रंथोत्सव

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.14- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथोत्सव – 2018 हा उपक्रम दिनांक 15 व 16 डिसेंबर, 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त माहितीनुसार, शनिवार दि.15 रोजी सकाळी साडेदहा वा. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते ग्रंथपूजन सोहळा होईल. यावेळी सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय, अलिबागचे अध्यक्ष ॲड. गौतम पाटील यांची उपस्थिती राहील.   उद्घाटन सोहळा हा केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून   राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान,अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण   राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. या सोहळ्यास   जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, लोकसभा सदस्य   खा.श्रीरंग बारणे, विधान परिष

राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा, 2018ः पुणे विभाग सर्वसाधारण विजेता;मुंबई विभाग उपविजेता

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13 -    जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत पुणे विभागाने सर्वाधिक 30 सुवर्णपदके, 13 रौप्य व 6 कांस्य पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकविले. यजमान मुंबई विभागाने 12 सुवर्णपदके, 23 रौप्य व 8 कांस्य पदकांसह उपविजेतेपद तर कोल्हापूर विभागाने 5 सुवर्णपदके, 4 रौप्य व 15 कांस्य पदकांसह तृतीय क्रमांक पटकविला. आजचे निकाल:- 14 वर्षाखालील मुली- 24 किलोखालील- 1) ईश्वरी जपे, पुणे 2) प्रियंका साठे, मुंबई 3) आदिती झुंझारे, लातून 3) समृध्दी नागरे, नाशिक 28 किलोखालील- 1) श्रावणी देशमुख, औरंगाबाद 2) वैष्णवी शिंदे, पुणे 3) मयुरी नाकट, अमरावती 3) यामिना मांढरे, नागपूर 32 किलोखालील- 1) पायल शिर्के, पुणे 2) प्रेरणा रावत, नागपूर 3) सुमित्रा वायफळे, औरंगाबाद 3) वैष्णवी चितळकर, नाशिक 37 किलोखालील- 1) धनश्री मदने 2) सृष्टी व्दिवेदी 3) ऋतुजा तांबे, कोल्हापूर 3) एड्रीन वेलमा, मुंबई 42 किलोखालील- 1) भिमिका मांडेकर, पुणे 2) मिताली जायभाये, औरंगाबाद 3) किमीक्षा शैलेशकुमार सिंह, मुंबई 3) नंदिनी करीये, नागपूर 46 किलोखालील- 1) गितांजली चव्हाण

केंद्रीयमंत्री ना.अनंत गिते यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13 -    केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना.अनंत गिते हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम याप्रमाणे- शनिवार दि.15 रोजी दुपारी एक वा. महाड एमआयडीसी येथे आगमन. दोन वा. महाड एमआयडीसी येथून चिपळूण ‍जि.रत्नागिरीकडे प्रयाण. रात्री साडेनऊ वा. महाड एमआयडीसी येथे आगमन व मुक्काम. रविवार दि.16 रोजी सकाळी सव्वा दहा वा. महाड एमआयडीसी येथून कावलेकडे प्रयाण.   अकरा वा. कावले येथे आगमन. दुपारी एक वा. कावले येथून महाड एमआयडीसीकडे प्रयाण. दुपारी दीड वा. महाड एमआयडीसी येथे आगमन.   सायं. पाच वा. महाड एमआयडीसी येथून जैन कॉलेज नागोठणेकडे प्रयाण.   सायं. सात वा. जैन कॉलेज नागोठणे येथे आगमन.   रात्री नऊ वा. जैन कॉलेज नागोठणे येथून मुंबईकडे प्रयाण.

गोवर रुबेला लसीकरण मोहिमः जिल्ह्यात 3 लाख 75 हजार बालकांना लसीकरण

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.13- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत गोवर रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे.  या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवार (दि.27 नोव्हेंबर) ते बुधवार (दि.12 डिसेंबर) अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 3 लाख 75 हजार 733 बालकांना गोवर रुबेला लसीकरण करण्यात आले,असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.   जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार बुधवार दि.12 डिसेंबर रोजी दिवसअखेर जिल्ह्यातील 210 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 58 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 7 हजार 25 विद्यार्थ्यांना तर 152 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याअखत्यारीतील यंत्रणेमार्फत 13 हजार 177 विद्यार्थ्यांना अशा एकूण 20 हजार 202 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तर आज अखेर एकूण 1 लाख 95 हजार 847 मुले   व 1 लाख 79 हजार 886 मुली   असे एकूण 3 लाख 75 हजार 733 विद्यार्थ्यांना लसीकरण क

राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धा-2018 पुणे विभाग आघाडीवर, मुंबई दुसऱ्या तर कोल्हापूर तृतीय क्रमांकावर

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.12- जिल्हा क्रीडा संकुलात सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबई विभागाच्या अदनान मुक्री, जमशेद लाजीम, अमर जाधव या तीघानीही सुवर्णपदकाची कमाई केली.   संकुलात दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत तीनही खेळाडूंनी मुंबई विभागाचे प्रतिनिधीत्व करत अजिंक्यपद पटकाविले.   तसेच मुंबई विभागातील रितेश गोवारी, जिवा सेल्वा कुमार, प्रफल्ल्‍ मोटे, कमल किर्ती, अनिरुध्द खरात, प्रणव सावंत, वैभव कांबळे, शाहिद खान, प्रतिक सुर्यवंशी, अभय कहार, संस्कार यादव या 11 खेळाडूंनी रौप्यपदकाची कमाई केली.             दुसऱ्या दिवशी या स्पर्धेमध्ये पुणे विभाग 17 सुवर्णपदके, 8 रौप्य व 4 कांस्य पदकांसह आघाडीवर राहिला. मुंबई विभाग 7 सुवर्ण पदके, 15 रौप्य व 2 कांस्य पदकांसह द्वितीय तर कोल्हापूर विभाग 4 सुवर्णपदके, 1 रौप्य व 6 कांस्य पदकांसह तृतीय स्थानावर आहे.   उद्या होणाऱ्या मुलींच्या गटातील स्पर्धेनंतर कोणता विभाग अजिंक्यपद पटकावितो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आजचे निकाल 14 वर्षाखालील मुले - 47 किलोखालील – 1) मयांक मिश्रा, औरंगाबाद 2) रितेश गोवारी, मु