कवि संमेलनातून घडला प्रतिभाविष्कार



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15- रायगड जिल्हा ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जिल्ह्यातील प्रसिध्द कवींच्या स्वरचित कवितांचे सादरीकरण  कवि संमेलनात झाले. या मान्यवर कविवर्यांच्या काव्य सादरीकरणातून अलिबागकर रसिक वाचकांना प्रतिभाविष्काराची प्रचिती मिळाली.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सहयाद्री मंडळ अलिबागचे अध्यक्ष कैलास पिंगळे हे होते. या कविसंमेलनात सिद्धेश लखमंदे, प्रा.महेश नायकुडे, वैभव धनावडे,  संध्या दिवकर,  विनायक पवार, बाबू पूजारी, पुंडलिक म्हात्रे, उमा कोल्हे,  दिलीप मोकल,  म.वा. म्हात्रे, विनोद टेंबुलकर, सायली राऊळ,हरिश्चंद्र माळी, आशिष पाटील, प्रा. महेश बिऱ्हाडे, कल्पेश शहा, प्रतिक धनावडे,    आदी कविंनी आपल्या स्वरचित रचना सादर केल्या. जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी यांनी उपस्थित कविंचे स्वागत केले.
या कविंनी आपल्या रचनांमधून आपापले भावविश्व उपस्थित रसिकांसमोर शब्दबद्ध केले. प्रारंभी सिद्धेश लखमंदे यांनी आपल्या कवी या कवितेतून आपल्या कवित्वाची कवाडे रसिकांसमोर उघडली. वैभव धनावडे यांनी षडाक्षरी कविता रसिकांची दाद घेऊन गेली तर संध्या दिवकर यांची आग्री भाषेतील इवान ही कविता रसिकांची दाद मिळवून गेली. विनायक पवार यांची आजोबा नावाच्या कवितेने उपस्थितांच्या डोळे पाणावले. बाबू पवार यांच्या आई या कवितेने आईची महती सांगितली. उमा कोल्हे यांची साथ या कवितेने उत्कृष्ट कविता रसग्रहणाचा अनुभव दिला. पुंडलिक म्हात्रे यांनी  प्रकल्पग्रस्तांचे दुःख आपल्या ‘हरकत काय तुमची’ या कवितेतून मांडले. या कविसंमेलनात उपस्थित कविंनी आपल्या दर्जेदार रचना सादर करुन कविसंमेलनाला रंगत आणली.
या काव्यसंमेलनाचे सुत्रसंचलन श्रीमती जिवीता पाटील यांनी केले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक