Posts

Showing posts from May 20, 2018

ग्रामपंचायत निवडणूक स्थानिक सुट्टी जाहीर

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 :- जिल्ह्यात जून 2018 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक व रिक्त पदे असलेल्या ठिकाणी पोटनिवडणूक   रविवार दि.27 मे रोजी चा पार पडणार आहेत. तालुकानिहाय सार्वत्रिक व पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती -अलिबाग- 15 मुरुड-14,पेण-7 व पोट-1,   पनवेल-14, उरण-1 कर्जत-5,खालापूर-21, माणगांव-19, तळा-5,रोहा-7 व पोट-4, सुधागड-11, महाड-14, पोलादपूर-11, श्रीवर्धन-5, म्हसळा-10 एकूण- सार्वत्रिक-159   तर पोटनिवडणूक-5 स्थानिक 3 सुट्टयांच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात निवडणूकीच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात निवडणूकीच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे. ०००००

माजी सैनिक पाल्यांसाठी मोफत वसतीगृह

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.23 - राज्यातील युद्ध विधवा,माजी सैनिक विधवा,आजी, माजी सैनिक व इतर नागरिकांच्या पाल्यांना सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेशासाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह,नवेनगर महाड येथे शैक्षणिक वर्ष 2018-19 साठी प्रवेश अर्ज देणे सुरु आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै पर्यंत आहे. यासाठी युद्ध विधवांचे पाल्याना विना शुल्क आणि  माजी सैनिक विधवा, आजी,माजी सैनिकांचे पाल्य् व इतर नागरिकांचे पाल्याकरीता अति अल्प् भोजन शुल्क आकारुन इयत्ता नववी पासून पदविका, पदवी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या  पाल्यांना सैनिकी वसतिगृहात प्रवेश देण्यात येईल. शिस्त् बद्ध सैनिकी वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज मुलांचे वसतिगृह, नवेनगर,महाड येथे वसतिगृह अधिक्षक यांच्याकडे उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त् सैनिकी मुलांना याचा लाभ मिळावा, अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 2145-225451 व 02141-222208 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ प्र. जाधव(निवृत्त) यांनी केले आहे. ०००००

जलयुक्त शिवार अभियानासाठी भूमिपूत्राचे आर्थिक योगदान

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.२३ (जिमाका)- टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणी टंचाई असणाऱ्या गावांची निवड करुन या गावांमध्ये मृद व जलसंधारण उपचाराची कामे कृषि विभाग, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद विभाग, तसेच लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, कळवा- ठाणे या विविध विभागांमार्फत राबविण्यात येतात. रायगड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी रायगड जिल्ह्यातील तालुका   मुरुड मधील जोस रांजणगाव चे   मुळ राहिवाशी असणारे वसंत त्र्यंबक पोवळे यांनी दहा हजार रुपयांचे आर्थिक योगदान जिल्हाप्रशासनाला दिले आहे. सध्या श्री. पोवळे,संकल्प सोसायटीगोराई (१) बोरीवली (४) मुंबई येथे राहतात. त्यांनी सोमवारी (दि.२१ रोजी) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.   जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या आर्थिक योगदानाचे कौतूक केले. ०००००

रायगड जिल्ह्यातून करु या ॲनिमिया हद्दपार महाड येथील आरोग्य पोषण आहार कार्यशाळेत व्यक्त झाला निर्धार

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.२३ (जिमाका)- देशाची भावी पिढी सक्षम, सुदृढ आणि तंदुरुस्त घडवायची असेल तर माता, गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषण आहार स्थिती सुधारणा कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील ज्या 22 ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे, तेथे राबवून संपुर्ण जिल्ह्यात राबवावा, आणि रायगड जिल्ह्यातील महिलांमधील रक्ताल्पता (ॲनिमिया)चे प्रमाण व अर्भक मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी साऱ्यांनी निर्धार करु या, असे आवाहन केंद्रीय नीती आयोगाच्या तांत्रिक मंडळाच सदस्य डॉ. राजकुमार भंडारी यांनी केले. जिल्हा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाअंतर्गत समाविष्ट 22 ग्रामपंचायतींमधील आरोग्य कर्मचारी, जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणा प्रमुख तसेच ग्राम परिवर्तक, वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी आदींसाठी आरोग्य पोषण आहार विषयक कार्यशाळा आज महाड येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, 'अरमान' या सामाजिक संस्थेच्या डॉ. अपर्णा हेगडे,जिल्हा नि

'महाराष्ट्र वार्षिकी 2018' उत्तम संदर्भ ग्रंथ-जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी

Image
           अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22-   माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ग्रंथ उत्तम संदर्भ ग्रंथ असून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी कर्मचारी साऱ्यांच्या संग्रही तो असावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ज्ञान व माहितीचा खजिना असलेला संदर्भग्रंथ नवीन आकर्षक स्वरुपात वाचकांसाठी उपलब्ध झाला आहे. या ग्रंथाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी वरील प्रतिक्रिया दिली. या संदर्भग्रंथात महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा इतिहास, वन, नद्या, कृषी, क्रीडा, कला, साहित्य, पुरस्कार आदि घटकांचा यात समावेश करण्यात आला आहे. या वार्षिकीचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शासनाच्या सर्व विभागांची कामकाज पध्दती, संरचना, महत्वाचे निर्णय, धोरणे, योजना, दूरध्वनी यांची एकत्रित माहिती अभ्यासकांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाचे निर्णय, महाराष्ट्र शासनाशी संबंधित गेल्या वर्षभरातील घडामोडींचा समावेशही यात के

पावसाळी मासेमारी बंदी 1 जून पासून लागू

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.22 - महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अंतर्गत राज्याच्या जलधीक्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी तसेच मासळीच्या साठ्यांचे जतन व मच्छिमारांचे जिवीत व वित्त याचे संरक्षण व्हावे यासाठी   शुक्रवार दि.1   जून ते मंगळवार दि.31 जुलै 2018 (दोन्ही दिवस धरुन) एकूण 61 दिवस राज्याच्या सागरी जलधीक्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासून 12 मैलांपर्यंत)या कालावधीत   यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली   आहे, अशी माहिती प्र. सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय,(तांत्रिक) दि.हं.पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात जारी केलेल्या परिपत्रकात म्हटल्यानुसार, या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्यांचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जिवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येते.   पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिक नौकांना लागू राहणार नाही तर राज्याच्या स