तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवोदय विद्यालयात विविध उपक्रम संपन्न


अलिबाग,दि.1(जिमाका):- केंद्र शासनाच्या दि.29 जुलै 2020 रोजी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy-2020) स्विकारण्यात आले. या घटनेला यावर्षी दि.29 जुलै 2023 रोजी 3 वर्षे पूर्ण झाली. त्या अनुषंगाने जवाहर नवोदय विद्यालय, निजामपूर, ता. माणगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दि.25 जुलै  रोजी विद्यालयात सकाळच्या सत्रात विशेष दैनंदिन परिपाठाचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती देण्यात आली आणि त्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. दि.26 जुलै  रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वर्धापन दिनांतर्गत विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. दि.27 जुलै रोजी केंद्रीय विद्यालय, ओ.एन.जी.सी.,पनवेल यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय.इंगळे यांनी आपला सहभाग नोंदवला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. दि.28 जुलै 2023 रोजी नवोदय विद्यालय ग्रंथालय कक्षात विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षणतज्ञ इत्यादिंनी आपला सहभाग नोंदविला. विद्यालयातील शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील फरक, राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा, शिक्षक प्रशिक्षण, जादुई पिटारा, विज्ञान ज्योती, निपुण भारत, तंत्रज्ञानाधारित शिक्षण इत्यादि विविध तरतूदींची माहिती उपस्थितांना दिली.

दि.29 व 30 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथील प्रगती मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रसारण विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. याशिवाय नवोदय विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मनोगत व्यक्त करणारे व्हिडिओ विद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या सर्व कार्यक्रमांचे आयोजन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासंपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

०००००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक