ग्रा.पं. निवडणूकः स्वाधीन पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रायगड जिल्ह्यातील 187 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका व 158 जागांसाठी पोटनिवडणूका कार्यक्रम जाहीर केला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत परिमंडळ-2,पनवेल विभागातील पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत ओवळे, गिरवले, दापोली ग्रामपंचायत, पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत दुंदरे, सोमटणे, चिखले, भिंगार, कोन, कसळखंड,मालडुंगे ग्रामपंचायत,उरण पोलीस ठाणे हद्दीत जासई या ग्रामपचांयतींच्या सार्वत्रिक निवडणूका होणार असून रविवार दि.27 मे रोजी मतदान व सोमवार दि. 28 मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदान शांत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात पार पडावे यासाठी नवी मुंबई आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन अधिकाऱ्यांना तोंडी अगर लेखी आदेश देण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत असल्याचे नवी मुंबई  पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी कळविले आहे.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक