Posts

Showing posts from June 25, 2017

निवृत्तीवेतन योजना पंधरवडा कोषागार कार्यालयात प्रशिक्षण

निवृत्तीवेतन योजना पंधरवडा कोषागार कार्यालयात प्रशिक्षण अलिबाग,दि.30,(जिमाका):- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती व त्यासंदर्भातील उपलब्ध सेवा याबाबत  जागरुकता आणण्यासाठी  निवृत्तिवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यासाठी  या योजनेचे सभासद व आहरण संवितरण अधिकाऱ्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावरील  कोषागार कार्यालयात  प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  या पंधरवाड्यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील अधिकारी,कर्मचारी यांचे प्राण खातेवरील वैयक्तिक माहिती अद्यावत करण्यासाठी एस-2 फॉर्म भरुन कोषागारात सादर करणे. सभासदांनी प्राण खात्यावर नामनिर्देशन (Nomination) आहे किंवा नाही याची खात्री करावी नसल्यास नामनिर्देशन (Nomination) कोषागारास कळवून त्याची नोंदणी करुन घेणे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत Exit Withdrawal बाबतची कार्यवाही करुन आवश्यक ती कागदपत्रे कोषागारात सादर करावी. आहरण व संवितरण अधिकारी यांनी एनपीएस

पल्स पोलिओ लसीकरण पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यात रविवारी लसीकरण मोहिम

पल्स पोलिओ लसीकरण पनवेल, उरण, कर्जत, खालापूर तालुक्यात रविवारी लसीकरण मोहिम अलिबाग,दि.30,(जिमाका):- पोलीओ पासून बालकांचे संरक्षण होण्यासाठी 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक 2 जुलै 2017 रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवून पोलिओचा ज्यादा डोस देण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.  या अभियानासंदर्भात जिल्हा प्रशासनाने सज्जता केली असून जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत पूर्वतयारीचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ.  सचिन देसाई,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, क्षयरोग नियंत्रण विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ठोकळ,  जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. वैशाली पाटील, जिल्हा  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. शेषराव बढे, कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. निलेश भोकरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तयारीचा आढावा घेतला. तसेच सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय राखावा, अशा सुचना दिल्या. यावेळी देण्यात आलेल

चार कोटी वृक्ष लागवड सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे - पालकमंत्री प्रकाश महेता अलिबाग,दि.30,(जिमाका):- राज्यात चार कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ शनिवार दि.1 जुलै रोजी होत असून जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी केले आहे. दरम्यान या अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून वाडगाव ता. अलिबाग येथे केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, पालकमंत्री प्रकाश महेता, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. वाडगाव येथे शनिवार दि.1 रोजी दुपारी साडेबारा वा. हा कार्यक्रम होणार आहे. सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर व उपवनसंरक्षक अलिबाग यांनी केले आहे. ०००००

चार कोटी वृक्ष लागवड सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे - पालकमंत्री प्रकाश महेता अलिबाग,दि.30,(जिमाका):- राज्यात चार कोटी वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ शनिवार दि.1 जुलै रोजी होत असून  जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी केले आहे.             दरम्यान या अभियानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून वाडगाव ता. अलिबाग येथे  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री अनंत गीते, पालकमंत्री  प्रकाश महेता, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवडीचा जिल्हास्तरीय कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास  जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय उपस्थित राहणार आहेत. वाडगाव येथे शनिवार दि.1 रोजी दुपारी साडेबारा वा. हा कार्यक्रम होणार आहे. सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी  राजेश नार्वेकर व उपवनसंरक्षक अलिबाग यांनी केले आहे. ०००००

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा सुधारीत जिल्हा दौरा

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा सुधारीत जिल्हा दौरा     अलिबाग,दि.29(जिमाका):- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  प्रकाश महेता हे जिल्हा  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.1 जुलै 2017 रोजी  सकाळी नऊ वाजता घाटकोपर येथून ठाणे शहरमार्गे मौजे वाडगांव, ता.अलिबाग जि.रायगडकडे मोटारीने प्रयाण.दुपारी एक वाजता वाडगांव येथे आगमन व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ्: मौजे वाडगांव,ता.अलिबाग जि.रायगड.दुपारी दिड वाजता वाडगांव येथून शासकीय विश्रामगृह,अलिबागकडे प्रयाण. दोन वाजता शासकीय विश्रामगृह,अलिबाग येथे आगमन व राखीव. तीन वाजता मोटारीने घाटकोपर, मुंबईकडे प्रयाण. 00000

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यातील चार तालुक्यात रविवारी लसीकरण

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम                             जिल्ह्यातील चार तालुक्यात रविवारी लसीकरण अलिबाग,दि.28,(जिमाका):- येत्या रविवारी म्हणजे दि.2 जुलै रोजी उपराष्ट्रीय  पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून यात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलीओचा जादा डोस दिला जाणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यात  हे उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पोलिओचा ज्यादा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने पुर्व तयारी केली असून ग्रामीण भागातील 16 प्राथमिक आरोग्य् केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात बालकांना पोलीओचा डोस देण्यात येईल. या चार तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील अपेक्षित लाभार्थी एक लाख 73 हजार 873 इतके असून  त्यासाठी ग्रामीण भागात 1064 आणि शहरी भागात 166 असे एकूण 1230 पोलीओ बुथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानक, बस स्थानक  आदी गर्दिच्य

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा     अलिबाग,दि.29(जिमाका):- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  प्रकाश महेता हे जिल्हा  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दि.30 रोजी रात्रौ नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. शनिवार दि.1 जुलै  रोजी  सकाळी साडे दहा  वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने  मौजे वाडगांव ता.अलिबागकडे प्रयाण.  सकाळी 11.00 वाजता वाडगांव येथे आगमन व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. साडे अकरा वाजता वाडगांवहून मोटारीने मुंबईकडे प्रयाण. 00000

व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी प्रस्ताव मागविले

व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी प्रस्ताव मागविले अलिबाग,दि.28,(जिमाका):-शासनाच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाच्यावतीने युवक-युवतींच्या शारिरीक सुदृढता विकास व क्रीडा कौशल्य विकासासाठी व्यायामशाळा व क्रीडांगण विकासासाठी अनुदान योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील इच्छुक संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा व वसतिगृह, पोलीस कल्याण निधी, पोलीस विभाग,स्पोर्टस क्लब, ऑफिसर्स क्लब,खाजगी शैक्षणिक संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये ज्यांना शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे,अशा निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांना सात लाख  रुपयांचा निधी वितरीत केला जातो. तसेच क्रीडांगण विकास योजनेंतर्गत क्रीडांगण विकासासाठी जास्तीत जास्त सात लाख रुपयांपर्यंत  व क्रीडा साहित्य खरेदी करीता जास्

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

मागासवर्गीय वि द्या र्थ्यांसाठी मोफत वसतीगृह प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ अलिबाग,दि.28:-(जिमाका)-सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीय मुलांना शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश देण्यात येतो. यंदाही मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, तळा -तालुका क्रीडा संकुलाजवळ, बोरघर हवेली, ता.तळा, मागासवर्गीय मुलांचे  शासकीय वसतीगृह, महाड - तालुका पोलीसस्टेशन जवळ, नवे नगर महाड या शासकीय वसतीगृहात गरीब,  हुशार,  होतकरु,  मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना (अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ व अपंग ) गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत आहे. या वसतीगृहात विद्यार्थ्यांना निवास व भोजन व्यवस्था विनामूल्य आहे. तसेच वह्या,पुस्तके,शैक्षणिक व लेखनसाहित्याकरीता महाविद्यालयीन प्रवेशितास चार हजार रुपये वार्षिक भत्ता दिला जातो. शालेय प्रवेशितांस शैक्षणिक साहित्य विनामूल्य पुरविले जाते. तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरीता म्हणून दरमहा पाचशे रुपये निर्वाहभत्ता, गणवेश भत्ता दिला जातो. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्ष