Posts

Showing posts from August 9, 2020

माणगाव ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- माणगाव ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते  डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.    यावेळी उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, माणगाव तहसिलदार प्रियंका कांबळे-आयरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.डोईफोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.परदेशी, श्री.सुभाष केकाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.राऊत, माणगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते. ००००००

मापगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न

Image
    अलिबाग,जि.रायगड,दि.15(जिमाका):- ग्रुप ग्रामपंचायत मापगाव, ता.अलिबाग येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी खासदार सुनील तटकरे, माजी आमदार श्री.मधुकर ठाकूर, श्री.प्रवीण ठाकूर, श्री.सुनील थळे, पंचायत समिती सदस्य उमेश थळे, माजी सरपंच राजेंद्र ठाकूर, गट विकास अधिकारी, पं.स.,अलिबाग सौ.दीप्ती पाटील, मापगाव सरपंच श्रीमती अनिता थळे, ग्रामसमिती सदस्य व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ०००००००

अनाथ बालकांना शालेय साहित्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वाटप

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):-    पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी एसओएस बालग्राम सोगाव अलिबाग येथे भेट देऊन तेथील निराधार, आई-वडील नसलेल्या बालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप केले. या बालग्राम मध्ये 157 विद्यार्थी आहेत. यावेळी पालकमंत्री महोदयांनी येथील बालकांची आस्थेने विचारपूस करुन त्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी तहसिलदार सचिन शेजाळ,  संस्थेचे संचालक राकेश सिन्हा, सहाय्यक संचालक शिवरुद्र लुपने, व कर्मचारी वृंद उपस्थित होते. 000000

रोहा ग्रामीण रुग्णालयात डिजिटल क्ष-किरण यंत्राचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):- रोहा ग्रामीण रुग्णालयात पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते   डिजिटल क्ष-किरण यंत्राचे वितरण करण्यात आले.     यावेळी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.आर्ले, प्रकल्प उपसंचालक सिताराम कोलते, सतीश बोराडे, कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मण खुरकुटे, कृषी उपसंचालक दत्तात्रय काळभोर, उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, रोहा तहसिलदार कविता जाधव, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी कुमार जाधव आणि मधुकर पाटील, अमित उकडे,   रोहा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व तेथील अन्य कर्मचारी उपस्थित होते. ००००००

रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):-    ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या रानभाज्या ह्या आरोग्याला अत्यंत उपयुक्त व पोषण मूल्य असलेल्या असून त्या नामशेष होऊ नयेत आणि आदिवासी कुटुंबांना आर्थिक लाभ व्हावा, म्हणून शासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सभागृह, रोहा येथे आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील 52 हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये महिलांचा विशेष सहभाग होता.   पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी सूचित केले की, या रानभाज्यांना शहरी भागात बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून त्यादृष्टीने जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचा उपक्रम स्वागतार्ह असून या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन सर्व महिला शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचेही   प्रोत्साहन म्हणून कौतुक केले. या उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती सभापती सौ.गुलाब धर्मा वाघमारे, उपसभापती श्री .रामचंद्र सकपाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, जिल्हा पशुसं

जिल्हा परिषदेत अध्यक्षा योगिता पारधी यांच्या हस्ते "महिला व बालविकास भवनाचे " उद्घाटन संपन्न

Image
    अलिबाग,जि. रायगड दि.15 (जिमाका):-   रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये   जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी , सभापती गिता जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी   डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते "महिला व बालविकास भवनाचे " उद्घाटन आज करण्यात आले. या प्रसंगी महिला व बालविकास भवनातील जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती एस.एस. वाघमारे , महिला आर्थिक महामंडळाच्या कॅम्प मॅनेजर श्रीमती शमीम चौधरी व महिला आयोग प्रतिनिधी ॲड. शितल ठाकूर उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये "महिला व बालविकास भवन " आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास अधिकारी श्री.मंडलिक यांनी दिली आहे. ०००००

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात संपन्न

Image
    अलिबाग,जि. रायगड दि.15(जिमाका) :-   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनाच्या 73   व्या वर्धापनदिनी ध्वजारोहण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, अलिबाग उपविभागीय अधिकारी श्रीम.शारदा पोवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, उ पजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील,उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी चिंतामणी मिश्रा,   जिल्हा ग्रंथालय अधिकारी धरमसिंग वळवी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, तहसिलदार सचिन शेजाळ, सतिश कदम, विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांचे इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.   सर्वप्रथम ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या 73   व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभे

सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसेल --पालकमंत्री कु.आदिती तटकरे

Image
  वृत्त क्रमांक :- 1109                                                                                        दिनांक :- 15ऑगस्ट 2020   अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15 -    समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या काळात जिल्हा अधिक प्रगतीच्या दिशेने आगेकूच करताना दिसले, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे स्वातंत्र्यदिनाच्या 73   व्या वर्धापनदिनी मुख्य ध्वजारोहण त्यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीम.योगिता पारधी, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील , जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी मैनक घोष, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या ! जिल्ह्यात 16 हजार 542 जणांनी केली करोनावर मात

               अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका):- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 16 हजार 542 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 446 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve   असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-1 हजार 504, पनवेल ग्रामीण-364, उरण-192, खालापूर-206, कर्जत-83, पेण-214, अलिबाग-264, मुरुड-38, माणगाव-91, तळा-11, रोहा-243, सुधागड-23, श्रीवर्धन-35, म्हसळा-9, महाड-168, पोलादपूर-13 अशी एकूण 3 हजार 458 झाली आहे.             कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-7 हजार 173,   पनवेल ग्रामीण - 2 हजार 233, उरण-876, खालापूर-1 हजार 094, कर्जत-547, पेण-1 हजार 375, अलिबाग-1 हजार 120, मुरुड-142, माणगाव-372, तळा-23, रोहा-632, सुधागड-61, श्रीवर्धन-144, म्हसळा-196, महाड-477,   पोलादपूर-77 अशी एकूण 16 हजार 542 आहे.                         आज दिवसभरातही पनवेल मनपा-122,

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा दौरा

  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका):- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे-- शनिवार दि.15 ऑगस्ट, 2020 रोजी सकाळी 8.45 वा. मऔविम विश्रामगृह, अलिबाग येथून शासकीय वाहनाने पोलीस परेड ग्राऊंडकडे प्रयाण. सकाळी 9.00 वा.पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग येथे आगमन. सकाळी 9.05 वा. मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग. सकाळी 9.25 वा. शासकीय पुरस्कार वितरण/सत्कार समारंभ. स्थळ :- पोलीस परेड ग्राऊंड, अलिबाग. सकाळी 10.30 वा. अलिबाग येथून शासकीय वाहनाने मापगाव, ता.अलिबागकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. मापगाव ग्रुप ग्रामपंचायत नुतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा. स्थळ :- मापगाव, ग्रामपंचायत कार्यालय, अलिबाग. सकाळी 11.30 वा. मापगाव, ता.अलिबाग येथून शासकीय वाहनाने रोहा कडे प्रयाण. दुपारी 1.00 वा. डिजिटल क्ष-किरण मशीन वाटप कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- उपजिल्हा रुग्णालय, रोहा. दुपारी 1.30 वा. रानभाजी महोत्सव कार्यक्रमास उप

स्वातंत्र्यदिनाच्या 73 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण

  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 09.05 वाजता, कु.आदिती तटकरे, राज्यमंत्री, उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, रायगड जिल्हा यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे होणार आहे. हा सोहळा घरी बसून पाहण्यासाठी   https://www.facebook.com/dioraigad06 , https://www.facebook.com/collector.raigad     या लिंकवर क्लिक करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात येणार असून या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वा. या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वा. च्या पूर्वी किंवा 9.35 वा. च्या नंतर आयोजित करावा, अशी सूचना श

गणेशोत्सव काळात नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज

  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- दि.22 ऑगस्ट पासून सर्वत्र साजरा होणाऱ्या गणेशोत्सव सणाच्या कालावधीत मुंबईहून कोकणामध्ये राष्ट्रीय महामार्ग क्र.18 व राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु होते. यावेळी अपघात होऊन जीवितहानी तसेच प्रवासी जखमी होण्याची शक्यता असते. अशा वेळी अपघाग्रस्त रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज पथके हमरापूर, वडखळ, वाकणफाटा, कोलाड नाका, इंदापूर, दासगाव येथे पुरेसा औषधसाठा व रुग्णवाहिकेसह तैनात करण्यात आली आहेत. गणेशोत्सव काळात नेमलेल्या वैद्यकीय मदत पथकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे-- पथकाचे ठिकाण -हमरापूर, पथक प्रमुख वैद्यकीय अधिकारी/भ्रमणध्वनी क्रमांक - डॉ.सारीका बिडीये-9702044957, आरोग्य सहाय्यक, भ्रमणध्वनी क्रमांक - विकास पाटील-9767343069, आरोग्य सेवक भ्रमणध्वनी क्रमांक -आर.टी.म्हात्रे-9209840098, आरोग्य सेविका, भ्रमणध्वनी क्रमांक -   श्रीमती टी.व्ही.म्हात्रे -9075019061, वाहन चालक भ्रमणध्वनी क्रमांक -किरण पाटील-9260022149, शिपाई -श्रीमती नाईक, ॲम्ब्युलन्स क्रमांक - एम.एच.-06, के-9840.   पथक

स्वदेस फाऊंडेशन च्या सहकार्याने नुज़िवीडू सीड्स लि.चा आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाला बियाणे संचाचे वाटप

  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- स्वदेस फाऊंडेशन च्या सहकार्याने नुज़िवीडू सीड्स लि.   यांचा माणगाव तालुक्यातील पळसगाव बु. आदिवासी वाडी येथे   भाजीपाला बियाणे संच वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने व आदिवासी शेतकरी बंधू व भगिनीचे आरोग्य संतुलित राहावे, म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. बियाणे संचामध्ये टोमॅटो, कारले, मिर्ची, वांगे व भोपळा या भाज्यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजीपाल्याचे महत्वाचे गुणधर्म, त्यातील जीवनसत्वे, तो रोजच्या आहारात वापरल्यामुळे होणारे फायदे, या विषयी नुज़िवीडू सीड्स लि. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. येणाऱ्या 15 दिवसांमध्ये   माणगाव   तालुक्यातील   अडीच हजार आदिवासी शेतकरी बंधू व भगिनींसाठी परसबागेत लावण्यासाठी भाजीपाला बियाणे संचाचे वाटप पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आदिवासी शेतकरी बांधवांच्या परसबागेत जाऊन, ताजा भाजीपाला आपल्या परसबागेत कसा पिकवावा व त्याची देखभाल कशी करावी, याविषयी स्वदेस फाऊंडेशन च्या टीमने मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी पळसगाव विकास समितीच्या वतीने नुज़

गंदगी मुक्त भारत अभियानांतर्गत सर्वत्र घेतली जाणार स्वच्छतेची शपथ

  अलिबाग,जि.रायगड दि.14 (जिमाका) :- केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या निर्देशानुसार दि.8 ऑगस्ट ते   15 ऑगस्ट 2020 या कालावधीत गंदगी मुक्त भारत अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी शाळा, ग्रामपंचायत, शासकीय कार्यालये, सामाजिक संस्था व विविध संघटनांची कार्यालये या ठिकाणी उपस्थितांनी मास्क वापरून व सामाजिक अंतर ठेवून ध्वजारोहणानंतर स्वच्छतेची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता) दिप्ती पाटील यांनी केले आहे. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात येणार आहे, ती पुढीलप्रमाणे-- गंदगी मुक्त भारत अभियान स्वच्छतेची शपथ   * मी अशी शपथ घेतो/घेते   की, मी स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहीन आणि त्यासाठी वेळही देईन. मी स्वतः प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करीन. * मी गुटखा व तंबाखू खाणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही. * मी स्वतः वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालयाचा वापर करेन, उघड्यावर शौचास जाणार नाही व इतरांनाही शौचालयाचा वापर क

बळीराजाच्या स्वयंपूर्णतेकडे वाटचालीसाठी उत्तम मार्ग… शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)

               सन 2019-2024 या कालावधीसाठी व त्या पुढेही सन 2027-28 या कालावधी पर्यंत संपूर्ण देशात 10 हजार नवीन “ शेतकरी उत्पादक संस्थां ” ची (FPOs) निर्मिती करून “ शेतकरी उत्पादक संस्थां ” ची (FPOs) स्थापना व प्रचार (FPOs) ही नवीन योजना एक एफपीओ/मंडळ याप्रमाणे राबविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे.   त्या अनुषंगाने राज्यस्तरावर राज्यस्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय नियंत्रण समिती स्थापन करण्याबाबतचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत.   त्याप्रमाणे राज्यस्तरावर राज्यस्तरीय सल्लागार समिती व जिल्हास्तरावर जिल्हास्तरीय नियंत्रण समिती समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेचे संचालन व केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुपालन आयुक्त (कृषी) यांच्या स्तरावरून करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय सल्लागार समिती             या समितीमध्ये अध्यक्ष-सचिव (कृषी), सहअध्यक्ष- प्रधान सचिव (पणन), सदस्य- अपर मुख्य सचिव (ग्रामविकास विभाग), प्रधान सचिव/सचिव (सहकार), SFAC चे प्रतिनिधी, NCDC चे प्रतिनिधी, संयोजक SLBC, कृषी विद्यापीठ/संस्थांचे दोन तज्ज्ञ आणि सदस्य सचिव-

पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा रायगड जिल्हा दौरा

  अलिबाग, जि.रायगड, दि.10 (जिमाका)- उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क, राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा  जिल्हा दौरा खालीलप्रमाणे--             सोमवार, दि.10 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 8.00 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून  अलिबागकडे प्रयाण. स.11.00 वा.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. स.11.20 वा. शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालय, रायगडकडे प्रयाण. स.11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे आगमन व जिल्हा शांतता कमिटी बैठकीस उपस्थिती. स्थळ : राजस्व सभागृह, अलिबाग. दुपारी 1.30 अलिबाग येथून खोपोलीकडे प्रयाण. दु.3.00 वा. खोपोली येथे आगमन व खोपोली न.पा.कोविड केअर सेंटरची पाहणी. स्थळ : के.एम.सी.कॉलेज, खोपोली.  सोईनुसार सुतारवाडी ता.रोहा कडे प्रयाण, आगमन व राखीव.             मंगळवार, दि. 11 ऑगस्ट, 2020 रोजी, सकाळी 11.00 वा. सुतारवाडी ता.रोहा येथून घोटवळ, ता.माणगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. घोटवळ ता.माणगाव येथे आगमन व कै.कुचेकर यांच्या

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 13 मि.मी.पावसाची नोंद

      अलिबाग,जि.रायगड दि.10 (जिमाका) :- रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 13.61 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.   तसेच दि.1 जून पासून आजअखेर एकूण   सरासरी 2 हजार 163.94 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.       आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे- अलिबाग 4.00 मि.मी., पेण-6.00 मि.मी., मुरुड-10.00 मि.मी., पनवेल-7.00 मि.मी., उरण-7.00 मि.मी., कर्जत-5.80 मि.मी., खालापूर-14.00 मि.मी., माणगांव-16.00 मि.मी., रोहा-7.00 मि.मी., सुधागड-9.00 मि.मी., तळा-12.00 मि.मी., महाड-32.00 मि.मी., पोलादपूर-20.00 मि.मी., म्हसळा-17.00मि.मी., श्रीवर्धन-9.00 मि.मी., माथेरान-42.00 मि.मी., असे आजचे एकूण पर्जन्यमान 217.80 मि.मी.इतके असून सरासरी 13.61 मि.मी. इतकी आहे. आजपर्यंतची एकूण   पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 67.28मि.मी.इतकी टक्के आहे. 00000