शासनाच्या परवानगी विना सुरु असलेल्या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यास दाखल करू नये

 

अलिबाग, दि.08 (जिमाका):- रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी शासनाची परवानगी न घेता अनधिकृत शाळा सुरु आहेत. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शासनाची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय संबंधित संस्थांनी अशा अनधिकृत शाळा सुरु करु नयेत. तसेच अशा अनधिकृत प्राथमिक शाळा सुरु असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी आरटीई 2009 च्या कायद्याप्रमाणे उचित कार्यवाही करावी.

पालकांनी आपल्या पाल्यास अशा शाळांना मान्यता नसल्यामूळे या अनधिकृत प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेवू नये. अन्यथा अनधिकृत शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा अन्य मान्यताप्राप्त प्राथमिक शाळेतून घेतली जाणार नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान झाल्यास त्यास पालक जबाबदार राहतील याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी. तसेच या शाळांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनीता गुरव यांनी केले आहे.

अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी खालीलप्रमाणे:-

पनवेल: 1) पराशक्ती इंग्लिश मिडियम स्कूल, कोपर गव्हाण, पो.गव्हाण, 2) डॉल्फीन किड्स स्कूल, से.3, प्लॉट नं.59, के.डी. शेल्टर करेजाडे, 3) शारदादेवी इंग्लिश मिडियम स्कूल, आदई, 4) कळसेकर इंग्लिश मिडियम स्कूल, तळोजे पाचनंद, 5) अर्कम इंग्लिश स्कूल, तळोजा, 6) मार्शमॅलोज इंटरनॅशनल स्कूल, ओवे.

खालापूर: 1) सेंट मेरी स्कूल ॲण्ड ज्यु. कॉलेज, खरसुंडी, 2) भारती ॲकेडमी इंग्लिश स्कूल, साबळे साई पुरम कॉम्प्लेक्स, व्हेज कट्टा जवळ, वरसई गाव, खोपोली.

श्रीवर्धन तालुक्यातील अंजूमन इस्लाम जंजिरा इंग्रजी स्कूल, रानवली.

महाड तालुक्यातील ॲक्टीव्ह किड्स शाळा.

म्हसळा तालुक्यातील सुरेश जी कुडेकर इंटरनॅशनल स्कूल, म्हसळा.

कर्जत तालुक्यातील नेरळ विद्या विकास इंग्रजी मिडियम.

तरी पालकांनी आपल्या पाल्यास या अनधिकृत प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेवू नये, असे आवाहन रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक