Posts

Showing posts from June 5, 2022

म्हसळा नगरपंचायत क्षेत्रातील सर्व्हे नं. 17/1 जमिनीमधील क्षेत्राचा मसणवटा म्हणून असलेला वापर बंद करण्याचे आदेश जारी

अलिबाग, दि.10 (जिमाका):- जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतकडील सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक 20, दि.10 मार्च 2022 नुसार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965, मधील कलम 253 मधील, पोटकलम (1) अन्वये प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दि.31 मे 2022 पासून जिल्ह्यातील म्हसळा गावातील सर्व्हे नं. 17/1 जमिनीच्या 0-96-40 हेक्टर आर. क्षेत्रापैकी सावर रस्त्यासाठी वापरात असलेले माणगाव-म्हसळा रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र 0-13-50 हेक्टर आर.(अंदाजित), स्मशानभूमीसाठी वापरात असलेले माणगाव म्हसळा रस्त्याच्या उत्तरेकडील क्षेत्र 0-13-50 हे.आर.(अंदाजित), अतिक्रमित क्षेत्र 0-06-00 हे.आर. असे एकूण 0-53-00 हे.आर वापरात असलेले क्षेत्र वगळून उर्वरीत 0-43-40 हे.आर क्षेत्राचा मसणवटा म्हणून असलेला वापर बंद करण्यात येत आहे. तरी नमूद 0-43-40 हे.आर क्षेत्रात जो कोणी कोणतेही प्रेत पुरील किंवा त्याची अन्यथा विल्हेवाट लावील त्यास, अपराध सिद्ध झाल्यानंतर 02 हजार 500 रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होईल, असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे. 00000

तळीये पुनर्वसन कामाच्या पाहणी दौऱ्यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न

Image
दरडग्रस्त तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर  वृक्ष व बांबू लागवड  करण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प   अलिबाग, दि.10 (जिमाका):-  गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांनी दि.08 जून 2022 रोजी तळीये येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दरडग्रस्तांसाठी सुरू असलेल्या पुनर्वसन कामाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर व जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या हस्तेही वृक्षारोपण संपन्न झाले. जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरडग्रस्त तसेच जिल्ह्याच्या इतर भागातही मोठ्या प्रमाणावर वृक्ष व बांबू लागवड करण्याचा संकल्प केला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांच्या अहवालात दरडप्रवण क्षेत्रात भू:स्स्खलन आणि दरड पडण्याचा धोका कमी करण्याकरिता रायगड जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीची मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. सन 2022 मध्ये रायगड जिल्हा परिषदेद्वारे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्र

जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांमधील आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर

अलिबाग, दि.10 (जिमाका):- मा.सर्वोच्च न्यायालयाने दि. 04 मे 2022 रोजी दिलेल्या आदेशातील निर्णयानुसार आरक्षण ठरविण्याचा कार्यक्रम देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मा.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशा न्वये नमूद केलेल्या नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील खोपोली , अलिबाग , महाड , माथेरान , मुरूड जंजिरा , पेण , रोहा , श्रीवर्धन व उरण या नगरपरिषदांच्या आरक्षण व सोडतीवरील प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचना स्विकारण्यासाठी संबंधित नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खालीलप्रमाणे आरक्षण सोडतीचे ठिकाण , वेळ तसेच आरक्षण व सोडतीवरील हरकती स्विकारण्याचे ठिकाण , वेळ निश्चित करण्यात आली आहे. नगरपरिषदेचे नाव: खोपोली, आरक्षण सोडतीची कार्यवाही करणाऱ्या तसेच आरक्षण व सोडतीच्या अनुषंगाने हरकती व सूचना स्विकारणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम- मुख्याधिकारी, खोपोली नगरपरिषद, आरक्षण सोडतीचा दिनांक व वेळ- सोमवार, दि.13 जून 2022, सकाळी 11.00 वाजेपासून, आरक्षण सोडती

शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी कृषी विभागामार्फत विभागस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

अलिबाग, दि.09 (जिमाका):-  खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते याबाबत उद्भवणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत विभागस्तरावर तसेच प्रत्येक जिल्ह्यात निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे, अशी माहिती कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक अंकुश माने यांनी दिली. शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशके व इतर बाबींसंदर्भात काळाबाजार होत असल्याचे निदर्शनास आल्यास या नियंत्रण कक्षात तक्रार करता येणार आहे. खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. अशावेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामावेळी येणाऱ्या अडचणींबाबत तक्रारी करता याव्यात यासाठी विभागस्तरावर तसेच जिल्हास्तरावर निविष्ठा तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षामध्ये कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रार नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाईल. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठ

जिल्हा अग्रणी बँकेद्वारा आयोजित “ग्राहक जनसंपर्क अभियान” कार्यक्रम उत्साहात संपन्न

अलिबाग, दि.09 (जिमाका):-  वित्तिय सेवा विभाग, भारत सरकार, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँक ऑफ इंडिया लीड डिस्ट्रिक्ट बँक, रायगड यांच्या सहकार्याने हॉटेल होरिजन, खडताळ ब्रिज, अलिबाग-रेवस रोड, वरसोली, अलिबाग येथे काल (दि.08 जून 2022) रोजी  “ ग्राहक जनसंपर्क अभियान ”  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश समाजातील ग्राहकांना बँकेच्या सेवांबद्दल मार्गदर्शन व उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, त्यांची माहिती समाजात देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचविणे, त्याचबरोबर सरकारी योजनांचा लाभ लोकांकर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करणे, लोकाभिमुख योजनांचा प्रसार आणि मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन करणे हा होता. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर श्रीमती शंपा बिस्वास, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक (DDM) श्री.प्रदीप अपसूंदे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान (MSRLM) चे जिल्हा व्यवस्थापक श्री.सिद्धेश राऊळ, उपविभागीय जिल्हा कृषी अधिकारी श्

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा -पालकमंत्री कु.आदिती तटकरे

               अलिबाग, दि.09 (जिमाका):- राज्यातील बारावी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वच स्तरावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून राज्यात प्रथम क्रमांक पटकविण्याची परंपरा कोकण विभागाने कायम ठेवली आहे. यंदाही (97.21 टक्के) उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या स्पर्धेमध्ये राज्यात अव्वल स्थान मिळविले. मुंबई विभागातील रायगड जिल्हा (93.11 टक्के) निकालाने पहिल्या क्रमांकावर असून त्यात 94.72 टक्के मुली परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. बोर्डाची गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छांसह त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी ज्या सचोटीने अभ्यास केला त्याचप्रमाणे करिअर निवडताना योग्य ती काळजी घ्यावी, विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असा सूचक सल्ला जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यंदाच्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्या. कोरोनामुळे कॉलेजमध्ये प्रत्यक्ष उपस्थित न राहता थेट परीक्षा व त्यात घवघवीत यश संपादन केलेल्या राज्यातील सर्व गुणवंत, यशस्वी विद्यार्थ्यांचे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची e-KYC पूर्ण करण्यास दि.31 जुलै अखेरपर्यंत मुदतवाढ

  अलिबाग, दि.09 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांची ई-के.वाय.सी. (e-KYC) करण्याबाबतचे उपायुक्त (कृषी गणना) तथा पथक प्रमुख पी.एम.किसान कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडील पत्राच्या अनुषंगाने अलिबाग तालुक्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांची ई-के.वाय.सी. (e-KYC) बंधनकारक करण्यात आले आहे. तरी या योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना ई-के.वाय.सी. ( e-KYC ) पूर्ण करण्यास दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-के.वाय.सी. (e-KYC) पूर्ण करावी, असे आवाहन अलिबाग तहसिलदार तथा नोडल अधिकारी श्रीमती मीनल दळवी यांनी केले आहे. 00000

खरीप हंगाम 2022 करिता सोयाबीन बियाणे पेरणीबाबत कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन

    अलिबाग, दि.09 (जिमाका):- खरीप हंगाम 2022 मध्ये राज्यातील पेरणीची सद्य:स्थिती बघता राज्याचे कृषी आयुक्त श्री.धीरजकुमार यांनी सोयाबीन बियाणे पेरणीबाबत राज्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. त्यानुषंगाने 75 ते 100 मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरून 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किवा प्लॅंटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवणक्षमता 70 टक्क्यापेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 03 ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी. तसेच रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 03 ते 04 सेंटीमीटर खोलीपर्यत करावी, असे आवाहन कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केले आहे. 00000

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी दि.31 जुलै अखेरपर्यंत e-KYC पूर्ण प्रमाणीकरण पूर्ण करावे -जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर

    अलिबाग, दि.09 (जिमाका):- केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुषंगाने राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पी.एम.किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वतः e-KYC प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर e-KYC प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. तसेच केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने e-KYC प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रति बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर फक्त रु.15 निश्चित करण्यात आला आहे. तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी दि.31 जुलै 2022 अखेरपर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. 00000

समाजाच्या राहणीमानाला उपयुक्त असे हे गाव निर्माण केले जाईल - गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

Image
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तळीये दुर्घटनाग्रस्तांसाठी सुरू असलेल्या पुनर्वसन कामाचा घेतला आढावा अलिबाग , दि. 08 ( जिमाका):- गृहनिर्माण मंत्री श्री.जितेंद्र आव्हाड यांनी आज तळीये येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तळीये दुर्घटनाग्रस्तांसाठी सुरू असलेल्या पुनर्वसन कामाचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दरम्यान गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांनी कंटेनर घरांची पाहणी केली. तसेच पुनर्वसित गावासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पाणी , रस्ते , वीज , वृक्षारोपण इत्यादी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी तळीये दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर , जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर , म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन महाजन , मुख्य अभियंता श्री. जाधव ,   म्हाडाचे कार्यकारी अभियंता श्री फाये , जिल्हा परिषद बांधकाम कार्यकारी अभियंता श्री.बारदस्कर ,   जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्री.मोहिरे , जिल्हा परिषद माजी सदस्य मनोज काळीजकर , सरपंच श्री.स

शासनाच्या परवानगी विना सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास दाखल करू नये

  अलिबाग, दि.08 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय संबंधित संस्थांनी अशा अनधिकृत शाळा सुरु करु नयेत. तसेच अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी आरटीई 2009 च्या कायद्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी. पालकांनी आपल्या पाल्यास अशा शाळांना मान्यता नसल्यामूळे या अनधिकृत प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेवू नये. अन्यथा अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालक जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच या शाळांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांनी केले आहे. अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी खालीलप्रमाणे:- पनवेल:  1) पराशक्ती इंग्लिश मिडियम स्कूल, कोपर गव्हाण, पो.गव्हाण, 2) डॉल्फीन किड्स स्कूल, से.3, प्लॉट नं.59, के.डी. शेल्टर करेजाडे, 3) शारदादेवी इंग्ल

उमेद अभियानामार्फत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन; विजेत्याला 03 लाख रुपयाचे बक्षीस

Image
  अलिबाग, दि.08 (जिमाका):-  उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील स्वयं सहायता समूहातील महिलांच्या यशोगाथा दृकश्राव्य स्वरुपात लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफित निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन दि.01 जून ते 30 जून पर्यंत करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याकारणाने या स्पर्धेसाठी व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडीओ निर्माते व युट्यूब ब्लॉगर यांना सहभागी होता येणार आहे. राज्यस्तरावर निवड होणाऱ्या स्पर्धकासाठी प्रथम पारितोषिक 03 लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय 02 लक्ष रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय 01 लक्ष रुपये व सन्मानचिन्ह व उत्तेजनार्थ 50 हजार रुपये व सन्मानचिन्ह सोबतच प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वतीने महाराष्ट्रात सन 2011 पासून व जिल्ह्यात सन 2018 पासून इंटेन्सिव्ह पद्धतीने दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या नावाने अंमलबजावणी केली जात असून महिला स्वयं सहायता समूहांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या माध्यमातून अ

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक माहिती सादर करावी

  अलिबाग, दि.08 (जिमाका):-  कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्याची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी आवश्यक माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह सहाय्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याकरिता योजना आखली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना सहाय्य प्रदान करण्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली असून आधार क्रमांकाद्वारे ओळख पटवून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सहाय्याची रक्कम थेट जमा करण्यात येत आहे. तथापि यातील काही अर्जदारांचा तपशील बरोबर नसल्याने अथवा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न नसल्याने सानुग्रह सहाय्याची रक्कम अर्जदारांच्या खात्यात जमा झाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याकरिता राज्य शासनाकडून सानुग्रह अनुदान वितरीत करताना बँकेकडून प्राप्त झालेल्या तपशिलाच्या आधारे बँकेकडून नाकारण्यात आलेल्या अर्जाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करुन देण्य

पोलादपूर तालूक्यात मान्सून पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मंडळनिहाय भेटीचा कार्यक्रम संपन्न

Image
अलिबाग, दि.08 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी महाड श्रीमती प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर तालूक्यात आगामी मान्सून कालावधीची पूर्वतयारी व आपत्ती व्यवस्थापन या विषयांवर मंडळनिहाय भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार मौजे माटवण व मौजे वाकण येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पूर, दरड कोसळणे यासारख्या आपत्ती येण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यावी, दरडी घसरण्यापूर्वीची लक्षणे, शासनाकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजना याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास तहसिलदार दीप्ती देसाई, गटविकास अधिकारी धनंजय जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.चंद्रकांत कळंबे व श्रीमती सुमन कुंभार, मंडळातील ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पत्रकार व नागरिक उपस्थित होते. 00000

कोणत्याही आपत्तीला धैर्याने सामोरे जावे - प्रांताधिकारी प्रशांत ढगे; मुरुड येथे आपत्ती व्यवस्थापन शिबीर संपन्न

Image
  अलिबाग, दि.08 (जिमाका):-  मुरुड तालुक्यात पावसाळ्यात दरडग्रस्त, पूराचे पाणी येणाऱ्या गावांमध्ये अचानक आपत्ती आल्यास गावात व परिसरात असलेले जेसीबी, ट्रॅक्टरचे मालक व समाजसेवकांचे मोबाईल क्रमांक आपल्याजवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या आपत्तीत तुम्ही सक्षम राहू शकता, जिल्हा आपत्ती प्राधिकरणाकडून मदत पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही मदतकार्य सुरू करू शकता. त्यामुळे नुकसान होणार नाही, असे प्रतिपादन अलिबाग-मुरुडचे प्रांताधिकारी प्रशांत ढगे यांनी केले. मुरुड तहसिलदार कार्यालयाने कै.डॉ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात आपत्ती व्यवस्थापन शिबिराचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार रोहन शिंदे, नायब तहसिलदार गोविंद कोटंबे, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, श्री.सानप, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष वाणी हे उपस्थित होते. यावेळी तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांना मागदर्शन करताना आपत्ती सुरक्षा तज्ञ जयपाल पाटील म्हणाले की, वादळ, पूर, अतिवृष्टी यावेळी जनतेची सेवा करताना कुणीतरी घरी आपली वाट पाहत आहे, हा विचार प्रत्येक कर्मचाऱ्याने करायला हवा. आपला म

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” रोहा येथे संपन्न

Image
अलिबाग, दि.08 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त या आर्थिक वर्षातील पहिला  “ पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ”  काल (दि.07 जून) रोजी रोहा एमआयडीसी मधील रोहा इंडस्ट्रीज असोसिएशन हॉल येथे पार पडला. या मेळाव्यासाठी रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री.डी.जी.नांदगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून तर रोहा, पुणे, तळोजा येथील एकूण 09 उद्योजक व त्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यात 249 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला. यापैकी 94 उमेदवारांची प्राथमिक यादीत निवड झाली तर 10 उमेदवारांची निवड अंतिम यादीत करण्यात आली. या मेळाव्यास रोजगार इच्छुक उमेदवारांचा तसेच उद्योजकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 00000

जिल्हा अग्रणी बँकेतर्फे जिल्ह्यात अलिबागमध्ये ग्राहक संपर्क मेळाव्याचे आयोजन

  अलिबाग, दि.07 (जिमाका):-  वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार यांच्या आदेशानुसार आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा अग्रणी बँक, बँक ऑफ इंडिया तर्फे बुधवार, दि.08 जून 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत होरिझोन हॉटेल, अलिबाग-मांडवा रोड, खडताळ पुलाजवळ, बुरूमखान, अलिबाग येथे भव्य ग्राहक संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अलिबाग शहर परिसरातील सर्व सरकारी, खाजगी अणि सहकारी बँका या मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात छोट्या व्यावसायिकांना मुद्रा योजनेंतर्गत शिशु कर्ज, हातगाडी वाले, रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज, तसेच विविध MSME आणि गृह कर्ज, वाहन कर्ज आणि शेतकरी, मत्स्य व्यवसाय करणारे अणि कुक्कुट पालन आणि दूध व्यवसाय करणाऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पीक कर्ज, NRLM आणि कर्जत नगरपालिका भागातील बचतगटांना समुदाय कर्ज, नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्या होतकरू उद्योजकांसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत PMEGP, CMEGP या योजनेंतर्गत संबंधित विभागामार्फत माहिती दिली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र

भारतीय रिजर्व बँक, मुंबई तर्फे अलिबाग येथे महिला बचतगटांकरिता मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन

Image
  अलिबाग, दि.07 (जिमाका):-  वित्तीय समावेशन आणि विकास विभाग, भारतीय रिझर्व बँक, मुंबई कार्यालय यांच्या वतीने आणि बँक ऑफ इंडिया, जिल्हा अग्रणी बँक, रायगड यांच्या सहकार्याने हॉटेल होरीजोन, वरसोली, अलिबाग-रेवस रोड येथे काल (दि.06 जून) रोजी मार्गदर्शन आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा उद्देश महिला बचतगट तसेच समाजातील इतर घटकांना बचतीचे महत्त्व, व्यवसायाची उभारणी, बँकांमार्फत व्यवसायासाठी लागणारे आर्थिक सहाय्य, मालासाठी तयार करावयाची घरगुती व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, निर्यातीसाठी आवश्यक मार्गदर्शन व उपलब्ध असलेल्या सरकारी योजना, इत्यादी बाबींवर सविस्तार चर्चा आणि मान्यवर व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आले. प्रादेशिक संचालक (Regional Director), श्री.अजय मिचयारी, भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबई कार्यालयाच्या महाव्यवस्थापक, श्रीमती कल्पना मोरे, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर, श्री.सुब्रतोकुमार रॉय, बँक ऑफ इंडियाच्या झोनल मॅनेजर, श्रीमती शंपा बिस्वास, नाबार्डचे डीडीएम,श्री प्रदीप अपसुंदे, MSRLM चे जिल्हा व्यवस्थापक श्री.सिद्धेश राऊळ, जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वल