Posts

Showing posts from April 27, 2025

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण

Image
  रायगड,(जिमाका)दि.1 :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या दिनानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, उप वनसंरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण डॉ.रविंद्र शेळके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत वाघमारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भरत वाघमारे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 0000000

कान्होजी आंग्रे वनउद्यान अलिबाग येथे वन कट्टाचे उद्घाटन संपन्न

Image
    रायगड,(जिमाका)दि.1 :- महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग-अलिबागतर्फे आयोजित  “ वन कट्टा ”  या अनोख्या उपक्रमाचे  उद्घाटन महिला व बालविकास मंत्री  कु.आदिती वरदा सुनिल तटकरे यांच्या हस्ते संपन्न  झाले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे, उप वनसंरक्षक राहुल पाटील यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.             कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक वनसंरक्षक भाऊसाहेब जवरे, व वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. ०००००

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उदघाटन रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांसाठी उपयुक्त - महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे

Image
    रायगड(जिमाका)दि.1:-  राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य करण्याकरिता रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे  महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक निशिकांत पाटील, अतिरिक्त शल्य चिकित्सक शीतल जोशी, उपजिल्हा धिकारी डॉ.रविंद्र शेळके यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली होती, या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय मुख्यम...

महाराष्ट्र दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन

Image
  रायगड (जिमाका) दि.1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदान येथे आयोजित समारंभात राष्ट्रध्वज फडकविण्यात आला आणि राष्ट्रध्वजवंदन  करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी,ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीतानंतर पोलीस वाद्यवृंद पथकाकडून महाराष्ट्र राज्यगीत धून वादन करण्यात आली. राष्ट्रध्वजाला पोलीस संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व यांनी केले. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल,  गुन्हे शाखेचे श्वान पथक, पोलीस दलाचे डायल- 112 पोलीस वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक,  अग्नीशमन दल, वैद्यकीय सेवेच्या डायल 108 सेवेतील वाहन आदींनी यावेळी संचलनात भाग घेतला. जिल्हा व राज्याच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे- महिला व बालविकास मंत्री कु आदिती तटकरे समाजातील प्रत्येक घटका...