Posts

Showing posts from August 29, 2021

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आरोग्य सुविधांसह सज्ज

  अलिबाग,जि.रायगड,दि.4 (जिमाका) :- जिल्ह्यात दि.10 सप्टेंबर 2021 पासून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर   या कालावधीत मुंबईहून कोकणामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.18 व क्र.4 वरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होते. यावेळी अपघात होवून जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी अपघातग्रस्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथक पुरेशा औषध साठा व रुग्णवाहिकेसह सुसज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे यांनी दिली आहे.       गणेशोत्सव काळात नेमलेल्या वैद्यकीय मदत पथकांची माहिती पुढीलप्रमाणे-             हमरापूर :- या ठिकाणी पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ.दिक्षिता मोकल, मो.9028286605, आरोग्य सहाय्यक, श्री.विकास पाटील, मो.9767343069, आरोग्य सेवक श्री.शांताराम घरत, मो. 9

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदूर्ग ना. उदय सामंत यांचा   जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शनिवार दि.04 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वा. चिपळूण, जि.रत्नागिरी येथून मोटारीने   लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील डिजीटल स्टुडिओ उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड. (संदर्भ : मा.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड.)             दुपारी 3.00 वा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड येथे आढावा बैठक. (संदर्भ : मा.कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड.)             सायंकाळी 4.30 वा. लोणेरे, ता. माणगाव, जि.रायगड येथून मोटारीने पुण्याकडे प्रयाण. (ताम्हिणी घाट-मुळशी-बावधन मार्गे पुणे ) 0000000

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन अनिर्वाय

  अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 मधील तरतुदीनुसार प्रत्येक आस्थापनेमध्ये अंतर्गत तक्रार समितीचे गठन करणे अनिर्वाय आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, महामंडळे, स्थानिक प्राधिकरण, शासकीय कंपनी, नगरपरिषद, सहकार, सहकारी संस्था, खाजगी क्षेत्र, संघटना किंवा खाजगी उपक्रम संस्था, इंटरप्रायझेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, सेवा पुरवठादार संस्था, विरतण व विक्री, वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे, क्रीडासंकुल, सेवा पुरवठा व इतर इ. आस्थापना यांनी आपल्या आस्थापनेत समिती गठीत झाल्याचा तसेच तक्रार प्राप्त असल्यास प्राप्त तक्रारीचा विहित नमुन्यातील अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा. तसेच एखादया कार्यालय / आस्थापना / मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली नाही (ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कारवाई केली नाही (क) या कायदयातील तरतुदीचे व जबाबदारीचे पालन न केल्यास द

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

    अलिबाग,जि.रायगड,दि.3 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे-             शनिवार दि.04 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 9.00 वा. सुतारवाडी येथून शासकीय वाहनाने दासगाव, ता. महाडकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. दासगाव, ता. महाड येथे आगमन व रोशनी ग्रुप आयोजित पूरग्रस्तांना साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ: प्राथमिक आरोग्य केंद्र, दासगाव, ता.महाड.  सकाळी 10.45 वा. दासगांव येथे अंजुमन ईमा-दादूल   मुस्लिम समाज दाभोळमार्फत पूरग्रस्तांकरिता बांधण्यात    येणाऱ्या घराचे भूमीपूजन.  सकाळी 11.00 वा.दासगाव येथून शासकीय वाहनाने महाडकडे प्रयाण.  11.15 वा.महाड येथे आगमन व अंजुमन ईमा-दादुल मुस्लिम समाज दाभोळमार्फत महाड पूरग्रस्तांसाठी   साहित्य वाटप कार्यक्रम. स्थळ: पी.जी. सिटी हॉटेल, महाड. दुपारी 12.00 वा.महाड येथून कापडे खुर्द, ता. पोलादपूरकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. कापडे खुर्द, ता.पोलादपूर येथील सामाजिक सभागृहाचे उद्घाटन कार्यक्

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 22 मि.मी. पावसाची झाली नोंद

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 22.71 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3015.86मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-              अलिबाग- 37.00 मि.मी., पेण- 29.00 मि.मी., मुरुड- 42.00 मि.मी., पनवेल- 19.80 मि.मी., उरण-10.00 मि.मी., कर्जत- 9.40 मि.मी., खालापूर- 17.00 मि.मी., माणगाव- 16.00 मि.मी., रोहा- 30.00 मि.मी., सुधागड-10.00 मि.मी., तळा-27.00 मि.मी., महाड- 9.00 मि.मी., पोलादपूर-11.00 मि.मी, म्हसळा- 29.00 मि.मी., श्रीवर्धन- 50.00 मि.मी., माथेरान- 17.20 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 363.40 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 22.71 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी    पर्जन्यमानाची टक्केवारी 93.77 टक्के इतकी आहे. 00000

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार इच्छुक माजी सैनिक/पत्नी/पाल्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :-   राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ठ कामगिरी करणारे पूर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्ती मध्ये बहुमोल कामगिरी करणारे तसेच देश/राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरूपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना अशा कार्याबद्दल त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरासाठी एकरकमी रु.10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रु. 25 हजार चा पुरस्कार, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्याची तरतूद आहे. विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पत्नी/पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे :- खेळातील पुरस्कार : राष्ट्रीय राज्य स्तरावर खेळात भाग घेतलेला आहे काय?, घेतला असल्यास कोणत्या खेळात भाग घेतला?, राष्ट्रीय / राज्य स्तरावर प्रमाणपत्र मिळालेले आहे काय?, उत्कृष्ट कामगिरी/पदक मिळविल्याचे वर्तमानपत्रात प्रसिध्दी/

एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कारासाठी माजी सैनिक विधवांनी अर्ज सादर करावेत

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :-   इयत्ता 10 वी व 12 वी बोडांच्या परिक्षेमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या रायगड जिल्ह्यामधून प्रत्येकी एका माजी सैनिक विधवेच्या पाल्याला (10 वी मधून एक व 12 वी मधून एक) रक्कम रू. 5 हजार (अक्षरी रूपये पाच हजार मात्र) देऊन एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पात्र माजी सैनिक विधवांनी या पुरस्कारासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग येथे दि.10 ऑक्टोबर 2022 पूर्वी अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त झालेल्या (10वी मधून एक व 12 वी मधून एक) पाल्यांचे नाव जिल्ह्यामार्फत निवड समितीला पाठविण्यात येईल. यासाठी वैयक्तिक अर्ज, फॉर्म डी.डी.40 (कार्यालयात उपलब्ध), माजी सैनिक/विधवा पत्नीचे ओळखपत्र, 10 वी 12 वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र,   सेवापुस्तकामध्ये पाल्याचे नाव असलेल्या पानांची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँकेच्या पानाची सुस्पष्ट छायांकित खाते क्रमांक व आय.एफ.एस.सी कोडसह प्रत ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक विधवांनी या

1 जानेवारी 2022 अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम जाहीर

  अलिबाग,जि,रायगड,दि.2 (जिमाका):-   भारत निवडणूक आयोगाने राज्यात सर्व विधानसभा मतदारसंघात छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदारयाद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली गेली नाहीत किंवा त्यामध्ये दुरुस्ती,   सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यात अर्ज करता येतील. मतदारयाद्या विशेष संक्षिप्त पुन:र्रिक्षण कार्यक्रमाचे उपक्रम व कालावधी पुढीलप्रमाणे राहील :- दुबार/समान नोंदी,   एकापेक्षा अधिक नोंदी,   तार्किक त्रुटी दुर करणे इ. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या द्वारे घरोघरी भेट देवून तपासणी,   पडताळणी,   योग्य प्रकारे विभाग/भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकीकरण करणे यासाठीचा कालावधी- सोमवार 9 ऑगस्ट 2021 ते रविवार 31 ऑक्टोंबर 2021 पर्यत असेल. एकत्रित प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणे- सोमवार 1 नोव्हेंबर 2021 रोजीचा कालावधी राहील. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी- सोमवार 1 नोव्हेंबर 2021 ते मंगळवार 30 नोव्हेंबर या दरम्यानच्या असेल. विशेष मोहिमेचे दिनांक दावे व हरकती स्विकारण्या

दिव्यांग कल्याण निधीमधील वैयक्तिक अर्थसहाय्याच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूक व गरजू दिव्यांगांनी अर्ज करावेत

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :-   रायगड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या दिव्यांग कल्याण कक्षामार्फत सन 2021-22 मधील राबविण्यात येणाऱ्या 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीमधील DBT तत्वानुसार वैयक्तिक अर्थसहाय्याच्या दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (व्हेन्डींग स्टॉल/पोट गिरणी/ शिलाई मशिन/मिरची कांडप मशिन/फूड प्रोसेसिंग पुनिट झेरॉक्स मशिन, शेवया मशिन इत्यादी, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे (पापड मशिन, कागदी पिशव्या बनविण्याचे मशिन, पत्रावळी बनविण्याचे मशिन, काजू सोलण्याचे मशिन इत्यादी.), दिव्यांग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य देणे (संबंधित शाळेमार्फत प्रस्ताव सादर करावा), दिव्यांग अव्यंग व्यक्तीशी विवाहितांना आर्थिक सहाय्य देणे (01 एप्रिल 2014 नंतरचे विवाहित जोडपे असणे आवश्यक आहे.), दिव्यांग व्यक्तींना पत्रा स्टॉल पुरविणे, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या गरजेनुसार थेरपीसाठी अर्थसहाय्य देणे (उदा. फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, अॅक्युपंचर इ.),   पॅरा ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता दिव्यांगांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, दिव

खैराची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त रोहा वन विभागाने केली कारवाई

  अलिबाग,जि.रायगड,दि.02 (जिमाका) :-   माणगाव तालुक्यातील मौजे विघवली फाटा मुंबई-गोवा महामार्गावर मोरया धाब्याजवळ खैर सोलीव लाकूड वाहतूक करीत असताना (शुक्रवार, दि.27 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5.10 वाजण्याच्या सुमारास) रोहा वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. यात ट्रक टेम्पो आणि लाकूड असे 5 लाख 78 हजार 904 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी श्री.उमेश जयसिंग ढवळे रा. बारामती वडगांव निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती रोहा वन विभागाचे उप वनसंरक्षक अप्पासाहेब निकत यांनी दिली आहे. याबाबत उपवनसंरक्षक व महावनसंरक्षक रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली फिरते पथक रोहा यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शुक्रवारी, दि.27 ऑगस्ट 2021 रोजी मौजे विघवली फाटा येथे उभा असलेला ट्रक क्रमांक MH 16/Q7151 तपासला असता त्यामध्ये खैर सोलीव लाकडे विनापरवाना आढळून आली तसेच आजूबाजूला तपास केला असता MH 06/BG0089 या क्रमांकाचा टाटा एस टेंपो उभा असलेला दिसून आला. हा टेम्पो तपासला असता त्यात खैर सोलीव लाकडे सापडली. संबंधित वाहनांवर वनविभागाच्या पथकाने कारवाई करीत माणगाव नाणोरे विक्री आग