निवृत्तीवेतन योजना पंधरवडा कोषागार कार्यालयात प्रशिक्षण

निवृत्तीवेतन योजना पंधरवडा
कोषागार कार्यालयात प्रशिक्षण
अलिबाग,दि.30,(जिमाका):- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती व त्यासंदर्भातील उपलब्ध सेवा याबाबत  जागरुकता आणण्यासाठी  निवृत्तिवेतन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सुचनेनुसार राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. यासाठी  या योजनेचे सभासद व आहरण संवितरण अधिकाऱ्यांसाठी जिल्हा व तालुकास्तरावरील  कोषागार कार्यालयात  प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 या पंधरवाड्यात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील अधिकारी,कर्मचारी यांचे प्राण खातेवरील वैयक्तिक माहिती अद्यावत करण्यासाठी एस-2 फॉर्म भरुन कोषागारात सादर करणे. सभासदांनी प्राण खात्यावर नामनिर्देशन (Nomination) आहे किंवा नाही याची खात्री करावी नसल्यास नामनिर्देशन (Nomination) कोषागारास कळवून त्याची नोंदणी करुन घेणे. सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत Exit Withdrawal बाबतची कार्यवाही करुन आवश्यक ती कागदपत्रे कोषागारात सादर करावी.
आहरण व संवितरण अधिकारी यांनी एनपीएस सभासदांचे Partial Withdrawal बाबतची मागणी केली असल्यास त्याबाबतचे दस्तऐवजांची,कागदपत्रांची पुर्तता करुन घेणे व ती जिल्हा कोषागारास सादर करणे, आदी  कामे करावयाची आहेत. त्यासाठी सभासद व आहरण संवितरण अधिकाऱ्यांना जिल्हा कोषागार कार्यालय,रायगड अलिबाग व तालुका स्तरावरील उपकोषागार कार्यालयांमध्ये  दि.11 जुलै पर्यंत दुपारी साडे तीन ते सायंकाळी साडे पाच या वेळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी एनपीएस योजनेतील सभासदांनी प्रशिक्षणास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी  केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक