Posts

Showing posts from June 27, 2021

जिल्ह्यातील नद्यांचा पाणी पातळी अहवाल

    अलिबाग,जि.रायगड दि.2 (जिमाका) :- रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड ता.रोहा यांच्या आज सकाळी प्राप्त दैनंदिन नद्यांची पाणी पातळी अहवालानुसार तालुकानिहाय नद्यांची पाणी पातळी नोंद याप्रमाणे- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी (डोलवहाल बंधारा) -22.20 मी.,   अंबा नदी (नागोठणे बंधारा)-4.00 मी., महाड तालक्यातील सावित्री नदी (भोईघाट महिकावती मंदिर)-2.80 मी., खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी (मौजे लोहोप)-17.65 मी., कर्जत तालुक्यातील उल्हास नदी (दहिवली बंधारा)-43.60 मी., पनवेल तालुक्यातील गाढी नदी (शासकीय विश्रामगृह)-2.60 मी. इतकी आहे. 00000

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3 मि.मी. पावसाची झाली नोंद

      अलिबाग,जि.रायगड,दि.2 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.76 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 997.06 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 4.00 मि.मी., पेण- 4.00 मि.मी., मुरुड- 3.00 मि.मी., पनवेल- 0.00 मि.मी., उरण-0.00 मि.मी., कर्जत- 5.20 मि.मी., खालापूर- 10.00 मि.मी., माणगाव- 2.00 मि.मी., रोहा- 2.00 मि.मी., सुधागड-9.00 मि.मी., तळा- 6.00 मि.मी., महाड- 7.00 मि.मी., पोलादपूर- 3.00 मि.मी, म्हसळा- 0.00 मि.मी., श्रीवर्धन- 2.00 मि.मी., माथेरान- 3.00 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 60.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 3.76 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 31.73 टक्के इतकी आहे. 00000

तळा तालुक्यातील नवीन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 सोनसडे करिता मौजे बोरघरहवेली येथील शासकीय जागा हस्तांतरित

    अलिबाग, जि.रायगड दि.2 (जिमाका):- पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील ग्रामीण स्तरापर्यंतच्या विविध शासकीय यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यापैकी पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाहीदेखील प्रलंबित होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.             त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखान्यांसाठी असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून पशुवैद्यकीय दवाखाने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.               या पार्श्वभूमीवर तळा तालुक्यातील नवीन पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 सोनसडे या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती, याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.                त्यानुसार मौजे बोरघरहवेली, ता.तळा जि. रायगड येथील गट.नं.507 एकूण क्षेत्र  

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने नेहरु युवा केंद्रातील युवकांकरिता “पाणी संकलन” या विषयावरील वेबिनार संपन्न

         अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने यंत्रणेकडून “ आओ भूजल जाने ” हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.   या कार्यक्रमांतर्गत दि.30 जून 2021 रोजी सकाळी 11 ते 12.00 वाजेपर्यंत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा रायगड यांच्या वतीने राष्ट्रीय   सेवा   योजना महत्त्व   व   युवा सहभाग आणि भूजल पुर्नभरणाच्या विविध उपाययोजनांबाबत युवकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने   वेबिनार आयोजित करण्यात आले होते.       यावेळी राष्ट्रीय   सेवा योजना जिल्हा समन्वयक तुलसीदास मोकल   यांनी    तरुणांमध्ये समाज सेवेची   जाणीव निर्माण करण्याच्या   दृष्टीने व युवा वर्गाच्या प्रचंड शक्तीला योग्य वळण देण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय   सेवा   योजना कार्यरत   असल्याचे नमूद केले. पाणी ही मानवाची मूलभूत गरज आहे. त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी युवकांनी सक्रिय   सहभाग   घ्यावा, असे आवाहन   केले.   वरिष्ठ भूवैज्ञानिक एच.एम.संगनोर यांनी “ भूजल पुनर्भरण उपाय योजना व पाऊस पाणी संकलनाच्या पध्दती ” तसे

कोविड-19 योद्धा सन्मान शिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका) :- प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था ही कोकणातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून या संस्थेचे राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय हे सन 1998 पासून व राजेंद्र माने तंत्रनिकेतन सन 2010 पासून आंबव, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे कार्यरत आहे. करोना या संसर्गजन्य विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी हॉस्पिटल, पोलीस दल व नगरपालिका/ महानगरपालिकेमधील कार्यरत कर्मचारी योद्ध्याप्रमाणे लढून जनतेची अहोरात्र सेवा करीत आहेत.   यांचे कार्य हे देवदूतासारखेच आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान व्हावा, म्हणून संस्थेच्या अभियांत्रिकी पदवी, एम.बी.ए व पॉलिटेक्निक महाविद्यालयांमध्ये या कोविड योध्दयांच्या पाल्यांसाठी “ कोविड-19 योद्धा सन्मान शिक्षण योजना ” ही मोफत शिक्षण शुल्क व मोफत वसतीगृह शुल्क योजना सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केली होती. परंतु कोविड-19 या संसर्गाचा फैलाव अद्यापही ओसरला नसल्याने संस्थेने या योजनेचा लाभ सन 2021-22 साठी देखील प्रवेशित कोविड योद्ध्यांच्या पाल्यांसाठी सुरु ठेवण्याचे ठरविले आहे. ही योजना रत्नागिरी, सिंधुदूर्ग

कृषी दिन कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सत्कार

    अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका) :- खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.21 जून 2021 ते 01 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पाडली जात आहे. दि. 01 जुलै 2021 रोजी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साज ऱ्या के ल्या जाणाऱ्या कृषी दिनी या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आहे. नुकतेच कृषी विभागामार्फत सन 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी , गहू , हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. दि.01 जुलै 2021 रोजी मुंबई येथे दु.12.30 वाजता मंत्रालय, मुंबई येथे होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमा मध्ये या राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री ,   उपमुख्यमंत्री ,   महसूल मंत्री, कृषीमंत्री , फलोत्पादन मंत्री, कृ

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मी. पावसाची झाली नोंद

                                        अलिबाग,जि.रायगड,दि.30 (जिमाका):-   रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.20 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि.1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 982.21 मि.मी. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.      आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद पुढीलप्रमाणे-       अलिबाग- 8.00 मि.मी., पेण- 1.00 मि.मी., मुरुड- 44.00 मि.मी., पनवेल- 0.20 मि.मी., उरण-0.00 मि.मी., कर्जत- 4.60 मि.मी., खालापूर- 3.00 मि.मी., माणगाव- 8.00 मि.मी., रोहा- 7.00 मि.मी., सुधागड-10.00 मि.मी., तळा- 4.00 मि.मी., महाड- 1.00 मि.मी., पोलादपूर- 0.00 मि.मी, म्हसळा- 2.00 मि.मी., श्रीवर्धन- 10.00 मि.मी., माथेरान- 28.40 मि.मी.असे आजचे एकूण पर्जन्यमान 131.20 मि.मी. इतके आहे. त्याची सरासरी 8.20 मि.मी. इतकी आहे. एकूण सरासरी   पर्जन्यमानाची टक्केवारी 31.53 टक्के इतकी आहे. 00000

नवमतदारांनी e-EPIC मतदार ओळखपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  अलिबाग,जि.रायगड,दि.29 (जिमाका) :- मा.भारत निवडणूक आयोगाने मतदारांना मतदान ओळखपत्र त्यांच्या मोबाइलवर डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन मोबाइल अॅप किंवा NVSP वरून नवीन मतदार हे e-EPIC डाउनलोड करू शकतात. संबंधित मतदारांनी ते डाऊनलोड करणे अपेक्षित आहे. रायगड जिल्ह्यातील 12 हजार 832 नवीन मतदारांपैकी आतापर्यंत 4 हजार 366 मतदारांनी E-epic डाऊनलोड करून घेतले आहेत. उर्वरित 8 हजार 466 मतदारांनी e-EPIC डाऊनलोड करून घेण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. ही   प्रक्रिया सहजपणे करता येते. शिवाय e-EPIC हे मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये किंवा digi locker मध्येही ठेवता येते. ते गहाळ किंवा खराब होण्याचा प्रश्न उदभवत नाही. मतदारांना आपले e-EPIC मतदार पोर्टल:   http://voterportal.eci.gov.in/   किंवा एनव्हीएसपी: https://nvsp.in/ किंवा मतदार हेल्पलाईन मोबाइल अॅप Android - https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen   iOS-   https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id 1456535004 याद्वारे डाऊनलोड करता येणार आहे. या सुविधेत आपले e-E