Posts

Showing posts from May 6, 2018

सामाईक प्रवेश परीक्षा-2018 जिल्ह्यात सुमारे साडे आठ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती

Image
अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10-   सक्षम प्राधिकारी व संचालक,सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सन 2018 ची सामाईक प्रवेश परीक्षा आज पार पडली. जिल्ह्याभरातून  20 परीक्षा केंद्रांवर 8 हजार 485 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा सुरळीत व शांततेच्या वातावरणात पार पडली.सुमारे 250 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले.अलिबाग तालुक्यात 11 तर पेण येथे 9 अशा एकूण 20 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.  या परीक्षेच्या आयोजनासाठी 750 अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या दरम्यान जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे.                                                                              ०००००

उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचा जिल्हा दौरा

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.9- राज्याचे उर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे,नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य् उत्पादन शुल्क  हे गुरुवार दि.10 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- गुरुवार दि.10 रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता स्पीड बोटने मांडवा येथे आगमन व अलिबागकडे मोटारीने प्रयाण.पावणे बारा वा. अलिबाग येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वा. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना अधिवेशन,अलिबाग या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी दोन वा.अलिबाग येथून मोटारीने मांडवाकडे प्रयाण.

एचआयव्ही जनजागृतीसाठी 'विरा' या लघुपटाचे विमोचन

Image
अलिबाग, जि. रायगड, दि.९ (जिमाका)- एचआयव्ही एडस व एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तिंना सन्मानाची वागणूक देण्यासंदर्भात जनजागृती करणाऱ्या 'विरा' या लघुपटाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी   यांच्या अध्यक्षतेखाली राजस्व सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग, ता. अलिबाग, जि. रायगड येथे मंगळवारी (दि.८) जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागातर्फे   एचआयव्ही-क्षयरोग कमिटीची बैठक झाली.              यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ, अजित गवळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई,   डॉ.   प्राची नेहूलकर,    समन्वयक मनोज बामणे,   वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी डॉ.पांडुरंग शिंदे,   जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. कोकरे, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक नवनाथ लबडे, जिल्हा सहाय्यक (लेखा) रविंद्र कदम,   जिल्हा सहाय्यक (एम ॲण्ड इ ) रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक कार्यक्रम संपदा मळेकर, आधार ट्रस्ट चे किशोर तरवडे,सचिन अवस्थी, प्रकाश तांगडे, महिला व बालकल्याण अधिकारी व्ही. वाय . मोरे, जागृती गुंजाळ, सीसीसी एआरटी प्रेम खंडागळे आदी उपस्थ

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रि-मॅट्रिक शिष्यवृती नुतनीकरणासाठी पुन्हा संधी

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- सन 2017-18 वर्षातील अल्पंसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेले प्रि-मॅट्रीक शिष्यवृत्ती नुतनीकरण ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी शाळा,संस्थास्तरावर 30 नोव्हेंबर 2017 या अंतिम मुदतीपर्यंत झाली नव्हती अशा रायगड जिल्ह्यातील 132 विद्यार्थ्यांना  पडताळणीची पुन:श्च संधी देण्यात आली आहे. केंद्रशासनाने अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी पडताळणीची पुन:श्च शेवटची संधी उपलब्ध करुन दिली आहे. विद्यार्थ्यां साठी केंद्रशासनाने NSP (National Scholarship Portal) 2.0 वर  सोमवार दि.7 मे ते बुधवार दिनांक 16 मे पर्यंत पुन:श्च् पडताळणी प्रक्रिया  www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर सुरु केली आहे. तरी मुख्याध्यापकांनी आपल्या तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती यांचेशी संपर्क साधून विद्याथ्यांची खात्री करावी व दिलेल्या मुदतीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज पडताळणीची प्रक्रीया पूर्ण करावी.असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी केले आहे. ०००००

ग्रा.पं. निवडणूकः स्वाधीन पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान

अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातील 187 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका व 158 जागांसाठी पोटनिवडणूका कार्यक्रम जाहीर केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत परिमंडळ-2,पनवेल विभागातील पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ओवळे, गिरवले, दापोली ग्रामपंचायत, पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत दुंदरे, सोमटणे, चिखले, भिंगार, कोन, कसळखंड,मालडुंगे ग्रामपंचायत,उरण पोलीस ठाणे हद्दीत जासई या ग्रामपचांयतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून रविवार दि.27 मे रोजी मतदान व सोमवार दि. 28 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडावे यासाठी नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन अधिकाऱ्यांना तोंडी अगर लेखी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे नवी मुंबई   पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कळविले आहे. ०००००

प्रत्येक जिल्ह्यात एक क्रीडा शाळा असावी - जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी

Image
  अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7-: देशाच्या जडणघडणीत तरुण पिढीची भूमिका महत्त्वाची असते तसेच अभ्यासासोबतच खेळाची जोड दिली तर, तरुणांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा शाळा सुरु व्हावी, असे प्रतिपादन रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी दिल्लीत केले.               महाराष्ट्र दिनानिमीत्त येथील कस्तुरबा गांधी ‍मार्ग ‍ स्थित महाराष्ट्र सदनात ‘पुढचे पाऊल’ संस्था व महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र महोत्सवाच्या दुसऱ्या   दिवशी "क्रीडा क्षेत्रासमोरील नवी आव्हाने"   या चर्चासत्रात, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन पट्टु श्रीमती मंजूषा पवनगडकर- कॅंवर, स्पोटर्स् सीड या खाजगी कंपनीचे संस्थापक सुधांशु फडणीस आणि चर्चासत्राचे नियंत्रक श्री.आगाशे याचा सहभाग होता.                   डॉ. विजय सुर्यवंशी म्हणाले, वर्ष 2013-14 मध्ये कोल्हापूरचे जिल्हधिकारी असताना अनेक नवीन नवीन उपक्रम हाती घेतले. ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातील पायाभुत सुविधांचा विकास त्यापैकी एक