Posts

Showing posts from July 30, 2023

पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित

Image
    रायगड(जिमाका)दि.5:-  रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालयात जावे लागत असे. मात्र भारतीय डाक विभाग व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयाने डाकघर अलिबाग येथे पासपोर्ट सेवा उपलब्ध झाली आहें. या पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोस्ट विभगातील अधिकारी किशन शर्मा, अॅड. प्रविण ठाकूर, अमित नाईक उपस्थित होते.   रायगड जिल्ह्यातील असंख्य नागरिक, विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय व शिक्षणासाठी परदेशवारीला जाण्याची संधी मिळते. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचे आहे. मात्र, हे पासपोर्ट काढण्यासाठी रायगडकारांना ठाणे रिजनल पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. यामुळे रायगड जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेत शासनाने अलिबाग शहरातील जिल्हा डाकघर कार्यालयाच्या इमारतलगत पासपोर्ट कार्यालय उभारण्याचा निर्णय घेतला होता.  आत्ता रायगडकरांना पासपोर्टसाठी इतरत्र कोठे जावे ला

सैनिकांमुळेच आपण सुरक्षित -- आदिती तटकरे

Image
  रायगड (जिमाका)दि.5:- ज्या ज्या वेळी देशावर संकट येत त्या त्या वेळी भारतीय सैनिक नेहमी पुढे उभे असतात. सैनिकांसाठी प्रथम देश नंतर कुटूंब असत. सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता सीमेवर आपल्या संरक्षणासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात. त्याच्यामुळे आपलं स्वातंत्र्य टिकून आहे. सैनिकांमुळेच आपण शांतपणे श्वास घेऊ शकतो, सुरक्षित आहोत असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माणगाव तहसिल कार्यालय येथे आयोजित 'सैनिक हो तुमच्यासाठी' कार्यक्रमात केले. यावेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, तहसिलदार विकास गारुडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार पोंदकुलेझ, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, माजी सैनिक, सैनिक विरपत्नी यांसह कर्मचारी उपस्थित होते हिरकणी कक्षाचे उदघाटन तहसिल कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्यांसाठी 'हिरकणी कक्ष' व अभ्यंगत कक्षाचे उदघाटन कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या माजी सैनिक वीर पत्नींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण

विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम लसीकरण न झालेल्या बालकांनी व गर्भवती महिलांनी लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा--जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने

    रायगड (जिमाका)दि.5:-   रायगड जिल्हा रुग्णालय व अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय शहरी कार्यक्षेत्रातील 0 ते    05    वर्ष या वयोगटातील बालके तसेच गर्भवती महिला लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 राबविण्यात येणार आहे. तीन फेऱ्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेतील पहिली फेरी दि.7 ऑगस्ट ते दि.12 ऑगस्ट 2023 दरम्यान सर्व शहरी कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांनी व गर्भवती महिलांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांनी केले आहे.   विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 या मोहिमेंतर्गत 0 ते पाच वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसीद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. 2 ते 5 वर्ष या वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बुस्टर डोस राहिला असेल, त्यांचे ही लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शहरी क्षेत्रात 490 लाभार्थ्यांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्याचबरोबर गर्भवती

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी गणेशोत्सवापूर्वी एक मार्गिका पूर्ण करणार-- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Image
  रायगड (जिमाका)दि.5:-  कोकणाच्या भविष्याची दिशा ठरविणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी, राज्य शासन कटिबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे ते पनवेल पर्यंत रस्त्याची अधिकाऱ्यांसह पाहणी केली व आढावा घेतला. यावेळी मंत्री श्री.चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन सुरू होईल तर डिसेंबर 2023 अखेरपर्यंत पूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील, राष्ट्रीय महामार्गाचे आरो अंशुमन श्रीवास्तव, मुख्य अभियंता संतोष शेलार, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अलिबाग जगदीश सुखदेवे तसेच  इतर शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की, मुंबई-गोवा महामार्गाची भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी आहे. पाऊस खूप पडत असल्यामुळे पावसामध्ये रस्त्याचे काम करता येत नाही. सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले असून  सिमेंट ट्रीटेड बेस (Cement Treated Base) या अत्याधुनिक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातंर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान

रायगड(जिमाका)दि.3  : देशाला स्वांतत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या अंतर्गत जिल्हा प्रशासनाकडून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात आले. या महोत्सवाचा समारोप म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ‘मेरी माटी मेरा देश....मिट्टी को नमन, विरों का वंदन’ हा उपक्रम मोठया उत्साहाने जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी सांगितले. देशात 2021 पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता 15 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. यावर्षी मातीला केंद्रबिंदू ठेवून कार्यक्रम साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.  जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व तालुक्यातून माती गोळा केली जाणार असून ही माती एकत्रित करत एका कलशातून दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेली जाणार आहे. तेथे प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या मातीतून ‘अमृतवाटिका’ बाग तयार केली जाणार आहे.   शासनाने दिलेल्या पंचसुत्री अंतर्गत प्रत्येक गामपंचायत स्तरावर व मनपा कार्यक्षेत्रात ध्वज उभारायचा आहे. ध्वजासोबत सेल्फी घेणे, वसुधा वंदन अतंर्गत प्रत्येक गावात वृक

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    अलिबाग,दि03(जिमाका) :-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी दि.10 ऑगस्ट पर्यंत अर्ज  सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत  सन-2019-20,2020-21,2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर, समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रोहिदास पुरस्कार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या पुरस्काराकरीता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे  जन्मतारीख, वय (प्रत्येक पुरस्कारासाठी पुरुषांसाठी किमान 50 वर्ष, महिलांसाठी किमान 40 वर्ष राहील), संस्था-संस्थेचे पूर्ण नाव व संपूर्ण पत्ता. व्यक्ती-जात (मागासवर्गीय असल्यास जातीच्या दाखल्याची प्रत), संस्था- संस्थेची नोंदणी अधिनियम 1860, मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950. व्यक्ती- अर्जदाराचे चारित्र्य प्रमाणपत्र/विना दु

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

    रायगड,दि.3(जिमाका):- थोर स्वातंत्र्यसैनिक क्रांतिसिंह नाना पाटील यांना  जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार (संगायो) ज्ञानदेव यादव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी  जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील  कर्मचारी उपस्थित होते. 00000

तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवोदय विद्यालयात विविध उपक्रम संपन्न

अलिबाग,दि.1(जिमाका):-  केंद्र शासनाच्या दि.29 जुलै 2020 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy-2020) स्विकारण्यात आले. या घटनेला यावर्षी दि.29 जुलै 2023 रोजी 3 वर्षे पूर्ण झाली. त्या अनुषंगाने जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, ता. माणगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि.25 जुलै  रोजी विद्यालयात सकाळच्या सत्रात विशेष दैनंदिन परिपाठाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती देण्यात आली आणि त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. दि.26 जुलै  रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वर्धापन दिनांतर्गत विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. दि.27 जुलै रोजी केंद्रीय विद्यालय, ओ.एन.जी.सी.,पनवेल यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय.इंगळे यांनी आपला सहभाग नोंदवला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. दि.28 जुलै 2023 रोजी नवोदय विद्यालय ग्रंथालय कक्षात विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ इत्यादिंनी आपला सहभाग नोंदविला. विद्यालयातील शिक्षकांनी राष्ट्

खालापूर तहसिल कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताह शुभारंभ आठवडाभरात महसूल विभाग राबविणार विविध उपक्रम

Image
अलिबाग,दि.1(जिमाका):-  खालापूर तालुका तहसिल कार्यालयाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, उपविभागीय अधिकारी कर्जत अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या महसूल सप्ताहाचा शुभारंभ भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे फलक लावणे, स्थानिक लोकप्रतिनिधी गावचावडीवर ऑनलाईन योजनांबाबत माहिती देणे, कार्यालय स्वच्छता व अभिलेख कक्ष अद्ययावत करणे, ई हक्क पोर्टल प्रभावी वापर, गाव तिथे स्मशानभूमी, दफनभूमी असे अनेक विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. महसूल सप्ताह दिनाचा पहिला दिवस असल्याने खालापूर तहसिल कार्यालयातील कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच खालापूर तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महसूल सप्ताह दिनाच्या शुभारंभ प्रसंगी खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी, अप्पर तहसिलदार पूनम कदम, निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड, निवडणूक नायब तहसिलदार दशरथ भोईर, महसूल नायब तहसिलदार विकास पवार यांच्यासह

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी दि.03 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

      अलिबाग,दि.1(जिमाका):-   शासनाने खरीप हंगाम 2023 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयात राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2023 अशी होती. तथापि, राज्यामध्ये कोकण व विर्दभातील काही जिल्ह्यामध्ये माहे जुलै 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, खडीत विज पुरवठा, खंडीत इंटरनेट सेवा, PMFBY पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार (UIDAI) व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमीअभिलेख पोर्टलच्या तांत्रिक/ सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी  दि.03  ऑगस्ट 2023 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे, असे आयुक्त कृषी, पुणे श्री.सुनिल चव्हाण यांनी कळविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ 1/- रुपया भरून PMFBY पोर्टल  https://pmfby.gov.in  वर स्वतः तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स अॅप व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तात्काळ

शबरी आदिवासी घरकुल योजनेचा 2 हजार 38 लाभार्थ्यांना मिळणार लाभ

  अलिबाग,दि.30 (जिमाका):-   आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातींच्या व्यक्तींना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राबविण्यात येते. याअंतर्गत जिल्ह्यातील एकूण 2 हजार 38 लाभार्थ्यांना घरकुल  आवास योजनेचा लाभ देण्यास राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज मंजूरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना शबरी घरकुल आवास योजनेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  यावेळी जिल्हाधिकारी  डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण शशिकला अहिरराव आदि उपस्थित होते. शबरी घरकुल योजनेंतर्गत सन 2023-24 या वर्षासाठी रायगड जिल्ह्याकरिता एकूण 2 हजार 639 घरकुलांचा लक्षांक प्राप्त झाला आहे.  या प्राप्त लक्षांकामधून रायगड जिल्ह्यातील 14 गटविकास अधिकारी यांनी एकूण 2 हजार 38 पात्र लाभार्थ्यांची यादी मान्यतेसाठी 

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -पालकमंत्री उदय सामंत महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत जिल्ह्यास 1 हजार 10 कोटीचा निधी मंजूर

Image
    अलिबाग,दि.30 (जिमाका):-  जिल्ह्याचा विकास समतोल करताना तो समतोल असावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कटिबध्द आहोत. जिल्ह्यासाठी प्राप्त निधीच्या विनियेगातून होणाऱ्या कामांचा दर्जा उत्तमच असला पाहिजे, त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. आज झालेल्या बैठकीत   रायगड जिल्हा वार्षिक   योजना 2022-23 या आर्थिक वर्षातील जून 2023 अखेर झालेल्या 187.77 कोटीच्या खर्चास तसेच 68.32 कोटी रकमेच्या पूनर्विनियोजनास मान्यता देण्यात आली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, सर्वश्री आमदार जयंत पाटील, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, रविंद्र पाटील, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर,  महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे,  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, पनवेल महानगरपाल