जलयुक्त शिवार अभियानासाठी भूमिपूत्राचे आर्थिक योगदान



अलिबाग, जि. रायगड, दि.२३ (जिमाका)- टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पाणी टंचाई असणाऱ्या गावांची निवड करुन या गावांमध्ये मृद जलसंधारण उपचाराची कामे कृषि विभाग, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा जिल्हा परिषद विभाग, तसेच लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, कळवा- ठाणे या विविध विभागांमार्फत राबविण्यात येतात. रायगड जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानासाठी रायगड जिल्ह्यातील तालुका  मुरुड मधील जोस रांजणगाव चे  मुळ राहिवाशी असणारे वसंत त्र्यंबक पोवळे यांनी दहा हजार रुपयांचे आर्थिक योगदान जिल्हाप्रशासनाला दिले आहे. सध्या श्री. पोवळे,संकल्प सोसायटीगोराई (१) बोरीवली (४) मुंबई येथे राहतात. त्यांनी सोमवारी (दि.२१ रोजी) जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.  जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्या आर्थिक योगदानाचे कौतूक केले.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक